Dnamarathi.com

IPL 2025 :  येत्या काही दिवसात IPL 2025 साठी मेगा लिलाव होणार आहे. मात्र त्यापूर्वी IPL 2025 मध्ये 94 सामने होणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. 

IPL 2022,  IPL 2023 आणि IPL 2024 मध्ये 74 सामने झाले होते यंदा देखील 74 सामने होणार असल्याची माहिती समोर आली आहे.  मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआयने सामन्यांच्या संख्येत कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे.

 2022 मध्ये नवीन मीडिया अधिकारांच्या लिलावादरम्यान, बीसीसीआयने 2023 आणि 2024 मध्ये 74 सामने, 2025 आणि 2026 मध्ये 84 सामने आणि 2027 मध्ये जास्तीत जास्त 94 सामन्यांबद्दल बोलले होते. पण सलग सामन्यांसाठी भारतीय स्टार खेळाडूंचा दबाव कमी करण्यासाठी बीसीसीआयने आयपीएलच्या पुढील आवृत्तीत केवळ 74 सामने आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.

याशिवाय 2025 मध्ये होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत भारताची पोहोचण्याची शक्यता खूप जास्त आहे. 11 जूनपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. आयपीएल दीर्घकाळ सुरू राहिल्यास खेळाडूंना पुरेशी विश्रांती घेता येणार नाही, त्यामुळे सामन्यांची संख्या न वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मानले जात आहे.

आयपीएल फ्रँचायझींना लिलावापूर्वी पाच खेळाडूंना कायम ठेवण्याची संधी?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पुढील आयपीएल लिलावापूर्वी बीसीसीआय फ्रँचायझीला प्रत्येकी पाच खेळाडूंना संघात ठेवण्याची परवानगी देऊ शकते. याबाबत बीसीसीआयने फ्रँचायझीशी चर्चा केली आहे. काही फ्रँचायझींनी 5 ते 6 खेळाडूंना कायम ठेवण्याची मागणी केली होती. 

सध्या बीसीसीआय जास्तीत जास्त पाच खेळाडूंना कायम ठेवण्याची परवानगी देणार असल्याची बातमी आहे. मात्र, त्यात किती परदेशी खेळाडू आहेत, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती मिळालेली नाही. त्याचवेळी, लिलावात राईट टू मॅच (RTM) पर्याय नसल्याचं सांगण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *