DNA मराठी

Sujay Vikhe News

IMG 20240206 WA0005

Ahmednagar News: मिळणार रोजगार! बेलवंडी 618 एकरमध्ये उभारली जाणार उद्योग नगरी

Ahmednagar News:  आज मुंबई येथे राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षेखाली व उद्योगमंत्री उदय सांमत यांच्या प्रमुख उपस्थितीत अहमदनगर जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाची बैठक संपन्न झाली. यावेळी जिल्ह्यातील बेलवंडी ता. श्रीगोंदा येथील शेती महामंडळाच्या 618 एकर जमिनीवर एमआयडीसी उभारण्याला तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. सदर एमआयडीसीच्या आराखड्यासंदर्भात पाहणी व सर्वेक्षण लवकरात लवकर पूर्ण करून त्या संबंधित सर्व कामे काल मर्यादेत करण्यात यावीत असे निर्देश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी अधिकारांना दिले. एमआयडीसी सुरू करण्यासंदर्भात मोजणीचा अहवाल मागविण्यात आला आहे. पुढील प्रकियेस गती देण्यात येणार असून, तात्काळ हे काम पुर्ण करण्यात येणार असल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली. तसेच, जिल्हाधिकारी यांनी आजच उद्योग विभागाकडे विनंती प्रस्ताव सादर करावा असेही त्यांनी यावेळी सांगितले. श्रीगोंदा तालूक्यातील बेलवंडी फार्म येथे शेती महामंडळाची मौजे पर्वतवाडी आणि महादेववाडी येथील 618 एकर जमीन उद्योग विभागला देण्याची तत्वत: मान्यता यावेळी देण्यात आली. या एमआयडीसी करिता खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते यांनी पाठपुरावा केला होता.  उद्योगनगरीसाठी जमीन दिल्याने खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी राज्याचे महसूल मंत्री श्री. राधाकृष्ण विखे पाटील आणि उद्योगमंत्री श्री. उदय सांमत यांचे आभार व्यक्त केले.  खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी सांगितले की बेलवंडी मध्ये रस्ते वाहतूक, पाणी तसेच रेल्वे वाहतुक सुविधा उपलब्ध तर आहेच शिवाय शिर्डी, पुणे आणि नाशिक एमआयडीसी केंद्र नजीक असल्याने येणाऱ्या काळात बेलवंडी उद्योजकांना मोठी पर्वणीच ठरणार आहे. या एमआयडीसी मुळे जिल्ह्यात उद्योगाला चालना मिळून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध  होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, श्रीरामपूर तालुका व राहता तालुक्यातील शेती महामंडळाकडे असलेल्या जमिनीच्या समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. खंडकरी शेतकऱ्यांना वाटप केलेल्या जमिनींचा भोगवटादार वर्ग / मधुन भोगवटादार वर्ग 1 करणे तसेच सार्वजनिक प्रयोजनार्थ शेती महामंडळाची जमीन वाटप करणे संदर्भातील कामांचा आढावा मंत्री विखे पाटील यांनी घेतला. सदर बैठकीत खासदार डॉ. सुजय विखे पाटील, माजी मंत्री आमदार श्री.बबनराव पाचपुते, महसूल विभागाचे अप्पर सचिव श्री. राजगोपाल देवरा, अहमदनगरचे जिल्हाधिकारी श्री.सिद्धराम सालीमठ, शेती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. विश्वजित माने यांच्यासह महसूल आणि शेती महामंडळ पुणे यांचे अधिकारी उपस्थित होते.

Ahmednagar News: मिळणार रोजगार! बेलवंडी 618 एकरमध्ये उभारली जाणार उद्योग नगरी Read More »

MP Sujay Vikhe

Sujay Vikhe : खा. सुजय विखे यांच्या पाठपुराव्याला यश! ‘या’ योजनांना प्रशासकीय मान्यता..

Sujay Vikhe : अहमदनगर जिल्ह्याच्या विविध तालुक्यांतील ० ते १०० हेक्टर सिंचन क्षमतेच्या सुमारे १५ को.प. बंधारे आणि गे.सी. बंधारे योजनांना महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाकडून प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याची माहिती खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली. खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी या योजनांना प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते. आज त्या प्रयत्नांना आणि वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाल्याने आनंद वाटत असल्याचे मत खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.    या योजनांच्या कामासाठी भरीव निधी मंजूर झाला असून मृद व जलसंधारण विभागाच्या सन २०२२-२३ च्या दरसूचीवर आधारित कामाप्रित्यर्थ सुमारे ८.५ कोटी रुपये व अनुषंगिक खर्चासाठी ६५ लक्ष रुपये अशा एकूण अंदाजित ९.५ कोटी रुपयांच्या किमतीस मान्यता प्रदान करण्यात आली आहे.  तसेच सदर योजनांच्या प्रशासकीय मान्यता अंदाजपत्रकानुसार या बंधाऱ्यांची एकूण साठवण क्षमता ५३०.२८ स.घ.मी. असून नियोजित एकूण सिंचन क्षमता १९६ हेक्टर इतकी असल्याचे खासदार सुजय विखे यांनी सांगितले.  या योजनेमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील विविध तालुक्यांचा समावेश करण्यात आला असून यापैकी नगर तालुक्यात दोन, पाथर्डी-५, पारनेर-२, श्रीगोंदा-३ आणि शेवगाव, जामखेड आणि कर्जत तालुक्यातील प्रत्येकी एका जागेची अशा एकूण १५ जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. दरम्यान खासदार विखेंनी सदरील भरीव रकमेस मान्यता मिळवून दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार व्यक्त केले.

Sujay Vikhe : खा. सुजय विखे यांच्या पाठपुराव्याला यश! ‘या’ योजनांना प्रशासकीय मान्यता.. Read More »

IMG 20240120 WA0012

Sujay Vikhe News: खा. सुजय विखे यांनी शिवकथाकार प्रदिप मिश्रा यांना नगर जिल्ह्यात शिवकथा सादर करण्यासाठी केले आमंत्रित..

Sujay Vikhe News: आज खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी चाळीसगाव येथे शिवकथाकार परमपूज्य प्रदिपजी मिश्रा (सिहोरवाले) यांची भेट घेऊन अहमदनगर शहरात शिवमहापुराण कथा कार्यक्रम सादर करण्यासाठी त्यांना आमंत्रित केले. जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री. उन्मेष पाटील यांच्या वतीने चाळीसगाव येथे व्यास भागवत कथेचे आंतरराष्ट्रीय प्रवक्ता प्रदिपजी मिश्रा यांचा प्रभू श्रीराम शिवमहापुराण कथेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सदरील भव्य कार्यक्रम अहमदनगर जिल्ह्यातही व्हावा या अनुषंगाने सदर ठिकाणी जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांच्यासमवेत सुजय विखेंनी प्रदीप मिश्रा यांची भेट घेतली. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शिव महापुराण कथा विमोचनकर पंडित प्रदीप मिश्रा यांचा ‘प्रवचन सोहळा’ पूर्ण श्रध्देने आणि सुव्यवस्था राखून यशस्वी करणार असल्याचा निर्धार यावेळी सुजय विखे यांनी बोलून दाखविला.

Sujay Vikhe News: खा. सुजय विखे यांनी शिवकथाकार प्रदिप मिश्रा यांना नगर जिल्ह्यात शिवकथा सादर करण्यासाठी केले आमंत्रित.. Read More »

