DNA मराठी

NCPSP

ram khade

Ram Khade News : शरद पवारांच्या राष्ट्रवादी नेते राम खाडे जीवघेणा हल्ला, प्रकृती चिंताजनक

Ram Khade News : शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्ह्यातील नेते राम खाडे यांच्यावर नगर – सोलापूर महामार्गावर मांदळी गावाजवळ हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात त्यांच्यावर गंभीर वार झाल्याने त्यांना उपचारासाठी अहिल्यानगर मधील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात मात्र आता देखील त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने अहिल्यानगरमधील रुग्णालयातून त्यांना तातडीने पुण्यात हलविण्यात आले आहे. या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, नगर – सोलापूर महामार्गावर मांदळी गावाजवळ खाडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर अज्ञात हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केला होता. हॉटेलमध्ये जेवण करून नगरकडे निघाल्यानंतर रात्रीच्या वेळी 10 ते 15 जणांनी तोंडाला रुमाल बांधून लाठ्या, तलवार, पिस्तूल आणि सत्तूरने अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यात राम खाडे यांच्यासह त्यांचे तिघे सहकारी गंभीर जखमी झाले होते. सर्व जखमींना तत्काळ नगरमधील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र खाडे यांची प्रकृती अधिक बिघडत असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी पुण्यात हलविण्यात आले. हल्ल्याच्या ठिकाणाहून पळताना एका हल्लेखोराच्या हातातून सत्तूर खाली पडल्याची माहिती असून घटना स्थळावरील व्हिडीओमध्ये सत्तूर असल्याचे दिसत आहे. दरम्यान हा हल्ला राजकीय द्वेषातून करण्यात आल्याचा दावा खाडे यांचे जखमी सहकारी दीपक खिळे यांनी केला. खाडे यांनी अनेकांचे भ्रष्टाचार उघड करून तक्रारी केल्यामुळेच हा जीवघेणा हल्ला घडवून आणण्यात आल्याचेही त्यांनी आरोप केला. त्यामुळे हल्लेखोरांसह हल्ला घडवून आणणाऱ्याला अटक करावी, अशी मागणी खिळे यांनी केली आहे.

Ram Khade News : शरद पवारांच्या राष्ट्रवादी नेते राम खाडे जीवघेणा हल्ला, प्रकृती चिंताजनक Read More »

supriya sule

Supriya Sule: फडणवीससाहेब लक्ष द्या, भाजपमध्ये ड्रग्ज प्रकरणातील आरोपीचा प्रवेश; सुप्रिया सुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

Supriya Sule: तुळजापूरमध्ये ड्रग्ज प्रकरणातील आरोपीने भाजपमध्ये जाहीर प्रवेश केल्याने राज्यातील राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले आहे. विरोधक आता चारही बाजूने भाजपावर जोरदार हल्लाबोल करताना दिसत आहे. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित या प्रकरणात तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, तुळजापूर शहरातील काहीजणांना काल भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश देण्यात आला. यामध्ये शहरातील ड्रग्ज तस्करी प्रकरणातील आरोपींंचा देखील समावेश होता, अशी बातमी वाचनात आली. विशेष म्हणजे हे प्रवेश भाजपच्या पक्ष कार्यालयात आणि जबाबदार नेत्यांच्या उपस्थितीत झाले याचे सखेद आश्चर्य वाटले. यासोबतच ड्रग्स तस्करीला राजाश्रय मिळतोय हे पाहून तितकीच चिंता देखील वाटली. लोकशाही व्यवस्थेत प्रत्येक राजकीय पक्षाला आपली संघटना वाढविण्याचा अधिकार आहे, त्याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. परंतु त्याचवेळी कोणत्याही अनिष्ट, समाजविघातक प्रवृत्तीला थारा न देण्याची नैतिक जबाबदारी देखील सार्वजनिक आयुष्यात कार्यरत असणाऱ्या प्रत्येकावर असते,याबाबत आपणही सहमत असाल. आपण राज्याचे प्रमुख आहात, आपल्यासमोर अनेक कामे पडलेली असतात. त्यामुळे कदाचित ही बातमी आपल्यापर्यंत पोहोचली नसावी, किंवा सदर व्यक्तीच्या ड्रग्स गुन्हेगारीमधील पार्श्वभूमीबाबत आपल्याला माहिती देण्यात आली नसावी. हे गृहित धरुन मी आपणास हे पत्र लिहित आहे. समाजहित डोळ्यासमोर ठेवून ड्रग्जविरोधी लढ्यात आम्ही सर्वजण आपल्यासोबत आहोत. या संदर्भात मी यापूर्वीही आपणांस पत्राद्वारे कळविले होते. तुळजापूरमधील या प्रकाराकडे आपण गांभीर्याने लक्ष घालून संबंधितांविरुद्ध योग्य ती कारवाई कराल, अशी आम्हाला अपेक्षा आहे. ड्रग्स तस्करीला या महाराष्ट्रात राजाश्रय दिला जाणार नाही अशा प्रकारचा सकारात्मक संदेश समाजात जाण्यासाठी आणि ड्रग्जविरोधी मोहिमेला बळकटी मिळावी यासाठी हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. याची आपण योग्य ती दखल अवश्य घ्याल की अपेक्षा आहे. असं सुप्रिया सुळे पत्रात म्हणाल्या.

Supriya Sule: फडणवीससाहेब लक्ष द्या, भाजपमध्ये ड्रग्ज प्रकरणातील आरोपीचा प्रवेश; सुप्रिया सुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र Read More »

Sharad Pawar: निवडणुका जाहीर होताच अहिल्यानगरसाठी शरद पवारांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Sharad Pawar: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून संपूर्ण राज्यात 2 डिसेंबर रोजी नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी मतदान होणार आहे. तर 3 डिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. तर दुसरीकडे या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी देखील कंबर कसली असून सर्व राजकीय पक्षाकडून बेरीज वजाबाकीचे राजकारण सुरू झाले आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मोठा निर्णय घेत अहिल्यानगर जिल्ह्याची कमान माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांच्याकडे सोपवली आहे. अहिल्यानगर जिल्ह्याचे अध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी वैयक्तिक कारणामुळे पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी मोठा निर्णय घेत अहिल्यानगर जिल्ह्याची कमान माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांच्याकडे सोपवली आहे. संपूर्ण जिल्ह्यात शरद पवार यांचे विश्वासू अशी माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांची ओळख आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांपूर्वी त्यांच्याकडे महत्वाची जबाबदारी पक्षाचे सोपवली असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोराने सुरू आहे. नगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठी गळती लागली आहे. त्यामुळे माजी आमदार दादाभाऊ कळमकर आता कोणत्या पद्धतीने पक्षाला एकत्र करून निवडणुकीचा सामना करणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.

Sharad Pawar: निवडणुका जाहीर होताच अहिल्यानगरसाठी शरद पवारांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय Read More »

Rohit Pawar: क्रिकेटच्या मैदानात आमदार रोहित पवारांची फटकेबाजी

Rohit Pawar: जळगाव शहरात आयोजित एका शालेय क्रिकेट स्पर्धेच्या मैदानावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी आज भेट देत महाराष्ट्र आणि उत्तराखंड संघातील सामना पाहिला. सामना संपल्यानंतर त्यांनी स्वतः मैदानात उतरून काही फटकार ठोकत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. खेळ संपल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना राजकीय क्षेत्रात येताना येणाऱ्या ‘गुगली, स्पिन आणि स्पेस’ डिल करणं शिकावं लागतं असं सांगितलं. पण, ‘गावठी शॉट’ म्हणजेच खालच्या पातळीचं वक्तव्य टाळावं लागतं, असं त्यांनी स्पष्टपणे नमूद केलं. यावेळी रोहित पवार यांनी मराठी मीडियालाही आपला ‘कोच’ संबोधत, “मीडिया वेळोवेळी वेडी वाकडी पण अभ्यासपूर्ण प्रश्न विचारतं. त्यांना टाळण्यापेक्षा योग्य उत्तरं देण्याचा प्रयत्न केल्यामुळेच मी कोणत्याही वादात अडकलेलो नाही,” अशी प्रतिक्रिया देखील रोहित पवार यांनी दिली.

