DNA मराठी

Haryana Jind Accident: भीषण अपघात, 7 भाविकांचा मृत्यू, 8 जण गंभीर जखमी

Haryana Jind Accident: हरियाणात एक भीषण अपघात घडला आहे. या अपघातात 7 भाविकांचा मृत्यू झाला असून 8 जण गंभीर जखमी झाले आहे.

माहितीनुसार, सोमवार-मंगळवारच्या रात्री मोठी दुर्घटना घडली. हरियाणातील जिंद येथे हा अपघात झाल्याची माहिती आहे. जिंद येथे ट्रकने पुढे जात असलेल्या टाटा मॅजिकला धडक दिली. या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. 8 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, हरियाणातील कुरुक्षेत्रातील मार्चखेडी गावातील लोक राजस्थानमधील गोगामेडी येथे जात होते. टाटा कारमध्ये एकूण 15 जण प्रवास करत होते. हे लोक सोमवारी संध्याकाळी घरून निघाले होते. यावेळी टाटा एस नरवाना येथील बिधराना गावाजवळून जात असताना हिस्सार-चंदीगड राष्ट्रीय महामार्गावरील बिधराना ते सिमला या गावादरम्यान लाकडाने भरलेल्या ट्रकने मागून धडक दिली.

टक्कर झाल्यानंतर टाटा-एस खड्ड्यात उलटली आणि मध्यरात्री एकच गोंधळ उडाला. या वेळी महामार्गावरून जाणाऱ्या काही वाहनचालकांनी जखमींना मदत केली. त्यानंतर नरवाना पोलिसांनी घटनास्थळी 7 रुग्णवाहिका पाठवून त्यांना नरवाना येथील शासकीय रुग्णालयात नेले. येथे 7 जणांना मृत घोषित करण्यात आले. दरम्यान, गंभीर जखमींना अग्रोहा येथे रेफर करण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *