DNA मराठी

Yeola Election : येवला निवडणूक प्रकरण, शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्याला नागरिकांनी दिला चोप

yeola election

Yeola Election : येवला येथे शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रुपेश दराडे यांच्या कार्यकर्त्याला पैसे वाटताना नागरिकांनी रंगेहाथ पकडले यानंतर परिसरात तुफान राडा पहायला मिळाला. शिवसेना शिंदे गटाच्या रुपेश दराडे यांचा कार्यकर्ता येवला येथील निवडणूक केंद्राच्या जवळच पैसे वाटप करत होता असा आरोप नागरिकांकडून करण्यात आले आहे. यानंतर नागरिकांनी कार्यकर्त्याला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले.

या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 1 लाख 94 हजार रुपयांची रोख रक्कम जमा करण्यात आली असून आणखी रक्कम कुठे याचा तपास देखील पोलिसांनी सुरू केला आहे.

तर दुसरीकडे या प्रकरणात राज्य निवडणूक आयोगाने दखल घेत येवला शहर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी  शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रुपेश दराडे यांच्या कार्यकर्त्याला ताब्यात घेतले आहे.

तर दुसरीकडे राज्यातील 264 नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली असून 21 डिसेंबर रोजी राज्य निवडणूक आयोगाकडून निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *