DNA मराठी

Shevgaon News

shevgaon

Shevgaon News : भगवानबाबा मल्टीस्टेट सोसायटीकडून 24.75 लाखांची फसवणूक; गुन्हा दाखल

Shevgaon News: भगवानबाबा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, शाखा बोधेगाव (ता. शेवगांव) येथील पदाधिकाऱ्यांनी आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून ठेवीदाराची तब्बल 21 लाख 75 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे. याप्रकरणी बालमटाकळी येथील शेतकरी महेश संभाजीराव लांडे (वय 34) यांनी शेवगांव पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. फिर्यादी लांडे यांनी शेतीतून साठवलेली रक्कम संस्थेच्या चेअरमन मंदाकिनी रंगनाथ वैद्य, व्हा. चेअरमन मयूर रंगनाथ वैद्य तसेच संचालक मंडळाच्या आश्वासनावर विश्वास ठेवून मुदत ठेवी स्वरूपात गुंतवली. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यवहार पारदर्शक असून कोणताही तोटा होणार नाही, तसेच 11 ते 15 टक्के परतावा देण्याची हमी दिली होती. त्यानुसार फिर्यादी, त्यांचे वडील व भाऊ यांच्या नावावर वेगवेगळ्या तारखांना एकूण 24.75 लाख रुपयांच्या मुदत ठेवी करण्यात आल्या. मात्र मुदत संपूनही मुद्दल व व्याजाची रक्कम देण्यास संस्थेचे पदाधिकारी टाळाटाळ करीत असल्याचा आरोप आहे. घराची पडझड झाल्याने व तातडीच्या आर्थिक गरजेमुळे पैसे मागितले असता आश्वासने देत वेळकाढूपणा करण्यात आला. यामुळे फिर्यादी मानसिक व आर्थिक अडचणीत सापडला आहे. या प्रकरणात संबंधित पदाधिकाऱ्यांविरोधात संगनमताने आर्थिक फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करून एमपीआयडी कायद्यान्वये कठोर कारवाई करण्याची मागणी फिर्यादीने केली आहे. पोलिसांनी तक्रारीची दखल घेत पुढील तपास सुरू केला आहे.

Shevgaon News : भगवानबाबा मल्टीस्टेट सोसायटीकडून 24.75 लाखांची फसवणूक; गुन्हा दाखल Read More »

शेवगाव तालुक्यातील ग्रामस्थांनी मागितली सामूहिक आत्महत्येची परवानगी, कारण काय?

Maharashtra News: गोळेगाव तालुका शेवगाव, अहिल्यानगर जिल्ह्यातील ग्रामस्थांनी एक अघटीत पाऊल उचलून सामूहिक आत्महत्येची परवानगी मागितली आहे. हा निर्णय त्यांना दुष्काळाच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये विविध सरकारी योजनांसाठी केलेल्या मागण्या व प्रयत्नांच्या निष्फळतेमुळे घ्यावा लागला आहे. गोळेगाव येथील पाझर तलावाची दुरुस्ती, भूजल विकास यंत्रणेच्या मार्फत अनुदानित विहिरीचा लाभ, आणि दुष्काळी गावांसाठी पोखरा योजनेत समावेश ही त्यांच्या मुख्य मागण्या आहेत. 5 एप्रिल रोजी देण्यात आलेल्या निवेदनात ग्रामस्थांनी तीन प्रमुख मागण्या मांडल्या आहेत. पाझर तलावाची दुरुस्ती: जेणेकरून पाणी साठवण क्षमता वाढून नदीपात्रात पाणी सोडता येईल. अनुदानित विहिरीचा लाभ: भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा यांच्या मार्फत शेतकऱ्यांना अनुदानित विहिरीचा लाभ मिळवून देण्यात यावा. पोखरा योजनेत समावेश: दुष्काळी गावांसाठी पोखरा योजनेत समाविष्ट करण्यात यावे(रेफरन्स नसणे). तर दुसरीकडे यापूर्वी 24 फेब्रुवारी 2025 पासून या मागण्यांसाठी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले होते. यावेळी पाझर तलावात जलआंदोलन, तसेच रस्तारोको आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. प्रशासनाची प्रतिक्रियाग्रामस्थांच्या आंदोलनाला जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी पाझर तलावाचे काम जलसंधारण विभागाच्या मार्फत होत असल्याचे सांगितले. दरम्यान, जलसंधारण विभागाचे अधिकारी तोंडी आश्वासन देत असताना लेखी आश्वासन दिले नाही. तसेच, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ प्रस्ताव पाठविण्याचे आश्वासन दिले होते. आत्महत्येची परवानगीदोन्ही विभागांनी आश्वासन देऊनही काम पुढील कार्यवाही न झाल्यामुळे ग्रामस्थ सामूहिक आत्महत्येच्या हद्दीत पोहोचले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, सिंचनासाठी आवश्यक पाझर तलावाची दुरुस्ती न केल्याने शेतकऱ्यांची कोंडी होत आहे, तर अनुदानित विहिरीच्या अभावामुळे शेती पणन कठीण होत आहे. या बाबतीत शासनाकडून अधिकृत प्रतिसाद नसल्याचे दिसून येत आहे. ग्रामस्थांच्या सामूहिक आत्महत्येच्या धमकीमुळे प्रशासनासाठी त्वरित पावले उचलणे गरजही बनले आहे. या मागण्यांवर तातडीने संवाद साधून समाधानकारक निर्णय घेतल्यास गावात शांतता राखता येईल.

शेवगाव तालुक्यातील ग्रामस्थांनी मागितली सामूहिक आत्महत्येची परवानगी, कारण काय? Read More »

Maharashtra News: खोटे गुन्हे दाखल करून ग्रामस्थांना वेठिस धरणाऱ्यावर कारवाई करा

Maharashtra News: शेवगाव तालुक्याच्या शेकटे बुद्रुक येथील ग्रामस्थ पांडुरंग श्रीधर कोरडे हा गावातील सामाजिक, राजकीय व सांप्रदायिक कार्यक्रमांमध्ये वारंवार हस्तक्षेप करून ग्रामस्थांना वेठीस धरून त्रास देत असुन येथीलच वयोवृद्ध भाऊसाहेब महाराज गरड यांना आर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून त्यांच्या कुटुंबीयांवर पोलिसात खोटे गुन्हे दाखल केल्याने आणी गावातील कोणत्याही सामाजिक व विकास कामात अडथळा निर्माण करून खंडणी सारखे प्रकार करीत असल्याने त्यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी गावातील किमान ३० ते ३५ ग्रामस्थांनी शेवगाव पोलिसात निवेदन दिले आहे. कोरडे यांच्यावर कारवाई न झाल्यास येत्या सोमवार दिनांक १० मार्च रोजी शेवगाव-गेवराई राज्य महामार्गावर सुकळी फाट्यावर रास्ता रोको करण्यात येणार असल्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला. यावेळी प्रहार दिव्यांग संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्ष लक्ष्मीताई देशमुख, जनशक्ती विकास आघाडीचे तालुका उपाध्यक्ष हरिश्चंद्र फाटे, जगन्नाथ महाराज गरड, शिवदर्शन गरड, वंचित बहुजन आघाडीचे गणेश बोरुडे, श्रीकिसन काकडे , अंकश गरड आदींसह ग्रामस्थ गावकरीत मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Maharashtra News: खोटे गुन्हे दाखल करून ग्रामस्थांना वेठिस धरणाऱ्यावर कारवाई करा Read More »

BJP News : भाजपचे शेवगांव तालुकाध्यक्ष तुषार वैद्य यांचा राजीनामा…..!

BJP News: शेवगाव तालुका भारतीय जनता पार्टीचे विद्यमान तालुका अध्यक्ष तुषार वैद्य यांनी भाजपा तालुका अध्यक्ष पदाचा राजीनामा भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांच्याकडे  दिला आहे. तुषार वैद्य यांनी दिलेल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे की, दि. ६ फेब्रुवारी २०२४ रोजी मला शेवगाव तालुका भाजपा अध्यक्ष या पदाची जबाबदारी दिली होती. दिलेल्या पदाचा मी पक्ष वाढीसाठी माझ्यापरीने प्रयत्न केला दरम्यानच्या काळात लोकसभेसाठी गावोगाव जाऊन पक्षाचे विकास कार्य व लोक प्रतिनिधींची विकास कामे सांगून लोकांपर्यंत पोहचवण्याच काम केले. परंतु नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान आमदार मोनिकाताई राजळे व त्यांचे समर्थक यांच्या विचारांच्या मतभेदामुळे मी व आमची कार्यकारिणी प्रचारादरम्यान सहभागी झालो नाही. कारण शेवगाव तालुका भाजपा पक्ष संघटना वाढीसाठी मागील ३० ते ३५ वर्षाचा इतिहास पाहीला तर माझे वडील स्व. शिवनाथ अण्णा वैद्य यांनी त्यांच्या अनेक सहकाऱ्यांना बरोबर घेऊन लोकनेते. स्व. गोपीनाथ मुंढे व स्व. दिलीप गांधी यांच्या नेतृत्वात शेवगाव तालुक्यात भाजपा पक्ष वाढीसाठी अतिशय कष्ट घेतले. अनेक सहकाऱ्यांच्या माध्यमातून तालुक्यात प्रस्थापीतांच्या विरोधात पक्ष संघटना वाढवीली हे करत असताना फार मोठ्या प्रमाणात संघर्ष करावा लागला. नंतर मी देखील माझ्या परीने अगदी प्रामाणीकपणे पक्षनीष्टा जोपासून सर्वांना बरोबर घेऊन पक्ष वाढीसाठी अनेक ठिकाणी शाखा उघडण्यात आल्या नवीन कार्यकर्ते संघटीत केले.  २०१४ विधानसभेसाठी आ. मोनिकाताईना पक्षाने संधी दिली, २०१९ ला दिली आम्ही प्रामाणीक काम केल. परंतु २०१४ ते २०२४ पर्यंत आमदार ताईचे कार्यकर्ते व जुनी भाजपा यांमध्ये पाहीजे तेवढे सौख्य राहीले नाही. आम्ही पटले नाही तरी पक्षाचा उमेदवार म्हणून काम केले परंतु स्थानीक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जसे की जी.प., पं. स. तसेच ग्रामपंचायत मध्ये राजळे गटाने जुन्या भाजपाला कायम विरोध केल्याचे निदर्शनास आले. तेव्हा या वेळी २०२४ ला विधानसभेच्या पक्षाच्या मुळ कार्यकर्त्याला म्हणजे अरुण भाऊ मुंढे यांना पक्षाने उमेदवारी द्यावी असा आग्रह आम्ही म्हणजे जवळपास ८० % जुन्या भाजपा कार्यकर्त्यांनी धरला होता. परंतु त्याला यश आले नाही. पक्षाने मोनिकाताईंना उमेदवारी दिल्याने मागील १० वर्षाचा अनुभव पाहता आम्हाला मीळालेली वागणूक पाहता यावेळी आमच्या विचारांच्या लोकांनी मोनिकाताईचे काम करण्याची मानसीकता राहीली नव्हती. म्हणून मी व आमच्या विचारांच्या लोकांनी शांत बसण्याचा निर्णय घेतला होता. कारण आमदारांच्या कार्यकर्त्यांनी येथून मागे प्रमाणीकपणाने काम करून देखील आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. यावेळी तर आम्ही उघडपणे पक्षाकडे तिकीट बदलासाठी भूमीका घेतली होती. आम्ही जरी पक्षाचा उमेदवार या नात्याने काम केले असते तरी त्यांनी ते मान्य केले नसते म्हणून शांत बसलो विधानसभेला पक्षासाठी काम केले नाही.  मी पदावर असून देखील मी या विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाचे काम न करता शांत बसलो. या गोष्टीची नैतिक जबाबदारी स्वीकारून मी भाजपा तालुका अध्यक्ष या पदाचा राजीनामा देत आहे.  असे दिलेल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे. पक्षवादीसाठी यांना देखील करावे लागले संघर्ष…..!स्व. शिवनाथ अण्णा वैद्य यांनी त्यांच्या अनेक सहकाऱ्यांना बरोबर घेऊन लोकनेते. स्व. गोपीनाथ मुंढे व स्व. दिलीप गांधी यांच्या नेतृत्वात शेवगाव तालुक्यात भाजपा पक्ष वाढीसाठी अतिशय कष्ट घेतले. त्यांना सहकार्य लाभलेल्यांमध्ये स्व. भाऊसाहेब कोल्हे, पांडुरंग लांडे, भीमराज सागडे, तानाजी मालुसरे, डॉ. सोनाजी लांडे, स्व. विष्णुपंत देहडराय, काशीनाथ चौधरी, पांडुरंग मिसाळ, बाळासाहेब सोनवणे, बाळासाहेब कोळगे, कचरू चोथे, अरून मुंढे, विक्रम देशमुख, स्व. अंकुश केसभट, अशोकशेठ आहुजा, बंडूशेठ रासने, विजय देवळालीकर, राजाभाऊ लड्डा, छोटूशेठ लड्डा. शेतकरी संघटनेचे ताराभाऊ लोंढे, बापूसाहेब पाटेकर, नितीन काकडे, विनायक खेडकर, परशुराम गरड, स्व. सखाराम निर्मळ, गोपाळशेठ शर्मा, हरिभाऊ झुंबड, शब्बीरभाई राक्षीवाले, मारुतराव नागरे, स्व. गहीनीनाथ ढाकणे, बबनराव ढाकणे, आविनाश मगरे, पंडीतराव नेमाने, गोविंदराव बर्डे, रवी तानवडे, संजय टाकळकर, उद्धव काजळे, डॉ. मंत्री तसेच बालमटाकळी मधील अनेक सहकाऱ्यांच्या माध्यमातून तालुक्यात प्रस्थापीतांच्या विरोधात पक्ष संघटना वाढवीली हे करत असताना फार मोठ्या प्रमाणात संघर्ष करावा लागला.

BJP News : भाजपचे शेवगांव तालुकाध्यक्ष तुषार वैद्य यांचा राजीनामा…..! Read More »