Dnamarathi.com

Sujay Vikhe News : अहमदनगर दक्षिण लोकसभेचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी जिल्हयातील श्रध्देय गडाच्या चरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतले. येथे येऊन काम करण्यासाठी मोठी उर्जा मिळते. येथील प्रेरणा घेऊन समाजासाठी काम करण्याचा संकल्प आपण केला असल्याचे त्यांनी सांगितले.  

खा. सुजय विखे पाटील यांनी आपल्या मतदार संघात प्रचारात आघाडी घेतली असून गावोगावी त्यांच्या भेटी वाढल्या आहेत. गावोगावी लोकांना भेटून महायुती सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्फत केलेल्या लोककल्याणकारी कामांची माहिती लोकांना देत आहेत.

 देशात सुरू असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हमी, ही सर्वसामान्य नागरिकांच्या हितासासाठी आणि देशासाठी आवश्यक असून येणाऱ्या काळात देशाला जागतिक स्तरावर नेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खंबीर नेतृत्व असून देश त्यांच्या हाती सुरक्षित असल्याने लोकांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी महायुतीच्या उमेदवाराला मतदान करा असे आवाहन ते नागरिकांना करत आहेत. 

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ डॉ. सुजय विखे पाटील यांनी भगवान गड परिसरातील गावांना भेटी दिल्या यावेळी त्यांच्या सोबत आमदार मोनिका राजळे आणि इतर कार्यकर्ते होते. यावेळी डॉ. विखे यांनी भगवान बाबांच्या समाधीला अभिवादन करत महंत शास्त्री महाराज यांचे आशिर्वाद घेतले. तसेच गड परिसरातील ग्रामस्थांशी संवाद साधला.

 तर ग्रामस्थांनी देखील त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा शब्द यावेळी दिला. खरवंडी, दैत्य नांदूर, टाकळी,पाथर्डी तालुक्यातील अनेक गावातील ग्रामस्थांनी सुजय विखे पाटील यांचे वाजतगाजत भव्य स्वागत केले.

यावेळी संवाद साधताना ते म्हणाले की प्रथा, परंपरे प्रमाणे मी गडावर आलो आहे, शास्त्री महाराजांनी मला आशीर्वाद दिला आहे, भगवानगडाच्या परिसराच्या विकासासाठी महायुती सरकारच्या माध्यमातून आम्ही नेहमीच कटीबद्ध राहू असा देखील विश्वास त्यांनी यावेळी ग्रामस्थांना दिला. तसेच भगवानगड हे महाराष्ट्रातील प्रमुख अध्यात्मिक केंद्र असून त्याचा पर्यटन क्षेत्र म्हणुन विकास करण्याचा मानस त्यांनी व्यक्त करत त्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा निर्माण करणार असे त्यांनी सांगितले.

 तसेच संत ज्ञानेश्वरांच्या मंदिराचे काम पुर्ण केले जाईल. तसेच पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिकांच्या रोजगारासाठी पाऊले उचलणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

स्थानिक आमदार मोनिकाताई राजळे यांनी सुद्धा मार्गदशन केले. मोनिकाताईंनी सांगितले की, मागील पाच वर्षात डॉ. सुजय विखे यांनी जिल्ह्याचे विविध प्रश्न प्रभावीपणे संसदेत मांडून जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात निधी मिळऊन विविध विकास कामे केली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांना साथ मिळाल्याने येणाऱ्या काळात डॉ. विखे जिल्ह्याच्या विकास अधिक जलद गतीने करतील. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यात आणल्या जातील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.  

मनसेचे नेते देविदास खेडकर यांनी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी डॉ. सुजय विखे पाटील यांना मतदान करण्याचे आवाहन केले.यावेळी पाथर्डी शेवगावमतदारसंघातीलअनेक गावातील सरपंच,उपसरपंच, आजी-माजी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *