HPCL Petrol: हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) या ऑईल कंपनीच्या सॅप प्रणालीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मागील 36 तासांपासून कंपनीचे पेट्रोल व डिझेल पुरवठा यंत्रणा ठप्प झाली आहेत. या अडचणीमुळे इंधन पुरवठा करणाऱ्या HPCL च्या देशभरातील सर्व डेपोमधून पेट्रोल पंप ला पुरवठ्याचे कामकाज ठप्प झालेले असून, परिणामी अनेक पेट्रोल पंपांवरील इंधन पुरवठा विस्कळीत झाला आहे.
कंपनीचे तांत्रिक तज्ञ सदर प्रणाली पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर करत असून, त्याचप्रमाणे सदर पुरवठा हा मॅन्युअल मोडमध्ये देखील सुरळित करण्याचे काम सुरू आहे परंतु सर्व प्रणाली संलग्न असल्याने त्यात देखील पाहिजे तशी सुधारणा होत नाहीये. त्यात सुधारणा न झाल्यास सर्व स्थिती सुरळीत होण्यासाठी अंदाजे आणखी 48 तास लागू शकतात.
नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी घाबरून जाऊ नये. ही केवळ तांत्रिक अडचण असून, पेट्रोल अथवा डिझेल याची कोणतीही टंचाई नाही. इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम यांसारख्या इतर कंपन्यांचे वितरण सुरळीत सुरू असून इंधन सहज उपलब्ध आहे.
तरी कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये आणि संयम राखावा इतर पंपावर गर्दी करू नये कोणत्याही प्रकारची इंधन टंचाई झालेली नाही केवळ तांत्रिक प्रणाली सदोष झाल्याने अडचण निर्माण झालेली आहे सर्व परिस्थिती लवकरच सामान्य होईल. अशी माहिती अमित गुप्ता अध्यक्ष फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्रा पेट्रोल डीलर्स असोसिएशन यांनी दिली आहे.