Walmik Karad : खंडणी प्रकरणात तुरुंगात असणाऱ्या वाल्मिक कराडसाठी आजचा दिवस महत्वाचा असणार आहे. आज न्यायालयात त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे खंडणी प्रकरणात त्याला जामीन मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
वाल्मिक कराडने अवादा कंपनीच्या पवनचक्की प्रकल्पासाठी दोन कोटी रुपयांची खंडणी विष्णू चाटे च्या माध्यमातून मागितली असल्यास आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. कंपनी या प्रकरणाची तक्रार 11 डिसेंबर रोजी दिली होती.
तर दुसरीकडे आज वाल्मिक कराडची एसआयटी कोठडी संपणार असल्याने बीड सत्र न्यायालयात या प्रकरणात महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे.
काल 21 जानेवारी रोजी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला असून हा व्हिडिओ 29 नोव्हेंबरचा असल्याचा सांगण्यात येत आहे. याच दिवशी वाल्मिक कराडने खंडणी मागितली होती आणि त्याच दिवशी वाल्मिक कराड विष्णू चाठेला भेटायला त्याच्या कार्यालयामध्ये गेला होता तेव्हाचा सीसीटीव्ही फुटेझ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये वाल्मिक कराडसह इतर आरोपी देखील दिसत आहे.त्यामुळे आज वाल्मिक कराडला जामीन मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.