DNA मराठी

Raj Thackeray

Uddhav-Raj -उद्धव-राज युतीचा महायुतीवर ‘ठसा’: कोण उरेल? कोण पडेल?

Maharashtra Politics: महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा वळण घेत असताना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे (Uddhav-Raj) यांच्या एकत्र येण्याची चर्चा पुन्हा एकदा रंगू लागली आहे. शिवसेनेचे बाळासाहेब ठाकरे यांचं राजकारण आणि त्यांच्या दोन्ही वारसदारांनी घेतलेल्या वेगवेगळ्या वाटा… या पार्श्वभूमीवर जर हे दोन ठाकरे पुन्हा एकत्र आले, तर महायुतीचं गणित पूर्णपणे ढासळण्याची चिन्हं आहेत. राजकारणात ‘कधी कोण मित्र होईल आणि शत्रू होईल’ हे सांगता येत नाही, हे पुन्हा सिद्ध होताना दिसत आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राज ठाकरे यांच्या मनसेची (Uddhav-Raj) युती झाली, तर ठाणे, मुंबई, नाशिकसारख्या शहरांमध्ये भाजप-शिंदे गटाला जबर झटका बसू शकतो. कारण या भागांमध्ये दोन्ही पक्षांचे मिळून एक भक्कम मराठी मतदार संघ आहे. शिंदे गटाची अडचण वाढणार? एकनाथ शिंदे यांची शिवसेना मराठी मतांच्या जोरावरच उभी आहे. मात्र, हे मतबळ मूळ शिवसेनेचे आहे, हे नाकारता येणार नाही. राज आणि उद्धव जर एकत्र आले, तर शिंदे गटाकडे उरलेली मराठी ओळख धूसर होण्याची शक्यता आहे. परिणामी, त्यांचे स्वतंत्र अस्तित्व टिकवणे कठीण होऊ शकते. भाजपचं गणित कोलमडेल का? भाजपने गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रात एक मजबूत युती उभी केली होती — शिंदे ( SHIANDE) गट, अजित पवारांची राष्ट्रवादी, आणि स्वतःचा मजबूत संघटनात्मक पाया. मात्र, राज आणि उद्धव एकत्र आल्यास, भाजपच्या मतांच्या वाटणीत मोठा फेरफार होऊ शकतो. विशेषतः शहरी आणि उपनगरी भागांतील मराठी मतदार भाजपपासून दूर जाऊ शकतात. शिवाय, विरोधकांकडून ‘मराठी अस्मिता’चा नवा नारा भाजपला अडचणीत आणू शकतो. अजित पवार यांना झटका? अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे परंपरागत मतदार हे ग्रामीण भागात अधिक आहेत, परंतु काही ठिकाणी मुस्लिम आणि आघाडी समर्थक वर्गाचे मत मिळवण्यासाठी अजितदादांना जोर द्यावा लागतो. ठाकरे-राज एकत्र आले, तर विरोधकांची एकत्रित ताकद अजित पवार यांच्यासाठी देखील आव्हान उभी करू शकते. राजकारणात काहीही होऊ शकतं सध्याच्या घडामोडी पाहता, 2028 च्या निवडणुकांपूर्वी राज्यात अनेक समीकरणं बदलू शकतात. उद्धव आणि राज ठाकरे यांची भेट, चर्चा, आणि त्यातून उद्भवणाऱ्या शक्यता – या सगळ्यांकडे राज्यातील राजकीय वर्तुळ लक्ष ठेवून आहे.

Uddhav-Raj -उद्धव-राज युतीचा महायुतीवर ‘ठसा’: कोण उरेल? कोण पडेल? Read More »

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार? — नव्या राजकीय युतीच्या शक्यता आणि मर्यादा

Raj and Uddhav Thackeray : राज्यात पुन्हा एकदा भूकंप येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याची शक्यता आहे. सिने अभिनेता महेश मांजरेकर यांच्या एका कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेसोबत एकत्र येण्याचे संकेत दिले आहे. त्यामुळे आता राज्यात पुन्हा एकदा नवीन राजकीय समीकरण निर्माण होणार का? याबाबत राजकीय वर्तुळात सध्या अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी 1990 च्या दशकात दोघंही बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एकत्र कार्यरत होते. राज ठाकरे यांना ‘बाळासाहेबांचा वारसदार’ मानलं जायचं, तर उद्धव ठाकरेंना शांत, पण योजनाबद्ध राजकारणाची ओळख होती. 2006 साली राज ठाकरेंनी मनसेची स्थापना केली आणि त्यांच्या मार्गांनी दोघांची राजकीय वाटचाल वेगळी झाली. गेल्या दोन दशकांत राजकीय भूमिका, भाषा आणि जनाधार यामध्ये मोठा फरक पडला. पण दोघांचं केंद्रस्थानी मात्र मराठी अस्मिता आणि महाराष्ट्रहित हीच भूमिका कायम राहिली आहे. सध्याची राजकीय गरज शिवसेनेतील फूट, भाजपचा वाढता प्रभाव, काँग्रेस-राष्ट्रवादीचे बदलते समीकरण — यामुळे महाराष्ट्रातील राजकारण एक अस्थिर टप्प्यातून जात आहे. उद्धव ठाकरे यांना त्यांचा पारंपरिक जनाधार पुन्हा मिळवायचा आहे आणि राज ठाकरे यांना मनसेला निर्णायक बनवायचं आहे. या दोघांमध्ये जर विशिष्ट मुद्द्यांवर समन्वय झाला, तर ही युती केवळ संख्या वाढवणारी ठरणार नाही, तर जनतेच्या मनातली एक विशिष्ट भावना पुन्हा जागृत करू शकते. अडथळे आणि अपेक्षा या युतीच्या वाटेवर अनेक अडथळे आहेत. पहिला अडथळा म्हणजे नेतृत्व कोणाचे? दोन व्यक्तिमत्वं, दोन कार्यशैली आणि दोन स्वतंत्र पक्ष… यांचा समन्वय हेच सर्वात मोठं आव्हान आहे. दुसरं म्हणजे कार्यकर्त्यांमध्ये असणारी वैचारिक ध्रुवीकरण. राज ठाकरे यांची शैली आक्रमक, व्यंगप्रधान आहे; तर उद्धव ठाकरे संयमित आणि धोरणात्मक पद्धतीने वाटचाल करतात. ह्या शैली जनतेला वेगळ्या पद्धतीने भावतात. या दोघांचं एकत्र येणं म्हणजे त्या शैलींचं संतुलन साधणंही तितकंच महत्त्वाचं ठरेल. संभाव्य परिणाम जर ही युती झाली, तर मुंबई, ठाणे, पुणे, नाशिकसारख्या शहरी मतदारसंघांमध्ये याचा थेट प्रभाव पडू शकतो. मराठी मतदारांमध्ये एक नव्या आशेचा किरण निर्माण होईल. शिवसेनेच्या पारंपरिक मतदारांना नव्याने एकत्र येण्याचं बळ मिळेल, आणि मनसेला व्यापक व्यासपीठ. परंतु केवळ भाजपविरोधी एकत्र येणं हा दीर्घकालीन पर्याय ठरू शकत नाही. जनतेला हवं आहे ठोस विकासाचं व्हिजन, प्रामाणिकपणा, आणि स्पष्ट भूमिका.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार? — नव्या राजकीय युतीच्या शक्यता आणि मर्यादा Read More »

कबर नसलीच पाहिजे…, संग्राम जगतापांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल

Sangram Jagtap on Raj Thackeray: गुढीपाडव्याच्या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या भाषणानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. “कबर ठेवली पाहिजे” असे विधान करत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. मात्र, त्यांच्या या वक्तव्यावर आता विरोधी नेत्यांनी जोरदार टीका केली आहे. संग्राम जगताप यांची परखड प्रतिक्रिया – अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी या मुद्द्यावर थेट प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “कबर ही नसलीच पाहिजे, असे तमाम हिंदूंचे मत आहे. त्यामुळे कोण काय सांगत आहे, त्यापेक्षा सत्य परिस्थिती काय आहे हे महत्त्वाचे आहे.” त्यांनी असा दावाही केला की, “या संदर्भात अपूर्ण माहिती दिली जात असून, आम्ही येणाऱ्या काळात थडगे ठेवणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली आहे.” त्यांच्या या भूमिकेमुळे राजकीय वातावरण अधिक तापले आहे. शिवसेनेवर हल्लाबोल – संग्राम जगताप यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केला. “जोपर्यंत बाळासाहेब ठाकरे जिवंत होते, तोपर्यंत हिंदुत्व हे त्यांच्यासाठी महत्त्वाचे होते. मात्र, शिवसेनेने काँग्रेससोबत हातमिळवणी केल्यानंतर आता त्यांना हिंदुत्व महत्त्वाचे वाटेनासे झाले आहे,” असा आरोप त्यांनी केला. “त्यामुळे संजय राऊत यांच्या वक्तव्याला फारसे महत्त्व देण्याची गरज नाही,” असेही ते म्हणाले. राजकीय वातावरणात तणाव राज ठाकरे यांच्या भाषणानंतर राज्यात हिंदुत्व आणि धार्मिक विषयांवर नवी चर्चा सुरू झाली आहे. विरोधी पक्षांचे नेते यावर तीव्र प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी हे वक्तव्य राजकीय फायद्यासाठी असल्याचा आरोप केला आहे, तर काहींनी याला पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे आगामी काळात या मुद्द्यावर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. पुढील राजकीय घडामोडींची शक्यता राज ठाकरे यांच्या भूमिकेवरून मनसे अधिक आक्रमक होत असल्याचे स्पष्ट होते. दुसरीकडे, भाजप आणि मनसे यांच्यातील वाढते संबंधही यामुळे चर्चेत आले आहेत. संग्राम जगताप यांची भूमिका ही हिंदुत्ववादी राजकारणाला पूरक असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे या वक्तव्यांमुळे आगामी निवडणुकांवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेषतः, शिवसेनेला या टीकेला कसे प्रत्युत्तर देता येईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. शिवसेनेच्या गटातील नेते आणि कार्यकर्त्यांनी संजय राऊत यांच्या समर्थनार्थ भूमिका मांडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसही या वादात भूमिका घेत विरोधी गटाच्या रणनीतीवर टीका करू शकतात. निष्कर्ष राज ठाकरे यांच्या गुढीपाडव्याच्या भाषणानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन वादंग निर्माण झाला आहे. संग्राम जगताप यांच्या प्रतिक्रियेमुळे हा वाद अधिकच पेटण्याची शक्यता असून, आगामी काळात याचा परिणाम निवडणूक रणनीतींवर होऊ शकतो. हिंदुत्वाचा मुद्दा आगामी राजकीय समीकरणांसाठी कसा महत्त्वाचा ठरतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

कबर नसलीच पाहिजे…, संग्राम जगतापांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल Read More »

Gulabrao Patil : गुलाबराव पाटलांचा कुणाल कामरा – राज ठाकरेंवर हल्लाबोल

Gulabrao Patil : शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक टीका केल्याच्या पार्श्वभूमीवर पाटील यांनी कडक शब्दांत नाराजी व्यक्त केली, तर राज ठाकरे यांच्या अलीकडील वक्तव्यावरही त्यांनी खरमरीत भाष्य केले. गुलाबराव पाटील म्हणाले, “कुणाल कामरा ही जी वृत्ती आहे, त्याने याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. त्याचं दुकान बंद झालं आहे. आता तो शिंदे साहेबांवर टीका करतोय. त्याला वाटत असेल की बोलल्यावर काही होणार नाही, पण तो चुकतोय.” पाटील यांनी पुढे सांगितलं की, शिवसेना आमदार मुरजी पटेल यांनी कुणाल कामराविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. “दोन दिवसांत त्याने माफी मागितली नाही, तर शिवसेना स्टाईलने त्याच्या तोंडाला काळं फासू,” असा इशाराही त्यांनी दिला. त्यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधत म्हटलं, “संजय राऊत हा त्यांचाच माणूस आहे. त्यांच्याच सांगण्यावरून हे सगळं सुरू आहे.” दुसरीकडे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरही पाटील यांनी टीकेची झोड उठवली. राज ठाकरे यांनी अलीकडेच केलेल्या वक्तव्याचा उल्लेख करत ते म्हणाले, “काल त्यांना स्वप्न पडलं असेल. साधा एक आमदार निवडून आणू शकत नाहीत. फक्त सभांना गर्दी असते. मी आहे हे दाखवण्यासाठी त्यांनी हे वक्तव्य केलं असेल. पालिका निवडणुका येताहेत, त्यामुळे ही नौटंकी सुरू आहे.” पाटील यांनी राज ठाकरे यांच्या राजकीय प्रभावावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांची खिल्ली उडवली. कुणाल कामराच्या वक्तव्याने शिवसेना कार्यकर्ते संतप्त झाले असून, त्यांनी मुंबईतील युनिकॉन्टिनेंटल स्टुडिओमध्ये तोडफोड केली आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. दरम्यान, गुलाबराव पाटील यांच्या या वक्तव्याने राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. पालिका निवडणुकांच्या तोंडावर शिवसेना आणि मनसे यांच्यातील शाब्दिक चकमक तीव्र होताना दिसत आहे. या घडामोडींकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Gulabrao Patil : गुलाबराव पाटलांचा कुणाल कामरा – राज ठाकरेंवर हल्लाबोल Read More »

Raj Thackeray: राज ठाकरेंना मोठा धक्का, मनसेची मान्यता होणार रद्द, ‘हे’ आहे कारण

Raj Thackeray : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर आले आहे. राज्यात पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने महायुतीची सरकार स्थापन होणार आहे. तर दुसरीकडे या निवडणुकीत सर्वात मोठा धक्का मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. माहितीनुसार निवडणूक आयोग राज ठाकरे यांचा पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मान्यता रद्द करण्याचा विचार करत आहे. प्रत्यक्षात त्यांच्या पक्षाचा एकही आमदार विधानसभा निवडणुकीत जिंकू शकला नाही. त्याच वेळी, पक्षाची मतांची टक्केवारीही खूप कमी होती, त्यामुळे निवडणूक आयोग पक्षाची मान्यता रद्द करण्याचा विचार करत आहे. विधानसभा निवडणुकीत प्रादेशिक पक्षाला किमान एक विधानसभेची जागा किंवा 8 टक्के मते मिळणे आवश्यक आहे. निवडणुकीच्या निकालांवर नजर टाकल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 125 जागांसाठी उमेदवार उभे केले होते, पण एकही जागा जिंकता आली नाही. राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे यांचाही निवडणुकीत पराभव झाला. अशा परिस्थितीत निवडणूक आयोगाने पक्षाची मान्यता रद्द केल्यास तो राज ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जाईल. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला 1.55% मते मिळाली आहेत. पक्षाला एकूण 1,002,557 मते मिळाली. या दारुण पराभवानंतर राज ठाकरे यांनी आज त्यांच्या घरी पक्षश्रेष्ठींची आत्मपरीक्षण बैठक बोलावली आहे. या बैठकीत निवडणुकीतील खराब कामगिरी आणि पुढील रणनीतीवर चर्चा होऊ शकते. भाजपने 132 जागा जिंकल्यामहाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सलग तिसऱ्यांदा 100 हून अधिक जागा जिंकण्यात यश मिळवले. 149 जागांवर निवडणूक लढवणाऱ्या भाजपने 132 जागा जिंकल्या. त्याचवेळी शिवसेनेने 57 तर राष्ट्रवादीने 41 जागा जिंकल्या. त्या तुलनेत महाविकास आघाडी केवळ 49 जागांवर मर्यादित राहिली. या निवडणुकीत भाजपची मते 26.77 टक्के होती. तर काँग्रेसला 12.4 टक्के मते मिळाली.

Raj Thackeray: राज ठाकरेंना मोठा धक्का, मनसेची मान्यता होणार रद्द, ‘हे’ आहे कारण Read More »

Sanjay Raut: अनिल देशमुख सारख्या ज्येष्ठ नेत्यांवर हल्ला, याला जवाबदार सरकार आणि देवेंद्र फडणवीस, संजय राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कारवर दगडफेक करण्यात आली आहे. या हल्ल्यात माजी गृहमंत्री अनिल देशमुख गंभीर जखमी झाले आहे. तर आता या प्रकरणावरून खासदार संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि महाराष्ट्रातल्या राजकारणातले ज्येष्ठ नेते, अनेक वर्ष आमदार आणि मंत्री राहिलेले शरद पवारांचे खंदे समर्थक अनिल देशमुख यांच्यावर काल नागपूर मध्ये हल्ला झालाअत्यंत निर्गुण हल्ला झाला. आपण एक चित्र पाहिला असेल त्यांच्या डोक्यावर इतर भागात दगडफेकीमुळे ते रक्त बंबाळ झालेले आहे. काल ते अत्यावस्थत होते. असं संजय राऊत म्हणाले. पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, हल्ला करताना भारतीय जनता पक्षा कडून जिंदाबादच्या घोषणा दिल्या जात होत्या. राज्याच्या माजी गृहमंत्री त्याच्यावर ठार मारण्याचा हल्ला होतो. मुंबईमध्ये माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची हत्या होते आणि अनिल देशमुख सारख्या ज्येष्ठ नेत्यांवर माजी गृहमंत्री यांना ठार मारण्याचा प्रयत्न स्वतः गृहमंत्री देवेंद्र फडणवीस असलेल्या नागपुरात या राज्यातल्या कायदा सुव्यवस्था काढणारे हे ढिंडोरे आहे. त्याला जबाबदार शिंदे सरकार आणि गृहमंत्री देवेंद्र फडवणीस आहे. आता निवडणूक काळामध्ये राज्याच्या प्रशासनाची सर्व सूत्र ही निवडणूक आयोगाकडे असतात. जर ही गृहमंत्र्यांचा हुकूम चालतो सध्या हे भाजपच्या काळामध्ये. निवडणूक आयोग त्यांच्याच हातामध्ये असतं आणि ते त्यांचीच माणसं असतात आणि काम करतात. देवेंद्र फडवणीस यांनी जवाबदारी स्वीकारली पाहिजे.असेही संजय राऊत म्हणाले. तर राज ठाकरे यांच्यावर टीका करत संजय राऊत म्हणाले की, राज ठाकरे हे किती वेळा बोलणार. राज ठाकरे हे गेले 25 वर्ष भारतीय जनता पक्षाने दिलेल्या स्क्रिप्ट वाचतात. कधी नारायण राणे, एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या स्क्रिप्ट वाचतात. शिवसेनेच्या बाबतीत गांभिर्याने घ्यायची गरज नाही. त्यांनी स्वतः पक्ष शिवसेना पक्ष सोडलेला आहे. आणि स्वतःचा पक्ष स्थापन केलेला आहे. ते नरेंद्र मोदी, अमित शहा आणि फडणवीस या महाराष्ट्रातल्या दुश्मनांना मदत होईल पूर्णपणे अशी भूमिका घेतल्यामुळे महाराष्ट्र त्यांना गांभीर्याने घेणार असं वाटत नाही. असं संजय राऊत म्हणाले.

Sanjay Raut: अनिल देशमुख सारख्या ज्येष्ठ नेत्यांवर हल्ला, याला जवाबदार सरकार आणि देवेंद्र फडणवीस, संजय राऊतांचा हल्लाबोल Read More »

Eknath Shinde: मुख्यमंत्री शिंदेंची पहिली यादी जाहीर, बंडात साथ देणाऱ्या आमदारांना पुन्हा संधी

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये बंडात साथ देणाऱ्या सर्व आमदारांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. तर यापूर्वी मनसेकडून देखील 45 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सर्व आमदारांना वर्षा बंगल्यावर बोलावलं आहे. मुख्यमंत्री शिंदे आज या आमदारांना एबी फॉर्म वाटप करू शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे अद्याप देखील महायुतीमध्ये जागावाटपाचा तिढा आतापर्यंत सुटलेला नाही. आज किंवा उद्या महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्मुला ठरू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे ज्या जागांवर वाद नाही त्या मतदार संघातील उमेदवारांना महायुतीकडून एबी फॉर्म देण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील आतापर्यंत 17 पेक्षा जास्त उमेदवारांना एबी फॉर्म दिला आहे तर भाजपने आतापर्यंत 99 जागांवर आपले उमेदवारांची घोषणा केली आहे. शिंदे गटाचे उमेदवार कोपरी पाचपाखाडी – एकनाथ शिंदेसाक्री (अज) – मंजूळाताई गावितचोपडा (अज) – चंद्रकांत सोनावणेजळगाव ग्रामिण – गुलाबराव पाटीलएरंडोल – अमोल चिमणराव पाटीलपाचोरा – किशोर पाटीलमुक्ताईनगर – चंद्रकांत पाटीलबुलढाणा – संजय गायकवाडमेहकर (अजा) – डॉ. संजय रायमुलकरदर्यापूर (अजा) – अभिजित अडसूळरामटेक – आशिष जैस्वालभंडारा (अजा) – नरेंद्र भोंडेकरदिग्रस – संजय राठोडनांदेड उत्तर – बालाजी कल्याणकरकळमनुरू – संतोष बांगरजालना – अर्जून खोतकरसिल्लोड – अब्दुल सत्तारछत्रपती संभाजीनगर मध्य – प्रदीप जैस्वालछत्रपती संभाजीनगर पश्चिम (अजा) – संजय शिरसाटपैठण – विलास भूमरेवैजापूर – रमेश बोरनारेनांदगाव – सुहास कांदेमालेगाव बाह्य – दादाजी भुसेओवळा माजीवडा – प्रताप सरनाईकमागाठाणे – प्रकाश सुर्वेजोगेश्वरी (पूर्व) – मनिषा वायकरचांदिवली – दिलीप लांडेकुर्ला (अजा) – मंगेश कुडाळकरमाहिम – सदा सरवणकरभायखळा – यामिनी जाधवकर्जत – महेंद्र थोरवेअलिबाग- महेंद्र हरी दळवीमहाड- भरतशेठ मारुती गोगावलेउमरगा- ज्ञानराज धोंडीराम चौगुलेपरांडा- डॉ.तानाजी जयवंत सावंतसांगोला- शहाजी बापू पाटीलकोरेगाव- महेश शिंदेपाटण- शंभूराज देसाईदापोली- योगेश कदमरत्नागिरी- उदय सामंतराजापुर- किरण सामंतसावंतवाडी- दीपक केसरकरराधानगरी- प्रकाश आबिटकरकरवीर- चंद्रदिप नरकेखानापुर- सुहास बाबर

Eknath Shinde: मुख्यमंत्री शिंदेंची पहिली यादी जाहीर, बंडात साथ देणाऱ्या आमदारांना पुन्हा संधी Read More »

Raj Thackeray: आधी महापालिका, नगरपालिकांच्या निवडणुका घ्या, ‘एक देश एक निवडणूक’ वरून राज ठाकरेंचा मोदींना टोला

Raj Thackeray : केंद्रीय मंत्रिमंडळाने एक मताने व नेशन व इलेक्शन प्रस्ताव पास केल्यानंतर काही जणांनी याला समर्थन तर काही जणांनी विरोध केला आहे. यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या प्रकरणावरून मोदी सरकारला टोला लावत राज्यात आधी महापालिका, नगरपालिकांच्या निवडणुका घ्या असा टोला लावला आहे.  राज ठाकरे म्हणाले की, ‘एक देश एक निवडणूक’ संकल्पनेला   केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली. अर्थात ही फक्त केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता आहे आणि अजून याला संसदेची मान्यता लागेल. आणि अर्थात देशातील प्रत्येक राज्याचा कौल पण विचारात घ्यावाच लागेल. आणि कौलचा अर्थ वरवरची मान्यता नाही तर अशा प्रकारांनी राज्यांच्या अधिकारांना, स्वायत्ततेला धक्का पोहचणार नाही, याची खातरजमा पण व्हायलाच हवी.  बरं जर एखाद्या राज्यात सरकार कोसळलं किंवा किंवा तिथली विधानसभा बरखास्त झाली तर तिकडे आधी निवडणूक होणार का ? त्या राज्याने लोकसभेचा कार्यकाळ संपेपर्यंत वाट पहायची? किंवा समजा काही कारणांनी लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका लागल्या तर देशातील सगळ्या निवडणुका परत होणार का? असा कुठलाच खुलासा झालेला नाही. तो कदाचित होईल. असो…  पण ‘एक देश एक निवडणूक’ हे सर्व ठीक आहे, आधी राज्यातल्या महापालिका, नगरपालिकांच्या निवडणुका घ्या. येत्या ऑक्टोबर २०२४ मध्ये कित्येक महापालिकांमध्ये, नगरपालिकांमध्ये प्रशासक येऊन ४ वर्ष होतील. इतका काळ नगरसेवक नाहीत म्हणजे लोकप्रतिनिधी नाहीत. ते जास्त महत्वाचं नाही का? स्थानिक स्वराज्य संस्थांचा थेट संबंध सामान्य माणसांच्या जगण्याशी, त्यांच्या प्रश्नांशी असतो. त्याच्याच निवडणुका होत नसतील तर सामान्य माणसाने जायचं कोणाकडे? निवडणुकांचं महत्व इतकंच वाटतंय तर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर घ्या. असं राज ठाकरे म्हणाले.

Raj Thackeray: आधी महापालिका, नगरपालिकांच्या निवडणुका घ्या, ‘एक देश एक निवडणूक’ वरून राज ठाकरेंचा मोदींना टोला Read More »

Raj Thackeray : … म्हणून राज ठाकरे यांनी महायुतीमध्ये प्रवेश टाळला, ‘हे’ आहे कारण

Raj Thackeray : गुढीपाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोठी घोषणा करत महायुतीला लोकसभा निवडणुकीमध्ये बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. गुढीपाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांकडून आपल्याला त्यांच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा सल्ला देण्यात आला होता त्यामुळे महायुतीमध्ये जाण्याबाबतची बोलणी फिसकटली असं म्हणाले होते. मात्र आता एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार राज ठाकरे यांच्या महायुतीमध्ये प्रवेश भाजपमुळे नाहीतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे झाला नाही.   मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसेच्या उमेदवारांनी धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढावी असा प्रस्ताव राज ठाकरे यांना दिला होता. मात्र राज ठाकरे आपला चिन्ह इंजिन सोडून दुसऱ्या कुठल्याही चिन्हावर निवडणूक लढवण्यास तयार नव्हते. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. राज ठाकरे यांनी त्यांच्या कालच्या भाषणाबाबत उल्लेख देखील केला होता. सूत्रांनुसार एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासबोत ताज लँड्समधील बैठकीत राज ठाकरे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून हा प्रस्ताव देण्यात आला होता.  तर दुसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत यापूर्वी स्पष्टीकरण देत सांगितले होते की, भाजपकडून राज ठाकरे यांना त्यांच्या उमेदवारांनी कमळ चिन्हावर निवडणूक लढावी, असा कुठलाही प्रस्ताव देण्यात आला नव्हता.    मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी  लोकसभा निवडणुकीत बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्यानंतर मनसेमध्ये राजीनामा देण्याचे सत्र सुरु झाले आहे. पक्षाचे सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे यांनी सरचिटणीस पदाचा आणि सदस्यत्वचा राजीनामा दिला.

Raj Thackeray : … म्हणून राज ठाकरे यांनी महायुतीमध्ये प्रवेश टाळला, ‘हे’ आहे कारण Read More »

Ahmednagar News : राज ठाकरे यांच्यामुळे महायुती अधिक बळकट होईल : खा. डॉ. सुजय विखे पाटील

Ahmednagar News:  राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या निमित्त शिवतिर्थीवर आयोजित सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा दिला. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता महायुतीचा घटक पक्ष झाल्याने महायुतीला अधीक बळकटी मिळेल असा विश्वास अहमदनगरचे विद्यमान खासदार आणि महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील व्यक्त केला आहे.  राज ठाकरे यांनी काल मुंबईतील शिवाजी पार्क येथील सभेत काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना आपला जाहिर पाठिंबा दिल्याने महायुतीत आणखी एका पक्षाची भर पडली, तर महविकास आघाडीच्या चिंता वाढल्या आहेत. कारण राज ठाकरे यांचे तरुणांमध्ये मोठे क्रेज आहे. त्याच बरोबर मराठी माणसांचा आजही राज ठाकरे यांच्यावर विश्वास आहे. यामुळे राज्यभर त्यांचा कार्यकर्ते महायुतीला मदत करणार असल्याने निवडणुकीत त्याचा मोठा फायदा होईल असे खा. डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले.  राज ठाकरे यांनी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला आहे. यामुळे देशात फक्त मोदींची गॅरेंटी सुरू असल्याचे दिसून येत आहे. यावेळी ४०० पारचे उद्दीष्ठ आता सहज गाठता येणार आहे. तर इंडी आघाडीची हवा देशातून मिटत चालली असल्याचा दावा सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे.

Ahmednagar News : राज ठाकरे यांच्यामुळे महायुती अधिक बळकट होईल : खा. डॉ. सुजय विखे पाटील Read More »