Dnamarathi.com

 Mukesh Ambani : देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांना मोठा धक्का बसला आहे. मुकेश अंबानी यांना अवघ्या एका दिवसात तब्बल 77,606 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. शेअर बाजारात होणाऱ्या चढउतारामुळे मुकेश अंबानी धक्का लागला आहे.

 रिलायन्स इंडस्ट्रीच्या शेअर्समध्ये 4% ची घसरण नोंदवण्यात आली आहे. यामुळे मुकेश अंबानी यांचे हजारो कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.  

गुरुवारी रिलायन्स इंडस्ट्रीज अनेक क्षेत्रात आपला व्यवसाय करते. तेल, नैसर्गिक वायू, एफएमसीजीसह रिलायन्सच्या अनेक शेअर्समध्ये घसरण झाली आहे. मुकेश अंबानींना एकाच दिवसात अनेक क्षेत्रातील समभाग घसरल्याने 77,606 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. सध्या (3 ऑक्टोबर) रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजारमूल्य 19,04,762.79 रुपये झाले आहे.

मुकेश अंबानींचे नुकसान का?

या तोट्याचे मुख्य कारण म्हणजे मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या प्रमुख शेअर्समध्ये 4% घसरण. मध्यपूर्वेतील देशांमध्ये सुरू असलेले युद्ध हे त्याचे प्रमुख कारण आहे. इस्रायल, लेबनॉन आणि इराणसह आसपासच्या देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम गॅस आणि तेल बाजारावर झाला आहे. याचा परिणाम रिलायन्स इंडस्ट्रीजच्या रिलायन्स ऑईल आणि नैसर्गिक वायूवरही झाला आहे.

गेल्या तीन दिवसांपासून रिलायन्स इंडस्ट्रीच्या शेअर्समध्ये घसरण सुरू आहे. बीएसई सेन्सेक्समध्ये 2.10% घसरण नोंदवली गेली तर रिलायन्सच्या शेअर्समध्ये 7.76% ची घसरण नोंदवली गेली. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये घसरण होऊनही मुकेश अंबानींच्या वैयक्तिक संपत्तीत कोणताही बदल झालेला नाही. सध्या मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती 93,0836 कोटी रुपये आहे. यासह, मुकेश अजूनही भारतासह आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत.

हमास, इराण, लेबनॉनसह अनेक देशांनी इस्रायलवर हल्ले केले आहेत. याचा तेल बाजारावर मोठा परिणाम झाला आहे. युद्ध असेच सुरू राहिल्यास भारतासह अनेक देशांवर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्याचा पहिला परिणाम शेअर बाजारातील घसरणीच्या रूपाने दिसून आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *