Dnamarathi.com

Jamkhed News: 10 हजारांची लाच स्वीकारण्याची तयारी दर्शविणाऱ्या तलाठीला अँन्टी करप्शन ब्युरो, अहिल्यानगरने अटक केली आहे.

मुजीब अब्दुलरब शेख, तलाठी, तत्कालीन नेमणूक सजा हाळगाव, ता. जामखेड जि. अहिल्यानगर, सध्या नेमणूक तलाठी सजा सावरगावतळ, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर यांनी तक्रारदाराकडे 10 हजार रुपयांची मागणी केली होती.

माहितीनुसार, तक्रारदार यांचे वडिलांनी मौजे हाळगाव, ता. जामखेड येथील गट नंबर 155 मधील 1 हेक्टर 10 आर व गट नं. 154 मधील 2 हेक्टर 30 आर क्षेत्र खरेदी केले होते. सदर खरेदी खताची नोंद 7/12 उताऱ्यावर नोंद लावण्याच्या मोबदल्यात आलोसे यांनी 3000 रुपये रक्कमेची लाच मागणी केले.

याबाबतची तक्रार 30 मे 2024 रोजी ला. प्र. वि. अहिल्यानगर येथे प्राप्त झाली. त्यानुसार 30 मे 2024 रोजी लाच मागणी पडताळणी करण्यात आली. लाच मागणी पडताळणी कारवाई दरम्यान आलोसे यांनी पंचासमक्ष तक्रारदार यांचे नमूद खरेदी खताची नोंद 7/12 उताऱ्यावर लावण्याचा मोबदल्यात 10 हजार लाच मागणी करून सदर लाच रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवली. म्हणून आलोसे यांचे विरुद्ध जामखेड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोहेकॉ संतोष शिंदे, पोना चंद्रकांत काळे, पोलिस अंमलदार रवींद्र निमसे, बाबासाहेब कराड, चापोहेकॉ हारून शेख यांनी वरील कारवाई केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *