Dnamarathi.com

Sujay Vikhe :  जो रामाचा नाही तो कोणाच्‍याही कामाचा नाही. असा संदेश देत आयोध्‍येमध्‍ये राम मंदिराचे निर्माण करुन कोट्यावधी भारतीयांच्‍या  अपेक्षा पुर्ण करणा-या नरेंद्र मोदींनाच पुन्‍हा जनता जनार्दन तिस-यांदा पंतप्रधान करेल असा विश्‍वास महायुतीचे उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केला.

  पारनेर येथे आयोजित केलेल्‍या कार्यक्रमात खा.डॉ.विखे पाटील पाटील यांनी उपस्थित नागरीकांशी संवाद साधला. या निमित्‍ताने त्‍यांनी देशामध्‍ये पुन्‍हा एकदा भाजपाची सत्‍ता येणार आहे. ज्‍यांनी राम मंदिराचे दिलेले आश्‍वासन पुर्ण केले त्‍यांनाच सत्‍तेवर बसविण्‍याचा निर्धार देशातील नागरीकांनी केला असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

 पारनेर तालुक्‍यातील राजकारण वेगळ्या दिशेला नेण्‍याचा प्रयत्न झाला. मागील साडेचार वर्षात ज्‍या गोष्‍टी तालुक्‍यात घडल्‍या त्‍यातून युवकांची हेळसांडच झाली. सर्वसामान्‍य लोकांमध्‍ये निर्माण झाली. खदखद आणि झालेला त्रास बाहेर येवू लागला आहे. विजय औटींसारखा कार्यकर्ता जनतेचे अश्रू पुसण्‍यासाठी पुढे आला, याचा मोठा आधार पारनेरच्‍या जनतेला मिळाला असल्‍याचे खा.विखे पाटील म्‍हणाले.

   तालुक्‍यात काय चालले आहे हे सर्वांना माहीती आहे, अन्‍याय करणा-या घटना सातत्‍याने घडत आहेत. पण एक गोष्‍ट लक्षात ठेवा या शहराच्‍या पाणी योजनेसाठी येणा-या काळात आपल्‍याला काम करायचे आहे. शहराची पाणी योजना पुर्ण करण्‍याचा शब्‍द मी देत असून, मी जो शब्‍द देतो तो पुर्णच करतो अशी ग्‍वाही त्‍यांनी देतानाच, सर्व युवकांनी संयमाने राजकारण करावे, युवकांचे भविष्‍य खुप महत्‍वाचे आहे. त्‍यांच्‍यासाठी आपल्‍याला आपल्‍याला काम करायचे आहे.

  रोजगाराची संधी निर्माण करणे हेच आपले उदिष्‍ट असून, जिल्‍ह्याच्‍या औद्योगिक आणि पर्यटन विकासातून रोजगारची निर्मिती करण्‍याचा आराखडा तयार करण्‍यात आला असून, व्‍यक्तिगत टिका करण्‍यापेक्षा विकासाच्‍या बाबींवर निवडणूकीत चर्चा होण्‍याची आवश्‍यकता आहे. मतदार संघातील जनता सुज्ञ असून, विकासाच्‍या  आणि विचारांच्‍या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्‍याची परंपरा या निवडणूकीतही कायम राहील अशी अपेक्षा त्‍यांनी व्‍यकत केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *