DNA मराठी

Ram Shinde

श्री क्षेत्र चौंडी विकास आराखड्यासंदर्भातील कार्यवाही तातडीने करण्याचे सभापती प्रा.राम शिंदे यांचे निर्देश

Ram Shinde: पुढील महिन्यात दिनांक 31 मे, 2025 रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300 वी जयंती येत असून त्यानिमित्त त्यांचे जन्मगाव चौंडी, ता.जामखेड, जि.अहिल्यानगर येथे संपूर्ण देशभरातील पर्यटक आणि इतिहासप्रेमींना आकर्षित करेल, त्यांचे असामान्य कार्यकर्तृत्व सर्वांपर्यंत पोहचेल अशा श्री क्षेत्र चौंडी विकास आराखड्यासंदर्भातील कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी दिले. आज विधान भवन, मुंबई येथे त्यांच्या अध्यक्षतेखाली राज्य शासनाच्या मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक आणि दूरदृष्यप्रणालीद्वारे नाशिक विभागीय महसूल आयुक्त प्रवीण गेडाम, अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता भरतकुमार बावीस्कर यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.  श्री क्षेत्र चौंडी विकास आराखडा हा सर्व दृष्टीने परिपूर्ण असावा, तसेच सर्व संबंधित विभागांची जिल्हाधिकारी यांनी आपल्या स्तरावर चौंडी येथे बैठक घेऊन आराखड्याच्या कामास गती द्यावी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळाचे सुशोभीकरण, त्यांनी संदेश दिलेल्या जलसंवर्धन, वृक्षसंवर्धन संकल्पनांची जपणूक, चौंडी येथे देशभरातून येणाऱ्या पर्यटकांसाठी सुव्यवस्थित रस्ते, संग्रहालय, महादेव मंदिर आणि चौंडीश्वरी मंदिर जीर्णोध्दार, निवास व्यवस्था, सुसज्ज वाहनतळ, स्थानिक उत्पादने, खाद्यपदार्थ यांची बाजारपेठ या सोयीसुविधांना प्राधान्य देण्यात यावे, असे महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे आणि मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी आदेशीत केले.  या बैठकीत मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना चौंडी येथे होणाऱ्या प्रस्तावित मंत्रीमंडळ बैठक आयोजनासंदर्भात महत्वपूर्ण सूचना दिल्या. अशा प्रकारे ग्रामीण ठिकाणी होणारी ही राज्य मंत्रीमंडळाची पहिलीच बैठक आहे. श्री क्षेत्र चौंडी विकास आराखडा हा सर्व दृष्टीने परिपूर्ण असावा, तसेच सर्व संबंधित विभागांची जिल्हाधिकारी यांनी आपल्या स्तरावर चौंडी येथे बैठक घेऊन आराखड्याच्या कामास गती द्यावी, असेही यावेळी निश्चित करण्यात आले. बैठकीत प्रस्तावित आराखड्याबाबत स्थापत्य विशारद किरण कलमदानी यांनी सादरीकरण केले.

श्री क्षेत्र चौंडी विकास आराखड्यासंदर्भातील कार्यवाही तातडीने करण्याचे सभापती प्रा.राम शिंदे यांचे निर्देश Read More »

कर्जत नगरपंचायतीत राजकीय भूकंप, 13 नगरसेवक सहलीवर, रोहित पवारांना मोठा धक्का

Karjat Politics : कर्जत नगरपंचायतीत मोठा राजकीय भूकंप झाला असून तब्बल 13 नगरसेवक सहलीवर गेल्याने आता नगराध्यक्षांवर अविश्वास ठराव आणण्याची राजकीय हालचालही सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), काँग्रेस आणि भाजपचे एकूण 13 नगरसेवक एकाच वेळी सहलीवर गेल्याने राज्यात अनेक चर्चांना उधाण आले आहे. गेल्या काही महिन्यांपासून कर्जत नगरपंचायतीत अस्थिरता होती. गटनेते संतोष मेहत्रे यांनी नगराध्यक्षांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, “मागील निवडणुकीत दडपशाही झाली होती. नगराध्यक्ष पदाचे वाटप अडीच वर्षांनी होणार होते, पण त्याकडे दुर्लक्ष केले गेले. जनतेचे प्रश्न सुटत नाहीत, म्हणून आम्ही अविश्वास ठराव आणला आहे.” या ठरावाला राष्ट्रवादी, काँग्रेस आणि भाजपच्या 13 नगरसेवकांचा पाठिंबा आहे. यामध्ये महिला नगरसेविकांचाही मोठ्या प्रमाणावर सहभाग आहे. या नगरसेवकांनी सोमवारी जिल्हाधिकारी पंकज आशियाना यांच्याकडे अर्ज सादर करून कारवाईची मागणी केली आहे. राजकीय संघर्षात आमदार रोहित पवार यांची अडचणही घटना आमदार रोहित पवार यांच्यासाठी मोठा धक्का ठरत आहे. कारण नगरपंचायतीतील बहुसंख्य नगरसेवक त्यांच्या विरोधात उभे आहेत. त्यांच्या विरोधकांनी हालचालीला गती दिली असून, आमदार राम शिंदे यांच्या समर्थकांचा हातभार लागलेला दिसतो. “निवडणुकीतील दडपशाहीची प्रतफेड” – प्रवीण घुलेमाजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुले यांनी या राजकीय हालचालीला “निवडणुकीतील अन्यायाची प्रतिक्रिया” म्हटले आहे. त्यांनी म्हटले, “आम्ही गेल्या काळात दडपशाही सहन केली, पण आता जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य द्यायचा वेळ आला आहे. यापुढील निर्णय जनहिताच्या दृष्टीने घेतले जातील.” तर दुसरीकडे जिल्हाधिकाऱ्यांनी अविश्वास ठरावावर लवकरच निर्णय घ्यावा, अशी मागणी नगरसेवक करीत आहेत. सहलीवर गेलेले 13 नगरसेवकसौ. रोहिणी सचिन घुलेसौ. छायाताई सुनिल शेलारसंतोष सोपान मेहत्रेज्योती लालासाहेब शेळकेसतीश उद्धवराव पाटीललंकाबाई देविदास खरातभास्कर बाबासाहेब भैलुमेभाऊसाहेब सुधाकर तारेडमलताराबाई सुरेश कुलथेमोनाली ओंकार तोटेमोहिनी दत्तात्रय पिसाळअश्विनी गजानन दळवीसुवर्णा रविंद्र सुपेकर कर्जत नगरपंचायतीतील ही राजकीय उलथापालथी स्थानिक पातळीवर नवे समीकरण निर्माण करणारी आहे. जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याची मागणी करत या नगरसेवकांनी सत्ताधाऱ्यांवर दबाव आणला आहे. पुढील काही दिवसात या प्रकरणाचा निकष लागणार असून, राजकीय पटावर नवे बदल दिसून येण्याची शक्यता आहे.

कर्जत नगरपंचायतीत राजकीय भूकंप, 13 नगरसेवक सहलीवर, रोहित पवारांना मोठा धक्का Read More »

Rohit Pawar : रोहित पवारांकडून उमेदवारी अर्ज दाखल, राम शिंदेंशी बिग फाईट

Rohit Pawar : 2019 प्रमाणे 2024 लाही राज्यामध्ये कर्जत-जामखेड हा मतदार संघ लक्षवेधी राहणार आहे. या मतदारसंघातून भाजपाकडून माजी मंत्री आमदार राम शिंदे यांच्या विरोधात महाविकास आघाडी कडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे रोहित पवार हे उमेदवार पुन्हा एकदा आमने सामने असल्याने ही लढत मोठी रंगतदार आणि त्याचबरोबर आरोप प्रत्यारोपाने गाजणार असून राज्यात लक्षवेधी ठरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदर रोहित पवार यांनी सहकुटुंब येत आपला उमेदवारी अर्ज कर्जत येथे दाखल केला. अर्ज दाखल केल्यानंतर कर्जत शहरातून एक भव्य अशी रॅली काढण्यात आली होती. या रॅलीमध्ये कर्जत आणि जामखेड तालुक्यातील हजारो लोकांचा सहभाग दिसून आला. रॅली नंतर एका मोठ्या सभेचा आयोजनही करण्यात आलेलं होते. यावेळी माध्यमांशी बोलताना रोहित पवार यांनी मी 2019 प्रमाणे आताही एका बलाढ्य पक्षा विरुद्ध लढत असलो तरी विजय पुन्हा माझाच होईल असा विश्वास व्यक्त केला. ही निवडणूक जिंकण्यासाठीच असून पुढील पाच वर्षासाठी कोणती विकास कामे करायचे याचे प्लॅनिंग मी केलेले आहे. राम शिंदे यांच्यावर टीका करताना पवार यांनी, त्यांना विकासाबद्दल काहीही कळत नसल्याचा टोला लगावला. त्यांनी विकास कामे केले किंवा मी केली यासाठी त्यांनी समोरासमोर येऊन कोणी किती विकास कामे केली हे सांगावे असे खुले आव्हान रोहित पवार यांनी राम शिंदे यांना दिले आहे. महाविकास आघाडी या निवडणुकीत 170 ते 180 जागांवर निवडून येईल असा दावा यावेळी रोहित पवार यांनी केला. विरोधकांनी जाणीवपूर्वक मतं खाण्यासाठी सुपारीबाज उमेदवार उभे केले आहेत, मात्र जनतेला विकासा कोण करेल याची माहिती असल्याने महाविकास आघाडी सोबत राज्यातील जनता राहील असा विश्वासही रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

Rohit Pawar : रोहित पवारांकडून उमेदवारी अर्ज दाखल, राम शिंदेंशी बिग फाईट Read More »

Ram Shinde : येणाऱ्या सर्वच निवडणुकांसाठी एकत्र; मंत्री विखे पाटील आणि आ. शिंदेची ग्वाही!

Ram Shinde : “माझ्या आणि आ.राम शिंदे यांच्‍या मध्‍ये आता कोणतेही मतभेद राहीलेले नसुन यापुढील सर्व निवडणूका आम्ही एकत्रित येवून एक विचाराने लढविणार आहोत,” अशी ग्‍वाही राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पा. व माजी मंत्री आ.प्रा.राम शिंदे यांनी  आज जामखेड शहरातील चुंभळी येथील जाहीर सभेत दिली.  लोकसभा निवडणूक प्रचाराच्‍या निमित्‍ताने शहरातील जामवाडी, तपनेश्‍वर, मुख्‍य बाजारपेठ, शिवाजी नगर, संताजी नगर, सदाफुले वस्‍ती, आरोळे वस्‍ती आणि चुंभळी येथे नागरीकांच्‍या भेटी घेवून संवाद साधला. केंद्र आणि राज्‍य सरकारने घेतलेल्‍या निर्णयांची माहीती देवून महायुतीच्‍या उमेदवाराला खंबीरपणे साथ देण्‍याचे आवाहन त्यांनी केले. माजी मंत्री आ.राम शिंदे, शिवसेना नेते बाबुशेठ टायरवाले, भाजपा नेते विनायकराव देशमुख यांच्‍यासह स्‍थानिक पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते. चुंभळी येथील कार्यक्रम सुरु होताच, उपस्थितांनी आ.राम शिंदे यांच्‍यावर होत असलेल्‍या अन्‍यायाचा प्रश्‍न उपस्थित केला. आ.शिंदे यांनीच या चर्चेत हस्‍तक्षेप करुन,” मंत्री विखे पाटील आणि माझ्यामध्‍ये आता कोणतेही मतभेद राहीलेले नाहीत. आपल्‍याला आता महायुतीच्‍याच उमेदवाराचे काम करायचे आहे. या भागातून शंभर टक्‍के मतदान हे महायुतीच्‍या उमेदवारालाच होईल, असे काम करायचे आहे .” असे सांगून त्‍यांनी  हा विषय संपविला. याच विषयाचा उल्‍लेख करुन, मंत्री ना. विखे पाटील यांनीही चुंभळी येथील श्री.मस्कोबा महाराजांच्‍या देवस्‍थानाचा उल्‍लेख करुन, आमच्‍या लोणी बुद्रूक गावाचे ग्रामदैवत सुध्‍दा म्‍हसोबा महाराज आहेत. या देवस्‍थानांच्‍या साक्षीने सांगतो की, “आमच्‍या दोघांमध्‍ये आता कोणतेही मतभेद नाहीत. यापुढील सर्व निवडणूका आम्ही एकत्रितपणेच लढविणार आहोत. याबाबत कुणीही मनात संभ्रम ठेवु नये.”

Ram Shinde : येणाऱ्या सर्वच निवडणुकांसाठी एकत्र; मंत्री विखे पाटील आणि आ. शिंदेची ग्वाही! Read More »

Ram Shinde: मोदींच्या गॅरंटीवर विश्वास, सुजय विखेंना मोठे मताधिक्य देऊन विजय करा, राम शिंदेंकडून आवाहन

Ram Shinde:  देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनविण्यासाठी खा. सुजय दादा विखे पाटील यांच्या रुपाने उमदा शिलेदार याला निवडून पाठवायचे आहे. जामखेड कर्जत मधून मोठे मताधिक्य देऊन त्यांच्या विजयासाठी बुथ स्थरावर नियोजन करण्याचे आवाहन माजी मंत्री आ. राम शिंदे यांनी केले.    जामखेड तालुक्यातील जवळा जिल्हा परिषद गटातील राजेवाडी, धानोरा अणखेरीदेवी येथील भाजपा बुथ कमिटीच्या प्रमुखांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी आमदार प्रा. राम शिंदे म्हणाले की आज संपूर्ण भारतातील लोकांची राम मंदिर व्हावे म्हणून इच्छा होती.ही इच्छा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केली आहे. यामुळे त्यांच्या हमीवर देशाचा विश्वास निर्माण झाला आहे.   आ. राम शिंदे म्हणाले की, विरोधी आमदारांनी सांगितले की जामखेडला कुकडीचे पाणी देतो, पण त्या दिवसापासून आजपर्यंत लोक खोर घेऊन दारावर लोक पाण्याची वाट बघत आहेत. पण अद्यापही पाणी काही आले नाही. लोक तुमच्या खोट्या भुलथापांना बळी एकदा बळी पडले होते, आता पडणार नाहीत याचा विश्वास आहे.  खासदार डॉ. सुजयदादा विखे पाटील यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले की, गेल्या ५० वर्षापासून आमचे कुटुंब जनतेच्या सेवेत आहे. यामुळे सातत्याने जनतेने आम्हाला आशिर्वाद देऊन सत्तेत ठेवले आहे. त्यात आता  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची साथ मिळाल्याने जिल्ह्याचा विकास अधिक झपाट्याने होणार आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी आपली विकास कामे घराघरात पोहचवा, असा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.  यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष अजयदादा काशीद, जामखेड बाजार समितीचे सभापती पैलवान शरद दादा कार्ले, डॉ भगवानदादा मुरूमकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रवी सुरवसे, भाजपा तालुका उपाध्यक्ष माजी सरपंच बापूराव ढवळे भाजपा युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष बाजीराव गोपाळ घुरी, माजी संचालक मनोज काका कुलकर्णी, आणखेरी देवी ट्रस्टचे अध्यक्ष रभांजी आढाव, सचिव रमेश तुपेरे, पिंपरखेडचे सरपंच राजेंद्र ओमासे, माजी सरपंच दादासाहेब वारे, माजी सरपंच अशोक राऊत, युवा नेते अजित यादव, राहुल चोरगे, शाहुराव जायभाय, पाटोदाचे सरपंच सदाशिव गवांदे, संतोष राऊत, परशराम राऊत, महादेव जायभाय, गणेश जायभाय, हर्षद शिंदे यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते,

Ram Shinde: मोदींच्या गॅरंटीवर विश्वास, सुजय विखेंना मोठे मताधिक्य देऊन विजय करा, राम शिंदेंकडून आवाहन Read More »

Ahmednagar News : आमचा वाद कौटुंबिक.. आमच्यातील भाऊबंदकी मिटली आहे- सुजय विखे

Ahmednagar News: आज मंगळवारी खा.सुजय विखे आणि आ.राम शिंदे यांच्या उपस्थितीत  जामखेड तालुका भाजप पदाधिकर्यांची प्रचार नियोजन बैठक पार पडली.  या बैठकीनंतर राम शिंदे यांनी आज झालेल्या प्रचार नियोजन बैठकीचा आढावा सांगितला. नियोजन बैठकीला जामखेड तालुक्यातील पदाधिकारी,प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.  शिंदे म्हणाले की, यावेळी कार्यकर्त्यांनी आपापली मते मांडली तसेच निवडणुकीच्या दृष्टीने कशी व्युव्ह रचना हवी याबद्दल सांगितले. गेल्या पाच वर्षातील एकूण आलेल्या अनुभवांचा उहापोह करण्यात आला. या बद्दल उमेदवार सुजय विखे यांनी सर्वांचे समाधान होईल अशी भूमिका मांडली.  यावर उपस्थितीत पदाधिकारी यांचे पूर्ण समाधान झाले असून यापूर्वी जामखेड तालुक्यातून मिळालेल्या मताधिक्यपेक्षा अधिकचे मताधिक्य जामखेड तालुक्यातून दिले जाईल अशी ग्वाही सर्वांनी दिली.  पक्षाने 13 मार्च रोजी सुजय विखे यांना उमेदवारी घोषित केल्यानंतर आता कसलेही मतभेद उरलेले नाहीत, केंद्रीय नेतृत्वाने अब की बार चारसौ पार चा नारा दिला आहे. त्यामुळे सुजय विखे यांना विजयी करणे हे सर्वांचे लक्ष आहे.  नगर दक्षिणेतील सहाही विधानसभा मतदारसंघात आपण विखे यांना जास्तीतजास्त मताधिक्य मिळेल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. उद्या बुधवारी कर्जत तालुका भाजप पदाधिकारी यांची प्रचार नियोजनाची बैठक होणार आहे. आमच्यातील वाद हा कौटुंबिक विषय होता,याची जाहीर वाच्यता होत नसते. आमच्या कुटुंबातील जी काही भाऊबंदकी होती ती मिटली आहे, असे उत्तर खा.सुजय विखे यांनी शिंदे नाराज असल्याच्या चर्चेवर विचारलेल्या प्रश्नावर दिली. मधल्या काळात कार्यकर्त्यांत जी भावना होती ती बैठकीत मांडली गेली. त्यावर सर्वांचे समाधान करून सकारात्मक चर्चा झाली आहे.  आता एकजुटीने जेष्ठनेते राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात प्रचार केला जाऊन महायुतीचे उमेदवार म्हणून सर्वांनी जामखेड तालुक्यातून मताधिक्य देण्याची ग्वाही दिली असल्याची माहिती विखे यांनी दिली. यावेळी जामखेड तालुका भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

Ahmednagar News : आमचा वाद कौटुंबिक.. आमच्यातील भाऊबंदकी मिटली आहे- सुजय विखे Read More »

Ram Shinde : राम शिंदे कडून विखेंना शुभेच्छा, राम शिंदेंनी केला होता खासदारकीसाठी दावा

