DNA मराठी

7 तलाठी, 3 मंडळ अधिकारी, 1 लिपिक अखेर निलंबित 

7 talathis, 3 board officers, 1 clerk finally suspended dna marathi

संगमनेरमध्ये 42 ड अंतर्गत बेकायदेशीर नोंदी प्रकरण गाजते; 11 महसूल कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

अहिल्यानगर | प्रतिनिधी -संगमनेर शहर व तालुक्यातील महसूल विभागात 42 डअंतर्गत झालेल्या बेकायदेशीर फेरफार व मंजुरी प्रकरणात मोठी कारवाई करत सात तलाठी, तीन मंडळ अधिकारी (सर्कल) आणि एक लिपिक यांना निलंबित करण्यात आले आहे. यापूर्वी तत्कालीन तहसीलदारांवरही निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.

हे प्रकरण उघडकीस येण्यामागे एका सामाजिक कार्यकर्त्याने विभागीय आयुक्तांकडे दिलेली लेखी तक्रार कारणीभूत ठरली. त्यानंतर झालेल्या तपासात गंभीर अनियमितता व कायदेशीर प्रक्रिया डावलून फेरफार केल्याचे उघड झाले.

 काय आहे प्रकरण?

संगमनेर नगरपालिका हद्दीतील तसेच गावठाण हद्दीत मधील 42 ब, 42 क व 42 ड अंतर्गत आकृषक आकारणी, परवानगी व सनद पूर्ण क्षेत्रासाठी उपलब्ध असताना देखील,

या मध्ये संबधित खाते महाराष्ट्र नगररचना अधिनियम 1966 अंतर्गत नियोजन प्राधिकरणाची मंजुरी न घेता, भूमिलेख विभागाच्या उपअधीक्षकांकडून आवश्यक पत्रके न मिळवता
महसूल कर्मचाऱ्यांनी बेकायदेशीरपणे फेरफार केले आणि मंडल अधिकाऱ्यांनी त्यावर प्रमाणन शिक्कामोर्तब केले. या मुळे हि कारवाई करण्यात आली आहे

यामुळे कायदेशीर गुंतागुंत व शासकीय नियमांचा भंग झाला असून, त्याची गंभीर दखल घेण्यात आली आहे.

 निलंबनाची कारणे:

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील कलम 85(2) चा भंग
1947 चा जमिनीचे तुकडे टाळण्याचा कायदा झुगारून देणे
महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियमांचे उल्लंघन

 जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण:

जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिलेल्या निलंबन आदेशात ही सर्व कारणे स्पष्ट करत, दोषींवर विभागीय चौकशी सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.

या प्रकरणामुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली असून, इतर जिल्ह्यांतील अशा प्रकरणांवरही नजर टाकली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

प्रशासनातील भ्रष्टाचार व चुकीच्या नोंदींविरोधातील ही कारवाई इतर जिल्ह्यांसाठीही एक इशारा ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *