Ahmednagar News: शेवगाव तालुक्यातील शेकटे बुद्रुक येथील दलितवस्ती सुधार योजनेअंतर्गत खोदण्यात आलेल्या विहिरीवर खाजगी व्यक्ती दावा करत असल्यामुळे सदर विहिरीचे पाणी हे गावासाठी खुले करण्यात यावे तसेच या विहिरीवर तार कंपाऊंड बांधण्यात यावे.
या प्रमुख मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण तसेच तालुका अध्यक्ष प्यारेलालभाई शेख यांच्या नेतृत्वाखाली शेकटे बुद्रुक येथील वंचितचे शाखा अध्यक्ष गणेश बोरुडे यांच्यासह ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन केले होते.
वंचित बहुजन आघाडीच्या महिला तालुका अध्यक्षा संगीताताई ढवळे तसेच सामाजिक कार्यकर्ते हरीभाऊ फाटे यांनी मध्यस्थी करून सदर विहीर ही गावाला पाण्यासाठी खुली करून देण्याचे लेखी आश्वासन दिल्याने वंचित बहुजन आघाडीचे ग्रामपंचायत कार्यालयासमोर सुरू असलेले बोंबाबोब आंदोलन हे मागे घेण्यात आले.
यावेळी सरपंच ज्योती हरिभाऊ फाटे, ग्रामसेवक रामेश्वर जाधव, शाखा उपाध्यक्ष राजू बोरुडे, लक्ष्मण बोरुडे, प्रकाश बोरुडे, राणी बोरुडे, वर्षा बोरुडे, वंदना बोरुडे, छाया बोरुडे, शांताबाई बोरुडे यांच्यासह असंख्य आंदोलक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.