Laxman Hake : ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांचे नांदेडच्या लोहा येथे जंगी स्वागत करण्यात आले.ओबीसी जनजागृती साठी प्राध्यापक लक्ष्मण हाके हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत.
अनेक ठिकाणी ते ओबीसींचे मेळावे घेत आहेत.लोहा येथे देखील ओबीसी बांधवाचा मेळावा पार पडला.
या मेळाव्यासाठी ओबीसी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ओबीसी समाजाने ओबीसींच्याच उमेदवारांना मतदान करावे.जर ओबीसी उमेदवार नसेल तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती,अल्पसंख्याक उमेदवारांना ओबीसींनी मतदान करावे असे आवाहन प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी ओबीसी बांधवांनी केले आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी लक्ष्मण हाके यांनी मराठा आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी उपोषण केला होता.