DNA मराठी

“वाजपेयी-यशवंतरावांचा आदर्श, पण कारवाई कुठे?” – रोहित पवारांचा खोचक सवाल

come on rummy, maharaj, but where is the action rohit pawar o

मुंबई | प्रतिनिधी – राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात सभागृहात रमी खेळल्याचा आरोप झाल्यानंतर निर्माण झालेल्या वादळात आता सरकारसमोर गंभीर नैतिक आणि राजकीय प्रश्न उभे ठाकले आहेत. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सरकारने नेमलेली आंतरिम समिती आपला अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्याकडे सुपूर्त केला आहे. मात्र, अहवालात नेमके काय निष्कर्ष आहेत आणि त्यावर सरकार काय भूमिका घेणार, हे अद्याप गुलदस्त्यातच आहे.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) चे आक्रमक आमदार रोहित पवार यांनी आज सरकारवर जोरदार हल्ला चढवत, नैतिकतेचा बुरखा फाडण्याचा प्रयत्न केला.

सभागृहात १८ ते २२ मिनिटं कृषी मंत्री रमी खेळत असल्याचे स्पष्ट व्हिडिओ पुरावे समोर आहेत. हे संपूर्ण प्रकरण म्हणजे शेतकऱ्यांच्या समस्या, त्यांच्या अपेक्षा आणि त्यांच्या प्रश्नांवर पांघरुण घालण्याचा प्रयत्न आहे. इतक्या महत्त्वाच्या पदावर असलेला मंत्री जर सभागृहात असा वेळ घालवत असेल, तर त्या मंत्र्याच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होतं,” असे तीव्र शब्दात टीका करत रोहित पवार यांनी सरकारला कोंडीत पकडले.

“वारसा सांगून काही होत नाही, कृतीतून दाखवा!”

या मुद्द्यावरून रोहित पवार यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना लक्ष्य केले.

फडणवीस साहेब अटल बिहारी वाजपेयी यांचा वारसा सांगतात आणि दादा (अजित पवार) यशवंतराव चव्हाणांचा आदर्श घेतात, पण हे आदर्श केवळ भाषणात नको, कृतीतही दिसले पाहिजेत. आता प्रश्न आहे – या मंत्र्याने सभागृहात रमी खेळल्याच्या स्पष्ट पुराव्यानंतर तुम्ही काय निर्णय घेता?” असा खोचक सवाल रोहित पवार यांनी केला.

सरकारची भूमिका स्पष्ट होणार? मंत्रीपद धोक्यात?

सरकारकडून अद्याप या अहवालावरील भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही. अहवालात समितीने नेमके काय निष्कर्ष मांडले, दोष निश्चित केला का? मंत्री कोकाटेंना पाठीशी घालण्यात येणार का? की नैतिकतेच्या आधारावर कठोर निर्णय घेतला जाणार – या साऱ्या प्रश्नांची उत्तरे महाराष्ट्राला लवकरच मिळणार आहेत, अशी अपेक्षा आहे.

या संदर्भात बोलताना रोहित पवार पुढे म्हणाले –

सरकारकडे अहवाल गेला आहे, पण तो जनतेसमोर आणणे आवश्यक आहे. पारदर्शक कारभार म्हणजे काय याचे भान सरकारला राहिले आहे का? की एकमेकांचे पाप लपवण्याचा उद्योग सुरु आहे?

सभागृहाचा अपमान की शेतकऱ्यांची अवहेलना?

कृषी विभाग हे राज्याच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील आणि शेतकऱ्यांशी संबंधित मंत्रालय आहे. अशा परिस्थितीत कृषी मंत्रीच जर सभागृहात रमी खेळत असेल, तर हा केवळ सभागृहाचा अपमान नाही, तर शेतकऱ्यांच्याही विश्वासाला तडा जाण्याचा प्रकार आहे, असे मत राजकीय वर्तुळात मांडले जात आहे.

 रोहित पवार यांचा (प्रतिक्रिया):

“सभागृह म्हणजे लोकशाही मंदिर आहे. त्या ठिकाणी एखादा मंत्री २० मिनिटं रमी खेळत असेल, तर तो लोकशाहीचा, शेतकऱ्यांचा आणि जनतेच्या प्रश्नांचा अवमान आहे. अहवाल आला आहे, आता सरकारची खरी कसोटी सुरू झाली आहे. कारवाई झाली नाही, तर तुमच्या आदर्शांचा फोलपणा उघड होईल.”

 महत्त्वाचे मुद्दे:

  • माणिकराव कोकाटे यांच्यावर रमी खेळल्याचा आरोप
  • समितीचा अहवाल मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे
  • रोहित पवार यांची अहवाल जनतेसमोर सादर करण्याची मागणी
  • नैतिकतेवरून सरकारवर रोहित पवारांचा घणाघात
  • फडणवीस आणि अजित पवार यांच्या “आदर्शांवर” खोचक टीका

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *