DNA मराठी

Noida Crime News : ‘तो’ वारंवार बायकोला मेसेज करायचा, नवऱ्याला कळलं अन्….

Noida Crime News:  गुरुवारी ग्रेटर नोएडाच्या बदलपूर भागात एक धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खडबड उडाली. 

घराच्या शेजारी राहणारा पत्नीला वारंवार मेसेज करत असल्याने नवऱ्याने त्या व्यक्तीवर अनेक वेळा चाकूने वार करून गंभीर जखमी केले आहे. माहितीनुसार, सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

 पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, शाब्दिक वादानंतर आरोपी संजयने सोनूवर धारदार वस्तूने वार केला त्यामुळे तो गंभीर जखमी झाला.जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनू त्याच्या कारमध्ये असताना वाद सुरू झाला आणि हाणामारी झाली. दुपारच्या सुमारास पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर बदलापूर पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, संजयला ताब्यात घेण्यात आले तर सोनूला रुग्णालयात नेण्यात आले.

चौकशीत संजयने सोनूवर हल्ला केल्याची कबुली दिली. सोनू अनेक दिवसांपासून सतत मेसेज पाठवून पत्नीला त्रास देत असल्याचा आरोप त्याने केला. या अधिकाऱ्याने सांगितले की, छळाचा कोणताही पुरावा अद्याप सापडला नसला तरी पोलीस सर्व पैलूंचा तपास करत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *