Dnamarathi.com

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये बंडात साथ देणाऱ्या सर्व आमदारांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. तर यापूर्वी मनसेकडून देखील 45 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली होती.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सर्व आमदारांना वर्षा बंगल्यावर बोलावलं आहे. मुख्यमंत्री शिंदे आज या आमदारांना एबी फॉर्म वाटप करू शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे.

तर दुसरीकडे अद्याप देखील महायुतीमध्ये जागावाटपाचा तिढा आतापर्यंत सुटलेला नाही. आज किंवा उद्या महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्मुला ठरू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे ज्या जागांवर वाद नाही त्या मतदार संघातील उमेदवारांना महायुतीकडून एबी फॉर्म देण्यात येत आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील आतापर्यंत 17 पेक्षा जास्त उमेदवारांना एबी फॉर्म दिला आहे तर भाजपने आतापर्यंत 99 जागांवर आपले उमेदवारांची घोषणा केली आहे.

शिंदे गटाचे उमेदवार

कोपरी पाचपाखाडी – एकनाथ शिंदे
साक्री (अज) – मंजूळाताई गावित
चोपडा (अज) – चंद्रकांत सोनावणे
जळगाव ग्रामिण – गुलाबराव पाटील
एरंडोल – अमोल चिमणराव पाटील
पाचोरा – किशोर पाटील
मुक्ताईनगर – चंद्रकांत पाटील
बुलढाणा – संजय गायकवाड
मेहकर (अजा) – डॉ. संजय रायमुलकर
दर्यापूर (अजा) – अभिजित अडसूळ
रामटेक – आशिष जैस्वाल
भंडारा (अजा) – नरेंद्र भोंडेकर
दिग्रस – संजय राठोड
नांदेड उत्तर – बालाजी कल्याणकर
कळमनुरू – संतोष बांगर
जालना – अर्जून खोतकर
सिल्लोड – अब्दुल सत्तार
छत्रपती संभाजीनगर मध्य – प्रदीप जैस्वाल
छत्रपती संभाजीनगर पश्चिम (अजा) – संजय शिरसाट
पैठण – विलास भूमरे
वैजापूर – रमेश बोरनारे
नांदगाव – सुहास कांदे
मालेगाव बाह्य – दादाजी भुसे
ओवळा माजीवडा – प्रताप सरनाईक
मागाठाणे – प्रकाश सुर्वे
जोगेश्वरी (पूर्व) – मनिषा वायकर
चांदिवली – दिलीप लांडे
कुर्ला (अजा) – मंगेश कुडाळकर
माहिम – सदा सरवणकर
भायखळा – यामिनी जाधव
कर्जत – महेंद्र थोरवे
अलिबाग- महेंद्र हरी दळवी
महाड- भरतशेठ मारुती गोगावले
उमरगा- ज्ञानराज धोंडीराम चौगुले
परांडा- डॉ.तानाजी जयवंत सावंत
सांगोला- शहाजी बापू पाटील
कोरेगाव- महेश शिंदे
पाटण- शंभूराज देसाई
दापोली- योगेश कदम
रत्नागिरी- उदय सामंत
राजापुर- किरण सामंत
सावंतवाडी- दीपक केसरकर
राधानगरी- प्रकाश आबिटकर
करवीर- चंद्रदिप नरके
खानापुर- सुहास बाबर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *