Dnamarathi.com

Share Market Crash: भारतीय शेअर बाजारात गुरुवारी पुन्हा एकदा मोठी घसरण दिसून आली आहे.
आज सेन्सेक्स 1,000 हून अधिक अंकांनी घसरला असून निफ्टी 24,000 अंकांच्या खाली आहे. यूएस मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने व्याजदरात सलग तिसऱ्यांदा कपात केल्याची घोषणा करताना ही घसरण झाली आहे.

डिसेंबरमध्ये अपेक्षेप्रमाणे व्याजदरात 25 बेसिस पॉइंट्सची कपात करण्यात आली होती. फेडरल रिझर्व्हने फेडरल ओपन मार्केट कमिटी (FOMC) च्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे. या कपातीनंतर, व्याजदर 4.5%-4.75% वरून 4.25%-4.5% च्या लक्ष्य श्रेणीवर आला आहे. फेडने जुलैपासून दर 1% कमी केले आहेत. व्याजदर डिसेंबर 2022 च्या पातळीवर आले.

दरम्यान, BSE वर सूचीबद्ध सर्व कंपन्यांचे मार्केट कॅप 5.94 लाख कोटी रुपयांनी घसरून 446.66 लाख कोटी रुपयांवर आले आहे.

याशिवाय सर्वात मोठी घसरण एचडीएफसी बँक, इन्फोसिस, आयसीआयसीआय बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, एसबीआय आणि एचसीएल टेकमध्ये दिसून आली. त्याचवेळी ॲक्सिस बँक, एमअँडएम, कोटक बँक आणि बजाज फायनान्स या बँकिंग शेअर्सही या घसरणीला हातभार लावला.

तर दुसरीकडे बुधवारी आंतरबँक परकीय चलन बाजारात रुपया तीन पैशांनी घसरून 84.94 (तात्पुरती) प्रति डॉलर या सार्वकालिक नीचांकी पातळीवर आला. विदेशी मुद्रा व्यापाऱ्यांनी सांगितले की, आयातदार आणि परदेशी बँकांकडून डॉलरला असलेली मजबूत मागणी आणि देशांतर्गत बाजारातील मंदावलेला कल यामुळे गुंतवणूकदारांच्या भावनेवर परिणाम झाला. त्यामुळे डॉलरच्या तुलनेत रुपया कमजोर झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *