DNA मराठी

Rani lanke

rani lanke

Rani Lanke: विधान परिषदेचे बिगुल! राणी लंके विधानपरिषद लढवणार; अर्ज दाखल करणार?

Rani Lanke: महाराष्ट्र विधान परिषद अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या वतीने खासदार निलेश लंके यांच्या पत्नी तथा तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य राणी लंके ह्या उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे उत्तर जिल्हाध्यक्ष संदीप वर्पे यांनी दिली आहे दरम्यान विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर राणी लंके या आता विधान परिषदेत आपलं नशीब आजमावत आहे. विधान परिषद निवडणुकीचे बिगल वाजले असून अनेक इच्छुकांकडून जोरदार मोर्चे बांधणी देखील सुरू आहे यातच राष्ट्रवादीच्या असलेल्या या जागेवर भाजपने दावा केला असून राष्ट्रवादीतून भाजपमध्ये नुकत्याच प्रवेश केलेले प्राजक्त तनपुरे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. यातच आता महाविकास आघाडी देखील आपले उमेदवार घेऊन या निवडणुकीत सज्ज झाली आहे. ससाने दीप चव्हाणसह लंके विधान परिषदेच्या मैदानात श्रीरामपूर मधून करण ससाने यांच्यासह नुकतेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये काँग्रेसचे नगर शहर अध्यक्ष दीप चव्हाण यांना देखील उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. तर आता राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातून खासदार निलेश लंके यांच्या पत्नी तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य राहिलेल्या राणी लंके यादेखील उद्या म्हणजे सोमवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती संदीप वर्पे यांनी दिली. आमदार जगताप यांचे बंधू देखील इच्छुक महायुतीकडून विधान परिषदेची उमेदवारी राष्ट्रवादी मधून नुकतेच भाजपमध्ये दाखल झालेले प्राजक्त तनपुरे यांना दिले जाणार असल्याचे खात्रीलायक माहिती आहे मात्र राष्ट्रवादीच्या या जागेवरती आमदार संग्राम जगताप यांचे बंधू सचिन जगताप हे देखील जागा लढवण्यास इच्छुक आहे तसेच त्यांनी अर्ज देखील घेऊन गेले आहेत यामुळे महायुतीमध्ये देखील उमेदवारीवरून धसपूस पाहायला मिळते. अहिल्यानगर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत भाजपचे तुल्यबळ हे मतदार स्वरूपात जास्त आहे यातच तनपुरे यांच्या बाजीप्रवेशाने तनपुरे यांचा जनसेवा पॅनलचे मत देखील भाजपला मिळणार असून आता आमदार सत्यजित कदम यांच्या संगमनेर सेवा समिती चे नगरसेवक काय भूमिका घेणार तसेच तांबे काय निर्णय घेणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Rani Lanke: विधान परिषदेचे बिगुल! राणी लंके विधानपरिषद लढवणार; अर्ज दाखल करणार? Read More »

Maharashtra News: आम्ही लोकसभा लढवणारच.. राणी लंके

Maharashtra News: समोर कोणीही उमेदवार असला तरी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातुन  येणारी लोकसभा निवडणूक लढणारच असल्याचे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या राणी लंके यांनी स्पष्ट केले आहे.  शिवस्वराज्य यात्रेचा शुभारंभ मोहटादेवी गडावरून आज करण्यात आला. यानंतर पाथर्डी इथे पत्रकार परिषदेत बोलताना राणी लंके यांनी मला उमेदवारी करावी लागली तर मी लोकसभा निवडणुक नक्कीच लढवणार असे स्पष्टपणे सांगितले. लोकसभेला आ.निलेश लंके उमेदवार असणार का आपण, आपली तयारी आहे का? या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर राणी लंके यांनी येणारी लोकसभा निवडणूक लढवणार आहोत. मतदारसंघात अनेक प्रश्न प्रलंबित असून त्याची सोडवणूक करण्यासाठी आम्ही तयार आहोत हे सांगत नगर दक्षिणेतून आ.निलेश लंके अथवा आपण स्वतः निवडणूक लढवणारच असे सांगण्याचा प्रयत्न केला.  राणी लंके यांच्या वक्तव्यावरून समोर कोण उमेदवार असेल याची चिंता नसून कोणीही उमेदवार असला तरी लंके दांपत्यापैकी एकजण निवडणुकीच्या रिंगणात असेल असे आता स्पष्ट होत आहे.  शिवस्वराज्य यात्रा नगर दक्षिण मतदारसंघात असून सर्व सातही तालुक्यातील प्रत्येक गावात जाणार असून यासाठी पाच शिवस्वराज्य रथ तयार करण्यात आले आहेत. यात्रेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा आणि हिंदवी स्वराज्याचा इतिहास शिवअभ्यासक लोकांसमोर मांडणार आहेत.  पंधरा दिवस यात्रा चालणार असून समारोप नगर शहरात आ.निलेश लंके यांच्या उपस्थितीत होणार आहे. आमदार लोकनेते निलेश लंके यांच्या संकल्पनेतून शिवस्वराज्य यात्रा मराठी माणसांची अस्मिता आणि अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यास 350 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने शिवराय मनामनात.. शिवराय घराघरात ! पोहचविण्यासाठी आम्ही घेऊन येतोय नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात शिवस्वराज्य यात्रा या यात्रेचा प्रारंभ आज सौ. राणीताई लंके यांनी आई मोहटा देवीचे दर्शन घेऊन केला. यावेळी उपस्थित सर्व सहकारी होते.

Maharashtra News: आम्ही लोकसभा लढवणारच.. राणी लंके Read More »