IND vs SL Live Streaming : झिम्बाब्वे दौऱ्यानंतर आजपासून (27 जुलै) भारतीय संघाचा श्रीलंका दौरा सुरू होणार आहे.
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया श्रीलंकेसोबत 3 सामन्यांची मालिका खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. गौतम गंभीर प्रशिक्षक म्हणून पहिली मालिका खेळणार आहे. भारत-श्रीलंका मालिका खूपच रोमांचक होणार आहे.
त्यामुळे T20 मालिकेचे लाइव्ह स्ट्रिमिंग कधी आणि कुठे होईल आणि तुम्ही ते टीव्हीवर कुठे पाहू शकता ते जाणुन घ्या
भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील पहिला T20 सामना कधी होणार?
भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला T20 सामना 27 जुलै रोजी होणार आहे.
भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील पहिला T20 सामना कुठे खेळला जाईल?
भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला T20 सामना श्रीलंकेतील पल्लेकेले येथे खेळवला जाणार आहे.
भारत विरुद्ध श्रीलंका सामना तुम्ही टीव्हीवर कुठे पाहू शकता?
भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिका सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर टीव्हीवर पाहता येईल.
भारत विरुद्ध श्रीलंका मालिकेचे लाईव्ह स्ट्रिमिंग कुठे होणार?
भारत आणि श्रीलंका यांच्यातील T20 मालिकेचे थेट प्रसारण सोनी लिव्हवर होणार आहे.
दोन्ही संघ
भारत- सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, रायन पराग, अक्षर पटेल, संजू सॅमसन, ऋषभ पंत, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग आणि खलील अहमद.
श्रीलंका- चरिथ असलंका (कर्णधार), पाथुम निसांका, अविष्का फर्नांडो, चामिंडू विक्रमसिंघे, कामिंदू मेंडिस, दासुन शनाका, वानिंदू हसरंगा, दुनिथ वेलागे, कुसल परेरा, कुसल मेंडिस, दिनेश चंडीमल, महेश थेकशाना फर्नांडो, महेश थेकशाना फेरनांदो, आणि दिलशान मधुशंका.