Dnamarathi.com

Uddhav Thackeray : राज्यातील विधानसभेसाठी प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला. आज संध्याकाळी 6 ला प्रचाराच्या तोफा थंड देखील होणार आहे. तर दुसरीकडे रविवारी मुंबई आयोजित एका जाहीर सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला.

या सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी मुंबई महानगर प्रदेशाच्या (एमएमआर) विकासासाठी नीती आयोगाची ब्ल्यू प्रिंट म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिकेचे (बीएमसी) महत्त्व कमी करून मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करण्याचा डाव असल्याचा दावा केला.

यावेळी उद्धव म्हणाले की, सत्तेत आल्यास महाविकास आघाडी (MVA) वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) आणि MMRDA यांच्यात झालेला सामंजस्य करार रद्द करेल, कारण BMC चे महत्त्व कमी करण्याचा त्यांचा उद्देश आहे.

मुंबईतील बीकेसी मैदानावरील सभेला संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, जर एमएमआरडीए (मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण) बीएमसीच्या अधिकारक्षेत्रात अतिक्रमण करत असेल तर ते एमएमआरडीए विसर्जित करण्यास मागेपुढे पाहणार नाहीत. ते म्हणाले, “मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करण्याचे षडयंत्र केवळ चर्चा नाही तर एक गंभीर संकट आहे. हे षडयंत्र खरे आहे, परंतु आम्ही हे कधीही होऊ देणार नाही.

ते म्हणाले की एमएमआरडीए आणि डब्ल्यूईएफ यांनी सप्टेंबरमध्ये एमएमआरला जागतिक आर्थिक केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी करार केला होता. एमएमआर विकासावरील NITI आयोगाच्या अहवालानंतर करारावर स्वाक्षरी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईतील जमीन अदानी समुहाच्या ताब्यात देणाऱ्या महायुती सरकारची धोरणे संपुष्टात आणण्याचा एमव्हीएच्या नेतृत्वाखालील सरकारचा पहिला निर्णय असेल, असे ठाकरे म्हणाले. माजी मुख्यमंत्री म्हणाले की, ते ‘विकासविरोधी नसून विनाशविरोधी’ आहेत. त्यांनी दावा केला की त्यांच्या नेतृत्वाखालील एमव्हीए सरकार पाडले गेले (जून 2022 मध्ये) आणि शिवसेनेत फूट पडली कारण त्यांनी महाराष्ट्राची लूट होऊ दिली नाही. असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *