Dnamarathi.com

Manoj Jarange Patil : मराठा समाजाचा आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी 25 जानेवारी 2025 पासून जरांगे पाटील अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले आहे.

आज उपोषणाचा पाचवा दिवस असून जरांगे पाटील यांची प्रकृती चिंताजनक होत चालली आहे. मात्र तरीही सरकारच्यावतीने कोणीही जरांगे पाटील यांच्याकडे चर्चेसाठी आले नसल्याने जर जरांगे पाटील यांना काही झालं तर सरकारची जबाबदारी असणार असल्याचा निवेदन आज अखंड मराठा समाज अ.नगरच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, संघर्षयोद्धा मा. मनोज दादा जरांगे पाटील यांच्यासह इतर मराठा सेवक हे शनिवार दि. 25.01.2025 रोजी पासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे व मराठा समाजाच्या अन्य काही मागण्यांसाठी अंतरवाली सराटी ता. अंबड जि. जालना येथे सामुहिक आमरण उपोषणास बसलेले आहेत.

उपोषणाचा आजचा पाचवा दिवस उपोषण कर्त्यांची प्रकृती चिंताजनक होत चाललेली आहे. सरकार जाणीवपूर्वक या उपोषणाकडे दुर्लक्ष करत आहे. कारण अद्यापपर्यंत सरकारच्यावतीने कोणीही मा. मनोज दादा जरांगे यांच्याशी चर्चेसाठी गेलेले नाही.

आम्ही या निवदेनाद्वारे सूचित करतो की समाजाच्या संयमाचा बांध सुटत चाललेला आहे. तेंव्हा आपण या निवेदनाची गांभीर्याने दखल घेवून सरकार व शासनाच्या वतीने शिष्टमंडळ अथवा प्रतिनिधी पाठवून चर्चा करून मा. मनोज दादा जरांगे यांच्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा काही अनुचित प्रकार घडल्यास किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास आम्ही जबाबदार राहणार नाही ती सरकारची जबाबदारी असेल. असं या निवेदनात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *