Shrigonda Police: श्रीगोंदा पोलिसांनी मोठी कारवाई करत मांडवगण येथील सिध्देश्वर मंदिरातील दान पेटी व दान पेटीतील रोख रक्कम चोरी करणाऱ्या आरोपीला 24 तासाचे आत अटक केली आहे.
माहितीनुसार, मांडवगण गावातील सिद्धेश्वर मंदिराच्या आतील गाभा-यात असणारी दानपेटी चोरी झाल्याची तक्रार मंदीराचे पुजारी पोपट गणपत खराडे यांनी 16 डिसेंबर रोजी दाखल केली होती. या गुन्हेचा तपास करत असताना बाळु वसंत घोडके याने चोरी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. आरोपीला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांस 05 दिवस पोलीस कस्टडी रिमांड सुनावले आहे.
दान पेटीमधील 17,600 रुपये किमतीची रोख रक्कम देखील आरोपीकडून पोलिसांनी जप्त केली आहे.