DNA मराठी

Maharashtra News : भविष्य निर्वाह निधीच्या लाभासाठी कर्मचाऱ्यांना युनिव्हर्सल अकाऊंट नंबर अद्यावत करण्याचे आवाहन

Maharashtra News: कर्मचारी भविष्य निर्वाह निधीसारख्या सामाजिक सुरक्षा प्रदान करणाऱ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी कर्मचाऱ्यांनी युनिव्हर्सल अकाऊंट नंबर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या युनिफाइड पोर्टलचा वापर करून अद्ययावत करण्याचे आवाहन कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या अहिल्यानगर कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, पेन्शन योजना आणि कर्मचारी ठेव लिंक्ड विमा योजना या योजनांद्वारे अहमदनगर जिल्ह्यातील १ लाख २९ हजार ९९७ सदस्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना सामाजिक सुरक्षा कव्हर प्रदान करण्यात आले आहे. या योजनांचे नियंत्रण नाशिकच्या प्रादेशिक कार्यालयाद्वारे केले जाते.

कर्मचारी ईएफपीओच्या https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ या लिंकवर जाऊन आपला युनिव्हर्सल अकाऊंट अद्ययावत करता येईल. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक ०२४१-२४११२७३ किंवा do.ahmednagar@epfindia.gov.in या ईमेल आयडीवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

1 thought on “Maharashtra News : भविष्य निर्वाह निधीच्या लाभासाठी कर्मचाऱ्यांना युनिव्हर्सल अकाऊंट नंबर अद्यावत करण्याचे आवाहन”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *