Sangram Jagtap : अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यामध्ये काही दिवसापूर्वी वकील दांपत्याचे अपहरण करून निर्गुण हत्या करण्यात आली होती.
यानंतर या घटनेच्या निषेधार्थ जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता, यात अहमदनगर शहराचे आमदार संग्राम जगताप सहभागी झाले होते.
त्यांनी जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांची भेट घेत जिल्ह्यातील अट्टल गुन्हेगारांवर पोलिसांनी धाडसी कारवाईची करण्याची खरी गरज आहे तसेच वकील दांपत्याच्या हत्येचा खटला फास्ट ट्रक कोर्टात चालवावा आणि सरकारी वकील म्हणून ऍड. उज्वल निकम यांची नियुक्ती करावी अशी मागणी केली.
तसेच लवकरच वकिलांचा प्रलंबित असलेला वकील संरक्षण कायदा मंजूर करण्यासाठी अधिवेशनात लेखी स्वरूपाचा प्रश्न उपस्थित करणार असल्याची माहिती दिली.
सराईत गुन्हेगारांवर यापूर्वीच पोलिसांनी कारवाया केल्या असत्या तर अशा स्वरूपाच्या घटना घडल्या नसत्या, समाजविघातक लोकांना कायद्याचा धाक दाखवणे गरजेचे आहे, या घटनेचा निषेध करत वकिलांच्या तीव्र भावना शासन दरबारी मांडणार असून तुम्ही जिल्ह्याचे प्रमुख असून या घटनेचा अहवाल शासनाकडे पाठवावा अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी केली.