DNA मराठी

Tamilnadu news

Manoj Bharathiraja : तमिळ चित्रपटसृष्टीला धक्का: मनोज भारतीराजा निधन.

Manoj Bharathiraja : तमिळ चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. सुप्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक मनोज भारतीराजा यांचे चेन्नईमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या 48 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मनोज भारतीराजा हे प्रख्यात तमिळ दिग्दर्शक भारतीराजा यांचे पुत्र होते. त्यांच्या अकाली निधनाने संपूर्ण दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टी हळहळली आहे. अभिनय आणि दिग्दर्शन क्षेत्रातील योगदानमनोज भारतीराजा यांनी 1999 मध्ये त्यांच्या वडिलांनी दिग्दर्शित केलेल्या ‘ताजमहल’ या चित्रपटातून अभिनयाची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी ‘समुधिरम’, ‘अल्लु अर्जुन’, ‘वरुशामेलम वसंतम’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये लक्षणीय भूमिका साकारल्या. त्यांनी अभिनयाबरोबरच दिग्दर्शनातही पदार्पण केले होते. 2013 मध्ये त्यांनी ‘मार्गजी थिंगल’ या रोमँटिक ड्रामा चित्रपटाचे दिग्दर्शन केले. माहितीनुसार मनोज भारतीराजा यांना काही दिवसांपूर्वीच बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र त्यानंतरही त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले. तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांनी मनोज भारतीराजा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले, “त्यांनी ‘ताजमहल’, ‘समुधिरम’, ‘अल्लु अर्जुन’, ‘वरुशामेलम वसंतम’ यांसारख्या चित्रपटांमध्ये उत्कृष्ट अभिनय केला. त्यांनी दिग्दर्शनही केले. मी दिग्दर्शक भारतीराजा, त्यांचे कुटुंबीय आणि मित्रपरिवार यांच्याप्रती संवेदना व्यक्त करतो.” मनोज भारतीराजा यांच्या पश्चात त्यांची पत्नी नंदना आणि दोन मुली अर्शिता आणि मथिवाधानी असा परिवार आहे. अनेक कलाकार आणि राजकीय नेत्यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. अभिनेत्री खुशबू सुंदर यांनी सोशल मीडियावर लिहिले, “मनोज आता आपल्यात नाही हे ऐकून खूप मोठा धक्का बसला. त्यांचे अकाली निधन दुःखद आहे. ते फक्त 48 वर्षांचे होते. देव त्यांचे वडील थिरु भारतीराजा आणि त्यांच्या कुटुंबाला या असह्य वेदनादायक नुकसानातून सावरण्याची शक्ती देवो.”

Manoj Bharathiraja : तमिळ चित्रपटसृष्टीला धक्का: मनोज भारतीराजा निधन. Read More »

Tamil Nadu ₹ Symbol : तामिळनाडूत हिंदी विरोध, सरकारने अर्थसंकल्पातून ₹ चिन्ह काढले

Tamil Nadu ₹ Symbol : गेल्या काही दिवसांपासून तामिळनाडूमध्ये हिंदी भाषेचा विरोध मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. तर आता तमिळनाडू सरकारने मोठा निर्णय घेत राज्याच्या अर्थसंकल्पातून ₹ हे चिन्ह काढून टाकले आहे. त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्या सरकारने ₹ च्या जागी ‘ரூ’ (ru) चिन्ह स्वीकारले आहे, जे तमिळ लिपीतील एक अक्षर आहे. देशभरात ₹ चिन्ह बदलण्याची ही पहिलीच घटना आहे आणि तामिळनाडूमध्ये सुरू असलेल्या भाषा वादाशी याचा संबंध जोडला जात आहे. रुपया (₹) चिन्ह उदय कुमार धर्मलिंगम यांनी डिझाइन केलेल्या भारतीय तिरंग्यापासून प्रेरित होते. धर्मलिंगम हे तामिळनाडूचे आहेत आणि त्यांची रचना पाच निवडलेल्या चिन्हांमधून निवडण्यात आली. हे चिन्ह 2010 मध्ये स्वीकारण्यात आले आणि ते भारतीय चलनाचे अधिकृत चिन्ह बनले. विशेष म्हणजे, धर्मलिंगम हा तामिळनाडूतील एका माजी आमदाराचा मुलगा आहे. ₹ च्या जागी नवीन चिन्हआता, तामिळनाडू सरकारने ₹ चिन्हाऐवजी ‘ரூ’ चिन्ह लावण्याचा निर्णय राज्यात सुरू असलेल्या हिंदी विरोधी चळवळीशी जोडला जात आहे. तामिळनाडूमध्ये हिंदीविरुद्ध बऱ्याच काळापासून राजकीय संघर्ष सुरू आहे आणि अलीकडेच मुख्यमंत्री स्टॅलिन यांनीही या मुद्द्यावर विधान केले आहे. हिंदी लादण्याच्या प्रयत्नामुळे भारतातील प्राचीन भाषा धोक्यात आल्याचा आरोप त्यांनी केला होता. हिंदीच्या वाढत्या प्रभावामुळे अनेक स्थानिक भाषा नाहीशा होत आहेत, असे स्टॅलिन यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले होते. त्यांनी बिहार आणि उत्तर प्रदेशसारख्या ठिकाणच्या भाषांचे उदाहरण दिले, जिथे हिंदीच्या दबावाखाली स्थानिक भाषा मरत आहेत. त्यांच्या मते, हिंदीने अनेक भाषा आत्मसात केल्या आहेत आणि त्यामुळे त्या भाषांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. या निर्णयानंतर राज्यात पुन्हा भाषेबाबत वाद सुरू झाला आहे. तामिळनाडू सरकारच्या या पावलामुळे राज्याची, विशेषतः हिंदीबद्दलची भूमिका स्पष्ट होते आणि सांस्कृतिक ओळखीचे संरक्षण म्हणून त्याकडे पाहिले जात आहे.

Tamil Nadu ₹ Symbol : तामिळनाडूत हिंदी विरोध, सरकारने अर्थसंकल्पातून ₹ चिन्ह काढले Read More »

National News: मोठी बातमी! विषारी दारू प्यायल्याने 25 जणांचा मृत्यू, 60 हून अधिक रूग्णालयात दाखल

National News: एक मोठी बातमी समोर आली आहे. तामिळनाडूतील कल्लाकुरिची जिल्ह्यात विषारी दारू प्यायल्याने 25 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय 60 हून अधिक लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणाची माहिती देताना कुल्लाकुरिचीच्या डीएमने मृत्यूला दुजोरा दिला आहे. रुग्णालयात दाखल रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याचे त्यांनी सांगितले. आरोपी दारू विक्रेत्याला अटक विषारी दारूप्रकरणी कारवाई करताना पोलिसांनी अवैध दारू विक्रेते के. कन्नूकुट्टी यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे 200 लिटर अवैध दारू जप्त केली आहे. तपासणी केली असता त्यात मिथेनॉल आढळून आले. पोलीस पुढील कारवाईत व्यस्त आहेत. मुख्यमंत्र्यांनी शोक व्यक्त केला मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी विषारी दारू पिल्याने झालेल्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. यासोबतच अवैध दारूविक्री रोखण्यात अपयशी ठरलेल्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. स्टॅलिन यांनी ट्विटरवर एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, “कल्लाकुरिचीमध्ये भेसळयुक्त दारू पिणाऱ्या लोकांच्या मृत्यूची बातमी ऐकून मला धक्का बसला आणि दुःख झाले. या प्रकरणात सहभागी असलेल्यांना अटक करण्यात आली आहे. ते थांबवण्यात अपयशी ठरलेल्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली आहे.

National News: मोठी बातमी! विषारी दारू प्यायल्याने 25 जणांचा मृत्यू, 60 हून अधिक रूग्णालयात दाखल Read More »