DNA मराठी

NEET Paper Leak Case

uddhav thackeray

Uddhav Thackeray: नीट पेपरफुटी प्रकरण; ठाकरे बंधूंचा 26 जुलैला मुंबईत मोर्चा

Uddhav Thackeray : देशातील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून नीट पेपर फुटीवरून चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. या प्रकरणावरून दिल्लीत आंदोलन देखील होत असून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनामान्याची मागणी होत आहे. तर दुसरीकडे आता या प्रकरणावरून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येत मोठी घोषणा केली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांनी संयुक्तपणे 26 जुलै रोजी मुंबईत भव्य मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, परीक्षा व्यवस्थेतील भ्रष्टाचार थांबवावा आणि दोषींना कठोर शिक्षा व्हावी, या प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी ही लढाई कोणत्याही पक्षाची नसून विद्यार्थ्यांच्या भविष्याची असल्याचे स्पष्ट केले. लाखो विद्यार्थी वर्षभर कठोर परिश्रम करून परीक्षेला सामोरे जातात. मात्र पेपरफुटीसारख्या गैरप्रकारांमुळे त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरते. त्यामुळे अशा घटनांबाबत सरकारने कठोर भूमिका घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पालक, विद्यार्थी, शिक्षक आणि सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहनही करण्यात आले. मोर्चा मुंबईतील शिवाजी पार्क येथून सुरू होणार असून मोठ्या संख्येने कार्यकर्ते, विद्यार्थी संघटना आणि विविध सामाजिक संस्था सहभागी होण्याची शक्यता आहे. या आंदोलनाद्वारे केंद्र सरकारवर दबाव निर्माण करून नीट पेपरफुटी प्रकरणाची पारदर्शक आणि निष्पक्ष चौकशी, दोषींवर कठोर कारवाई तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी परीक्षा व्यवस्थेत व्यापक सुधारणा करण्याची मागणी करण्यात येणार आहे. नीट पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरात आंदोलनाची लाट उसळली असून विविध राज्यांमध्ये विद्यार्थी आणि राजकीय पक्ष रस्त्यावर उतरले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईतील प्रस्तावित मेगा मोर्च्याकडे राज्यासह देशाचे लक्ष लागले आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न केंद्रस्थानी ठेवून होणारे हे आंदोलन आगामी काळातील शिक्षण व्यवस्थेवरील चर्चेला नवी दिशा देऊ शकते, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Uddhav Thackeray: नीट पेपरफुटी प्रकरण; ठाकरे बंधूंचा 26 जुलैला मुंबईत मोर्चा Read More »

img 20260514 wa0003

NEET Paper Leak Case : ‘NEET’ पेपरफुटीच्या चौकशीसाठी संयुक्त संसदीय समिती (JPC) स्थापन करा

NEET Paper Leak Case : देशातील तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त करणाऱ्या नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली आज फोर्ट परिसरातील राज्याच्या CET सेल कार्यालयासमोर मुंबई युवक काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शेकडो युवकांनी सहभाग घेत भाजपा सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. नीट पेपरफुटी प्रकरणी भाजपा सरकारवर टीका करत मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन म्हणाल्या की, “नीट परीक्षेचा पेपर फुटल्यामुळे देशभरातील २४ लाख विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या स्वप्नांवर सरकारने बुलडोझर फिरवला आहे. या गंभीर प्रकाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा. तसेच विद्यार्थ्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी.” त्या पुढे म्हणाल्या की, “‘NEET’ पेपरफुटी प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी संयुक्त संसदीय समिती (JPC) स्थापन करण्यात यावी. या प्रश्नपत्रिका फुटीमागील संपूर्ण साखळी भाजपाशी संबंधित लोकांकडून चालवली जात असून, बेकायदेशीर मार्गाने विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त केले जात आहे. आम्ही सर्वजण मिळून या अन्यायाविरोधात लढा देऊ आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देऊ.” झीनत शबरीन यांनी पुढे आरोप केला की, “ज्या NTA महासंचालकांच्या कार्यकाळात २०२४ ची ‘NEET’ परीक्षा प्रश्नपत्रिका फुटली, त्याच व्यक्तीची छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांचे ‘प्रधान सल्लागार’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रश्नपत्रिका फुटीच्या घोटाळ्यात सहभागी असलेल्या लोकांना भाजप सरकारकडून बक्षीस म्हणून मोठी पदे दिली जात आहेत.” या आंदोलनात मुंबई युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष पंकज चौधरी, महासचिव तेजस चांदूरकर, आसिफ खान, गुरमन सिंग, गणेश शेगार, मितेश सोनकर, संतोष यादव, जिल्हाध्यक्ष शेखर जगताप, शिव यादव, अब्दुल समद तसेच विधानसभा अध्यक्ष इम्रान खान, प्रसन्न रांदिवे, आशिष सरोज, अल्तमेश कुरेशी, राहुल पेडणेकर, राज तुरेराव, सचिन, बृजमोहन यादव, सोहेब, मझहर आणि अबुतालिब यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभागी झाले होते या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

NEET Paper Leak Case : ‘NEET’ पेपरफुटीच्या चौकशीसाठी संयुक्त संसदीय समिती (JPC) स्थापन करा Read More »