DNA मराठी

Bachu Kadu : जय श्री राम बोलून निवडणूक जिंकता येते; बच्चू कडूंचा महायुतीला टोला

bachu kadu

Bachu Kadu : आगामी निवडणुका म्हणून नाही, तर आमच्या मागण्यांसाठी आंदोलन करत आहोत. ते पुढे कस न्यायचे हे डोक्यात आहे. आता आंदोलन शेवटच्या टप्प्यात आहे. ते व्यवस्थित वेगळ्या ताकतीने घेऊन जायचे आहे. सरकारला कर्जमाफी आणि इतर मेंढपाळ आणि मच्छीमार संघटनेच्या मागण्या आहेत. अशी टीका बच्चू कडू यांनी महायुती सरकारवर केली आहे. गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी बच्चू कडू राज्य सरकार वर हल्लाबोल करताना दिसत आहे. तर आता पुन्हा एका बच्चू कडू यांनी महायुतीवर जोरदार टीका केली आहे.

माध्यमांशी बोलताना बच्चू कडू म्हणाले की, आगामी निवडणुका म्हणून नाही, तर आमच्या मागण्यांसाठी आंदोलन करत आहोत. ते पुढे कस न्यायचे हे डोक्यात आहे. आता आंदोलन शेवटच्या टप्प्यात आहे. ते व्यवस्थित वेगळ्या ताकतीने घेऊन जायचे आहे. सरकारला कर्जमाफी आणि इतर मेंढपाळ आणि मच्छीमार संघटनेच्या मागण्या आहेत.

ते पूर्ण करण्यासाठी बाध्य करतील अशी रचना करत आहोत. निवडणुकीच्या काय जास्त मेहनीत करण्याची गरज नाही. EVM मशीन आहेच, काय ठप्पे मारायचे ते मारायचे. उभे रहायचे काय नाही ते ठरवावे लागेल.

सामान्य माणसाला पडलेला प्रश्न आहे. अनेक जन फोन येतात कशाला उभ राहता तुमच्या विरोधातच मतदान पडणारच आहे. त्यामुळे भाजपच्याच कार्यालयात 10 दिवसाचा गणपती बसवणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *