Maharashtra Politics: कापूस, सोयाबिन व तूर या शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळाला पाहिजे, धानाला बोनस मिळाला पाहिजे, या मागणीसाठी महाविकास आघाडीच्या आमदारांनी आज विधिमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार आंदोलन केले.
“कापसाच्या झाल्या वाती सोयाबिनची झाली माती”, “शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या सरकारचा धिक्कार असो,”, अशा जोरदार घोषणाबाजी करत व हातात सोयाबीन, तूरची रोपं, गळ्यात कापसाच्या बोंडाच्या माळा घालून महाविकास आघाडीच्या आमदारांनी आज शेतकऱ्यांच्या बाजूने सरकारविरोधात आंदोलन केले.
केंद्राचे शेतमालाचे आयात निर्यात धोरण चुकीचे आहे. हे सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करणारे हे सरकार आहे अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. तसेच शेतकऱ्यांना शेतमालाला भाव मिळाला पाहिजे, अशी मागणीही दानवे यांनी लावून धरली.