IMG 20231228 WA0011

Sujay Vikhe News : शेवटच्या गावापर्यंत पाणी सोडले जाईल- खा.डॉ. सुजय विखे पाटील

Sujay Vikhe News: 22 जानेवारी रोजी अयोध्येत प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा होईल आणि निळवंडे मधून राहुरी तालुक्यातील शेवटच्या गावापर्यंत पाणी सोडले जाईल हे दोनही सण नागरिकांनी मोठ्या उत्साहामध्ये साजरे करावेत. मात्र हे सर्व काही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे शक्य झाले असल्याचे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले आहे.  राहुरी तालुक्यातील कनगर या ठिकाणी खासदार सुजय विखे पाटील यांच्या शुभहस्ते व माजी मंत्री व जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली पंचक्रोशीतील नागरिकांना साखर व हरभरा डाळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस सरकारच्या माध्यमातून तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दूरदृष्टीकोनातून तालुक्यामध्ये व जिल्ह्यामध्ये अनेक विकास कामे मार्गी लागत आहेत. गेल्या दीड वर्षाच्या कालावधीत ज्या गतीने कामे मार्गी लागली ती कामे विरोधी पक्षाकडे तीन वर्ष सत्ता असूनही लागली नाहीत असे मत यावेळी सुजय विखेंनी मांडले.  तसेच पुढे ते म्हणाले की, साखर व हरभरा डाळ वाटणे ही शासनाची योजना नसून येत्या 22 जानेवारीला अयोध्येत प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्यानिमित्ताने हे वाटप केले जात आहे असे त्यांनी सांगितले. हा आपल्यासाठी एक प्रकारे मोठा सण असून या निमित्ताने साखर व डाळीच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबीयांनी लाडू बनवून श्री रामांना वहावे व श्रीरामांची पूजा करावी आणि त्यांना लाडूचा नैवेद्य दाखवावा हा उद्देश यामागे असून आपल्यासाठी ही दुसरी दिवाळी आहे असे मत खासदार सुजय विखेंनी मांडले.  तरी अतिशय शुद्ध हेतूने सदरील उपक्रम राबविण्यात येत असून विरोधकांनी यावर कसलेही राजकारण करू नये असे आवाहन देखील त्यांनी केले. तसेच पुढे त्यांनी निळवंडे संदर्भात भाष्य केले. विखे घराणे निळवंडेचे पाणी येऊन देणार नाही अशी वल्गना नेहमी विरोधकांनी करून घाणेरडे राजकारण केले, मात्र आम्ही सर्व सामान्य नागरिकांच्या आणि शेतकऱ्यांच्या बरोबर आहोत. यासाठी आमच्या शासनाने सर्वाधिक निधी मंजूर केला आणि विखे घराण्याचे पालकमंत्री असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून निळवंडे ला पाणी सोडण्यात आले असे देखील त्यांनी स्पष्ट केले. तसेच त्यांनी यावेळी सांगितले की, येत्या 22 तारखेला निळवंडे कालव्याच्या शेवटच्या टोकापर्यंत राहुरी तालुक्यामध्ये पालकमंत्री पाणी सोडतील. तो अधिकार त्यांचा आहे. तसेच कनगरच्या वर्ग दोनच्या जमिनीचा प्रश्न देखील अगदी कमी कालावधीमध्ये मार्गी लावला जाईल असेही त्यांनी आश्वासन दिले व सत्तेचा वापर हा केवळ जनकल्याणासाठीच केला जाईल. विखे घराने जे काम हाती घेतले ते पूर्णत्वास जातेच त्यामुळे कुणीही काळजी करू नये असे देखील त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी सांगितले की, खासदार डॉ. सुजय विखे पाटील व पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून तालुक्यामध्ये अनेक विकास कामे मार्गी लागत असून विकासक दृष्टी ठेवणारे हे सर्वसामान्यांचे नेते आहेत असे प्रतिपादन केले.  तसेच त्यांनी विरोधकांवर निशाणा साधत विरोधकांची सत्ता असल्यावर कोणतीही विकासकामे करण्यात आली नाही. केवळ सत्तेचा उपभोग घेण्यात आला असे स्पष्ट केले. तसेच महाविकास आघाडीच्या कालावधीमध्ये जे नामदार झाले त्यांचे काम शून्य असल्याने नागरिकांना आज देखील अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.  विद्युत खाते असताना देखील शेतकऱ्यांना पूर्ण क्षमतेने वीज न देऊ शकणाऱ्यांनी इतरांवर आरोप करणे थांबवावे असे देखील त्यांनी स्पष्ट केले. निधी पालकमंत्री व खासदार आणतात आणि श्रेय घेण्यासाठी त्याचे भूमिपूजन विद्यमान आमदार करतात हे कुठपर्यंत योग्य आहे, असा सवाल विचारून येत्या निवडणुकीमध्ये जनता यांना त्यांची जागा दाखवून देईल अशा शब्दांत त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला. तसेच 50 वर्षांपासून रखडलेला निळवंडेचा प्रश्न पंचवीस वर्षे आमदार असणारे का सोडू शकले नाहीत याचे उत्तर त्यांनी शेतकऱ्यांना व समस्त जनतेला द्यावे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये कनगरच्या गावासंदर्भातील वन खात्याचा प्रश्न देखील पालकमंत्री मार्गी लावणार असून प्रत्येकाच्या शेताला पाणी देखील मिळणार आहे.  निळवंडेच्या माध्यमातून परिसरातील तलाव देखील पूर्ण क्षमतेने भरून मिळतील याबाबत सर्वांनी निश्चिंत राहावे असे त्यांनी सांगितले. तसेच निळवंडे बाबत आमचे योगदान नाही असे म्हणणाऱ्यांनी आम्ही निळवंडे साठी काय काय केले हे तपासले पाहिजे. तुम्ही घरी बसून बाता मारता, मात्र आम्ही प्रत्यक्षात नागरिकांसाठी काम करतो. तुमचे 50 वर्षांमध्ये निळवंडेसाठी योगदान काय? असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी विरोधकांना विचारला. या कार्यक्रमास भाजपाचे तालुकाध्यक्ष सुरेश दादा बनकर, संदीप गिते, विजय कानडे, दिपक वाबळे, अमोल भनगडे, दादा पाटील हारदे, मयूर हारदे, विजय बलमे, सरपंच सर्जेराव घाडगे, उपसरपंच बाळासाहेब गाढे, बाबासाहेब गाढे, संदीप घाडगे, महमद भाई इनामदार, दत्तू गाढे, सोसायटी चेअरमन दत्तात्रय गाढे, भगवान घाडगे, सुभाष नालकर, भाऊसाहेब घाडगे, राजेद्र दिवे, शंकर राव जाधव, यशवंतराव जाधव, तुषार गाढे, दादासाहेब घाडगे, सुनील शेटे, गोविंदराव दिवे आदी मान्यवर उपस्थित होते.

Sujay Vikhe News : शेवटच्या गावापर्यंत पाणी सोडले जाईल- खा.डॉ. सुजय विखे पाटील Read More »