Ram Shinde : भाजपकडून लोकसभेचे उमेदवारांची यादी जाहीर झाली यामध्ये नगर दक्षिण मधून सुजय विखे यांना उमेदवारी जाहीर झाली. लोकसभेच्या अनुषंगाने  नगर शहरांमध्ये भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी भाजप आमदार राम शिंदे यांनी मंचावरच सुजय विखे यांना  शुभेच्छा देत त्यांचा सत्कार देखील केला. खासदार सुजय विखे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करायचा आहे त्यासाठी सर्व एकत्र येऊन  काम करणार असल्याचं दोघांनी सांगितलं, लोकसभेची यादी जाहीर होतात येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपची नगर शहरात आढावा बैठक पार पडली आहे. लोकसभेची रणनीती काय असणार यावरती करण्यात आली. यावेळी भाजपाचे उमेदवार सुजय विखे तसेच आमदार बबनराव पाचपुते, आमदार मोनिका राजळे, आमदार राम शिंदे तसेच माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्यासह अनेक कार्यकर्ते तसेच पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी आमदार राम शिंदे बोलताना म्हणाले की, भाजपकडून नगर दक्षिण लोकसभेसाठी सुजय विखे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. मी देखील लोकसभेच्या उमेदवारीसाठी इच्छुक होतो मात्र पक्षाने घेतलेल्या निर्णयाचं मी स्वागत केलं तसेच मी सुजय विखे यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा देखील दिले आहे. तर एकत्र येऊन काम करत असल्याचा सुजय विखे यांनी सांगितलं.

Ram Shinde : राम शिंदे कडून विखेंना शुभेच्छा, राम शिंदेंनी केला होता खासदारकीसाठी दावा Read More »

Ram Shinde : तुम्ही स्वतः च पाहा! ‘त्या’ प्रकरणात राम शिंदे यांचा रोहित पवारांना टोला

Ram Shinde :  राज्यात येत्या काही दिवसात विधानसभा निवडणुका होणार आहे. या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षासह इतर राजकीय पक्षांनी देखील तयारी सुरू केली आहे.  यातच कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी आगामी निवडणुका महायुतीतील घटक पक्ष हे भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवतील टीका केली होती. आता या टीकेला उत्तर देत आमदार राम शिंदे यांनी रोहित पवारांसह विरोधकांना टोला लगावला. राम शिंदे एका कार्यक्रमानिमित्त अहमदनगर शहरात आले होते यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.  पत्रकारांशी संवाद साधताना शिंदे म्हणाले, संजय राऊत, जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार यांनी आपल्या पक्षावर लक्ष देणे गरजेचे आहे.  आम्ही कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवणार याचा आम्ही निर्णय घेऊ. त्यांना आमच्या घरात काय चाललंय हे डोकं पाहण्यापेक्षा स्वतःच्या घरात काय चाललं याकडे लक्ष दिले पाहिजे. कर्जत एमआयडीसी वर बोलताना राम शिंदे म्हणाले की तो प्रस्ताव सदोष होता त्या प्रकल्पाला गावकऱ्यांनी देखील विरोध केला तसेच ती जमीन विवादातील होती.  त्यामुळे नव्याने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आले असून टीम ही कर्जत तालुक्यात गेली असून त्यांच्याकडून चाचणी केली जात आहे. तसेच पुढे बोलताना राम शिंदे म्हणाले की याबाबत मी एक प्रशासकीय बैठक देखील घेतलेली आहे. याबाबतचा अहवाल तयार करण्यात यावा असे निर्देश मी दिलेले होते त्या अनुषंगाने आजच त्या टीमने सहा क जागांची पाहणी केली आहे. त्यामुळे लवकरच शासनाकडे आराखडा पाठवला जाईल अशी माहिती यावेळी राम शिंदे यांनी दिली.

Ram Shinde : तुम्ही स्वतः च पाहा! ‘त्या’ प्रकरणात राम शिंदे यांचा रोहित पवारांना टोला Read More »