DNA मराठी

Raj Uddhav Thackeray Interview : राज्यकर्त्याचे प्रेम हे…, ठाकरे बंधूंच्या संयुक्त मुलाखतीचा टीझर प्रसिद्ध

thackeray

Raj Uddhav Thackeray Interview : महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पहिली संयुक्त मुलाखत नुकतीच चित्रित झाली आहे. ही ‘दणदणीत आणि खणखणीत’ मुलाखत शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत आणि दिग्दर्शक-अभिनेते महेश मांजरेकर यांनी घेतली.

या मुलाखतीचा टीझर ‘सामना’च्या अधिकृत X हँडल (@SaamanaOnline) वर शेअर करण्यात आला आहे. टीझरमध्ये राज ठाकरे म्हणतात, “राज्यकर्त्याचे प्रेम हे राज्यावर असले पाहिजे, सत्तेवर असता कामा नये!” तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत ते म्हणाले की, त्यांनी भ्रष्टाचाराच्या गोष्टी करू नयेत.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मुलाखतीला विशेष महत्त्व आहे. मुलाखतीचा पहिला भाग गुरुवार, 8 जानेवारी 2026 रोजी ‘सामना’च्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर प्रसारित होणार आहे.

ही संयुक्त मुलाखत ठाकरे बंधूंच्या राजकीय एकत्र येण्याचे प्रतीक मानली जात आहे, ज्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आलेय.

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीत मनसे आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र आल्याने तसेच भाजप – शिवसेना शिंदे गट युतीसह आणि काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवत असल्याने राजकीय समीकरणे बदलली आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *