Dnamarathi.com

Ratan Tata : उद्योगपती रतन टाटा यांचा निधन झालं आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातील आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. 

सोमवारी रतन टाटा यांची तब्येत बिघडल्याने त्यांना  मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर वयाशी संबंधित आजारांमुळे माझी सध्या वैद्यकीय तपासणी सुरू आहे. काळजी करण्यासारखे काही नाही. मी बरोबर आहे. अशी माहिती एक्सवर रतन टाटा यांनी दिली होती. 

रतन टाटा यांनी मार्च 1991 ते डिसेंबर 2012 पर्यंत टाटा सन्सचे अध्यक्ष म्हणून टाटा ग्रुपचे नेतृत्व केले. परदेशात शिक्षण पूर्ण केल्यानंतर रतन टाटा प्रथम टाटा ग्रुपची कंपनी टाटा इंडस्ट्रीजमध्ये सहाय्यक म्हणून रुजू झाले. त्यानंतर जमशेदपूर येथील टाटाच्या प्लांटमध्ये काही महिने प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर रतन टाटा यांनी त्यांच्या जबाबदाऱ्या हाताळण्यास सुरुवात केली. 2008 मध्ये, रतन टाटा यांना भारत सरकारने देशाचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मविभूषण देऊन सन्मानित केले.

टाटाच्या दूरदृष्टी आणि धोरणात्मक विचारातून ग्रुपने दूरसंचार, रिटेल आणि ऑटो यासारख्या नवीन क्षेत्रांमध्ये प्रवेश केला. 2008 मध्ये जग्वार लँड रोव्हरची खरेदी ही टाटाच्या सर्वात मोठ्या कामगिरींपैकी एक होती, जो टाटा ग्रुपच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण क्षण होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *