Dnamarathi.com

Nilesh Lanke: बीडची घटना होऊन इतके दिवस झाले तरी सरकारने ठोस पाऊल उचलेली नाही. अशी टीका माध्यमांशी बोलताना खासदार निलेश लंके यांनी राज्य सरकारवर केली आहे.

माध्यमांशी बोलताना खासदार निलेश लंके म्हणाले की,
बीडमध्ये जी घटना घडली ती अतिशय दुर्दैवी आहे. मी संसदेमध्ये सुद्धा प्रश्न आण्याचा प्रयत्न केला.आज स्वतः शरद पवार त्यांना भेटायला जाणार आहे. आरोपीचा प्रत्यक्ष रित्या सबंध आहे. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. घटना होऊन इतके दिवस झाले तरी सरकारने ठोस पाऊल उचलेल नाही. अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे. अशी प्रतिक्रया खासदार लंके यांनी केली.

तसेच याला राजकीय रंग ना देता ज्याचा प्रत्यक्ष सबंध आहे त्यांच्यावर करवाई झाली पाहिजे आणि प्रत्येकाची हीच मागणी आहे. अशी मागणी देखील त्यांनी केली.

राष्ट्रवादी एक की दोन?
आमचे नेते जी भूमिका घेतील ती आमची भूमिका असेल
सुप्रिया सुळे ज्यांच्या बाजूने असतील त्यांच्या बाजूने आम्ही असू. निवडणुकीत ज्या गोष्टी झाल्या त्या तेव्हा सोडून द्यायच्या असतात. असं देखील ते म्हणाले.

धडाडीचे नेते आहेत भुजबळ
तर राज्य सरकारमध्ये छगन भुजबळ यांना स्थान मिळाला पाहिजे होता असं देखील ते म्हणाले. धडाडीचे नेते आहेत भुजबळ. त्यांना योग्य ती संधी मिळाली पाहिजे होती. भुजबळ यांना चांगल खात मिळायला पाहिजे होत. ते एक ताकदीचे नेते आहेत. स्पष्ट वक्ता आहेत भुजबळ जे पोटात ते ओठात. असेही निलेश लंके म्हणाले.

तसेच भुजबळ आमच्या पक्षात आलेच तर स्वागत आहे. अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना खासदार निलेश लंके यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *