Dnamarathi.com

EVM Scam: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर संपूर्ण देशात पुन्हा एकदा ईव्हीएम मशीनमध्ये घोळ असल्याचा आरोप करण्यात येत आहे. तर दुसरीकडे एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार मुंबई सायबर पोलिसांनी ईव्हीएम हॅक केल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे.

सय्यद शुजा नावाच्या व्यक्तीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यामध्ये त्याने दावा केला होता की महाराष्ट्र निवडणुकीत ईव्हीएम हॅक होऊ शकतात. महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी ही तक्रार खोटी आणि निराधार असल्याचे सांगून पोलिसात दाखल केली आहे. या तक्रारीच्या आधारे दक्षिण मुंबईतील सायबर पोलिस स्टेशनमध्ये भारतीय दंड संहिता आणि आयटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘शुजाने 2019 मध्येही असाच दावा केला होता. त्याच्याविरुद्ध दिल्लीत एफआयआर दाखल करण्यात आला होता.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले असून 288 पैकी 236 जागांवर महायुतीने विजय मिळवला आहे.

तर महाविकास आघाडीला 46 जागांवर विजय मिळाला आहे. त्यामुळे ईव्हीएममध्ये मोठ्या प्रमाणात घोळ असल्याचा आरोप आता विरोधकांकडून करण्यात येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *