DNA मराठी

Amol Khatal : आमदार अमोल खताळ यांच्यावर माथेफिरुचा हल्ला ; आरोपी ताब्यात

img 20250829 wa0005

Amol Khatal : संगमनेर शहर गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात चर्चेत असून आता शहरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. आमदार आमदार अमोल खताळ यांच्यावर माथेफिरुने हल्ला केला असल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी एका तरुणाला ताब्यात देखील घेतले आहे.

सध्या समोर आलेल्या माहितीनुसार शहरातील मालपाणी लॉन्स याठिकाणी संगमनेर फेस्टिवल आयोजित करण्यात आले होते. उदघाट्न व आरती झाल्यानंतर राजस्थान युवक मंडळाचे अध्यक्ष सुमित अट्टल यांनी सर्वांचे स्वागत केले. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मनीष मालपाणी यांनी उपस्थितांचे आभार मानले. त्यानंतर आमदार खताळ यांचे भाषण झाल्यानंतर ते परत निघताना प्रत्येकाशी हस्तांदोलन करत चालले असता एका माथेफिरुने मुख्य प्रवेशद्वाराजवळ खताळ यांच्यावर हल्ला केला. हल्ला झाल्यानंतर अचानक खूप मोठा गोंधळ झाला. उपस्थितांनी या माथेफिरूला भरपूर चोप दिला.

सदर इसमाचे नाव प्रसाद अप्पासाहेब गुंजाळ असल्याचे समजते आहे. उपस्थितांमध्ये 20 मिनिटे गोंधळाचे वातावरण होते. आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला केला. यांच्यावर झालेल्या हल्ल्याने उपस्थितांनी नाराजी व्यक्त होत आहे. तालुक्यातून या घटनेचा निषेध करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार खांडगाव येथील एक माथेफिरू युवक मालपाणी लॉन्स येथे सुरु असलेल्या कार्यक्रमासाठी आला होता. यावेळी आमदार अमोल खताळ यांनी सदर कार्यक्रमाचे उदघाट्न करून आरती आटोपल्यावर भाषण झाल्यावर ते पुढच्या कार्यक्रमासाठी निघाले त्यावेळी ते प्रत्येकाच्या हातात हात देत पुढे चालले असता जमावात असलेला एक माथेफिरूने थेट खताळ यांच्या तोंडाकडे हात भिरकवत हल्ला केला. यावेळी सोबत असणाऱ्या सुरक्षा राक्षकाने त्याला ताब्यात घेत पोलिसांच्या स्वादिन केले.

यावेळी खताळ यांचे समर्थक हजारोच्या संख्येने जमा झाले होते. मात्र कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आमदार खताळ पुन्हा घटनास्थळी आले. माझ्यावर प्रेम करणारे कार्यकर्त्यांनी याठिकाणी थांबायचं नाही. आणि कोणीही कायदा हातात घ्यायचा नाही असे सांगितल्याने जमाव खताळ यांच्या कार्यालयात गेला. काहीवेळ घटनास्थळावर तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळाले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *