Shrirampur News: श्रीरामपूर शहर पोलीसांनी मुकादमाला लुटणाऱ्या टोळीकडून दिड लाख रुपये किंमतीच्या चार मोटारसायकल जप्त केले आहे.
28 नोव्हेंबर रोजी फिर्यादी दारासिंग तुकाराम डावर (रा. मध्य प्रदेश) हे त्यांच्याकडील काम करणाऱ्या कामगाराचे पैसे देण्याकरीता कांदा मार्केट, श्रीरामपूर येथुन पाच लाख अठरा हजार रुपये घेवुन जात असताना सात आरोपींनी निर्मळ यांच्या पुठ्याच्या कारखाण्याजवळील रोडवर कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्याकडे असलेली पैश्याची बॅग चोरली होती.
या बाबत श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात बी.एन.एस. कलम 309 (6),3 (5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर आता या प्रकरणाचा तपास करत पोलिसांनी (1) इम्रान आयुब शहा, (वय 28 वर्षे), 2) आनंद अमर पवार, (वय 28 वर्षे), 3) शादाब अब्बास शेख, (वय 21 वर्षे), 4) रितेश बाबासाहेव आढाव, (वय 19 वर्षे), 5) सुरज सोपान मुठे (वय 24 वर्षे), 7) ऋषिकेश उर्फ सोन्या किशोर पागिरे (वय 25 वर्षे) याला अटक केली आहे.