Maharashtra Congress: राज्यात लवकरच विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्व राजकीय पक्षांनी जय्यत तयारी सुरु केली आहे. आगामी निवडणुकीत कोणाचा विजय होणार? हे लवकरच समजेल.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतही काँग्रेसला महाराष्ट्रात सर्वात जास्त जागांवर यश आलं आहे. त्यामुळे काँग्रेस नेत्यांचा आता आत्मविश्वास वाढला असून आगामी विधानसभा निवडणुकीत ते आपले उमेदवार निवडून रिंगणात उतरवू शकतात.
पण सूत्रांच्या माहितीनुसार काही विद्यमान आमदारांचं कामकाज पाहून काँग्रेस पक्ष विधानसभेच्या तिकीट कापण्याची शक्यता आहे. ज्यांचं मतदारसंघात काम चांगलं त्यांना पुन्हा उमेदवारी मिळणार आहे. यासाठी आमदारांच्या कामाचा अहवाल जमा केला जाणार आहे. “विधानसभा निवडणुकीत कोणत्याही बदमाशाला तिकीट दिलं जाणार नाही,” असं मोठं वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे.
“हायकमांडने हा निर्णय घेतला आहे की, कोणत्याही बदमाशांना आता विधानसभेचं तिकीट द्यायचं नाही. काही लोकं व्यापारासाठी येतात. त्यामुळे अशा कोणत्याही बदमाशांना या पक्षात स्थान दिलं जाणार नाही. तशी भूमिका काँग्रेसची आहे. आम्ही कोणालाही अभय दिलं नाही. ज्यांची चूक समोर आली आहे त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. चुकीला माफी नाही,” अशी भूमिका काँग्रेस हायकमांडची असल्याचे नाना पटोले यांनी केले आहे.
सध्या शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर गेले असून उद्धव ठाकरे दिल्लीत इंडिया आघाडीच्या काही प्रमुख नेत्यांची भेट घेतली. यात काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा समावेश असेल.