Dnamarathi.com

Ahmednagar Election:  निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला असून  २२५-अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज असल्याची माहिती मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील यांनी तहसिल कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी संजय शिंदे उपस्थित होते.

अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघामध्ये १ लाख ५९ हजार ७२४ पुरुष, १ लाख ५४ हजार ७४८ महिला व १०७ इतर असे एकूण ३ लाख १४ हजार ५७९ मतदार आहेत.  तसेच मतदार संघामध्ये ५७८ पुरुष, ४२ स्त्री असे एकूण ६२० सैनिक मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदारसंघामध्ये एकूण २९७ मतदान केंद्रावरुन मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे.  ४६ पडदानशील मतदान केंद्रे असून आदर्श मतदान केंद्रांची संख्या ३ एवढी आहे. मतदारसंघात महिला संचलित, युवा कर्मचाऱ्यांद्वारे संचलित आणि दिव्यांग संचलित प्रत्येकी एक मतदार केंद्र असल्याची माहितीही पाटील यांनी यावेळी दिली. 

 निवडणूकीचे नामनिर्देशन पत्र भरण्यास २२ ऑक्टोबर २०२४ पासून सुरूवात होणार असून  २९ ऑक्टोबर २०२४ अंतिम तारीख आहे. ३० ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी केली जाणार आहे. ४ नोव्हेंबर अर्ज माघारी घेण्याची अंतिम तारीख आहे. २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, तर २३ नोव्हेंबर २०२४ रोजी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ,, गोदाम क्र.६, एम.आय.डी.सी. नागापूर येथे मतमोजणी होणार असल्याची माहितीही  पाटील यांनी यावेळी दिली.  

 अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघ स्तरावर मतदारांसाठी मध्यवर्ती नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला असून त्याचा क्र. ०२४१-२३४१९५७  असा आहे. हा कक्ष २४X७  सुरू राहणार असून मतदारांनी माहितीसाठी या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पाटील यांनी केले. 

राज्यात एकाच टप्प्यात २० नोव्हेंबर रोजी मतदाप्रक्रिया पार पडणार असून २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *