DNA मराठी

Maharashtra News : धक्कादायक, एकाच घरात तीन जणांचा संशयास्पद मृत्यू, परिसरात खळबळ

Maharashtra News : राज्याची उपराजधानी नागपूर येते एक खळबळजनक घटना घडली आहे.समोर आलेल्या माहितीनुसार  मौदा तालुक्यातील शांतीनगर तुमण गावात तीन जणांचा संशयास्पद मृत्यू झाला. घरामध्ये एकाच कुटुंबातील तीन जणांचे मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये पती, पत्नी आणि मुलाचा समावेश आहे. त्याच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी पोलीस प्रत्येक कोनातून तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना अरोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. श्रीनिवास इलापुंगाटी (वय ५८), पद्मलता इलापुंगाटी (वय ५४) आणि मुलगा व्यंकट इलापुंगाटी (वय २९) अशी मृतांची नावे आहेत. पोलिसांनी सांगितले की, इल्पुंगटी कुटुंबाचा राईस मिलचा व्यवसाय आहे.

मौदा तालुक्यातील शांतीनगर तुमण गावात अनेक वर्षांपासून इल्पुंगटी कुटुंब राहत असल्याचे स्थानिक लोकांनी सांगितले. नेहमी सकाळी लवकर उठणाऱ्या इल्पुंगटी कुटुंबातील एकही सदस्य गुरुवारी सकाळी बराच वेळ होऊनही घराबाहेर न आल्याने शेजाऱ्यांनी हाक मारून दरवाजा ठोठावला. मात्र आतून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने शेजाऱ्यांनी घरात डोकावून पाहिले असता ते चक्रावून गेले.

घरात पती-पत्नी आणि त्यांच्या २९ वर्षांच्या मुलाचे मृतदेह पडले होते. शेजाऱ्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच आरोली पोलीस स्टेशनने घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केली की त्यांच्या मृत्यूमागे षडयंत्र आहे? पोलीस त्याचा तपास करत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *