Pune Ganesh Visarjan 2025 : पुणेसह संपूर्ण राज्यभरात आज गणेशोत्सवाचा जल्लोष पाहायला मिळत आहे. गणेश भक्त आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत आहेत. तर दुसरीकडे एक मोठी बातमी समोर आली आहे.
पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील वाकी बुद्रुक इथे गणेश विसर्जनादरम्यान दोन युवकांचा दुर्दैवी बुडून मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. पुणे जिल्ह्यात ही दुर्दैवी घटना घडल्याने परिसरातून याविषयी हळहळ व्यक्त केली जात आहे.
तर दुसरीकडे ठिकठिकाणच्या विहिरी तलाव नद्या याठिकाणी विसर्जनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने नागरिकांनी सर्तक रहावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.