Rohit Pawar: क्रिकेटच्या मैदानात आमदार रोहित पवारांची फटकेबाजी Read More »

Nilesh Lanke: नगरच्या राजकारणात नवीन ट्विस्ट, मनपा प्रभाग रचनेवर लंकेंची हरकत; केली मोठी मागणी

Nilesh Lanke : अहिल्यानगर महापालिका निवडणुकीसाठी नवी प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. मात्र आता या प्रभाग रचनेवर खासदार निलेश लंके यांनी हरकत घेत जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिले आहे. ३ सप्टेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप प्रभागांच्या भूसीमांबाबतचे प्राधिकृत प्रकाशन रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे. लंके यांनी निवेदनात नमूद केले आहे की, नव्या प्रभाग रचनेत अनुसूचित जाती-जमाती, मागासवर्गीय व महिलांसाठी राखीव जागांचा कोणताही तपशील दिलेला नाही. हे भारतीय संविधानाच्या कलम १६, २४३(टी), २४३(एस) तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ च्या कलम ५(अ) च्या तरतुदींना सरळ विरोध करणारे आहे. खासदार लंके यांनी आरोप केला की प्रभागांची रचना गुगल मॅपवर वाकड्या-तिकड्या रेषा मारून, गोपनीयतेचा भंग करत व मतदारसंघांची ताटातूट करून करण्यात आली आहे. “राजकीय विरोधकांना संपवण्यासाठीच हा डाव आखण्यात आला आहे,” असा त्यांचा दावा आहे. २०१८ च्या मनपा निवडणुकीत तत्कालीन आयुक्तांनी प्रत्येक प्रभागाचे आरक्षण जाहीर करून नागरिकांच्या हरकती मागवल्या होत्या. मात्र यावेळी त्या प्रक्रियेचे उल्लंघन झाले असून, हरकती दाखल करण्याचा मूलभूत अधिकारही नागरिकांकडून हिरावून घेतल्याचा आरोप लंके यांनी केला. नगर विकास विभागाच्या १० जून २०२५ च्या आदेशातील नैसर्गिक मर्यादा- मोठे रस्ते, गल्ल्या, नद्या, नाले, डोंगर, रेल्वे रुळ यांचा विचार न करता ही रचना करण्यात आली आहे, असेही निवेदनात नमूद आहे. त्यामुळे २०१८ प्रमाणेच जुनी प्रभाग रचना कायम ठेवूनच आगामी महानगरपालिका निवडणूक घ्यावी, अशी ठाम मागणी खासदार लंके यांनी केली आहे.

Nilesh Lanke: नगरच्या राजकारणात नवीन ट्विस्ट, मनपा प्रभाग रचनेवर लंकेंची हरकत; केली मोठी मागणी Read More »

rohit pawar on devendra fadnavis

Rohit Pawar On Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नावाने जाहिरात देणारे मंत्री कोण? रोहित पवारांचा हल्लाबोल

Rohit Pawar On Devendra Fadnavis: मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने जीआर जारी केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने राज्यातील सर्व वर्तमानपत्रात जाहिरात देण्यात आली होती. सध्या या जाहिरातीवरून विरोधक राज्य सरकारवर जोरदार टीका करत आहे. तर दुसरीकडे आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी गंभीर आरोप करत राज्य सरकारवर टीका केली आहे. या प्रकरणात रोहित पवार यांनी एक्स वर ट्विट करत म्हटले आहे की, एकीकडे राज्यात रोज ८ शेतकरी आत्महत्या होत असताना आणि अतिवृष्टीने संपूर्ण महाराष्ट्र झोडपला असताना वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर तसेच अनेक विमानतळांवर कोट्यवधी रुपये उधळून मुख्यमंत्र्यांच्या मोठमोठ्या जाहिराती देण्याची सरकारची वृत्ती बघून मोठी चीड आली, परंतु मा. देवेंद्र फडणवीस साहेबांसारखे मोठे नेते अशी चूक करणार नाहीत, हा विश्वास होता. या कोट्यवधी रुपयांच्या जाहिरातीबद्दल अधिक माहिती घेतली असता या जाहिराती देवेंद्र फडणवीस साहेबांना न कळवताच सरकारमधील एका मंत्र्याने परस्पर दिल्या असल्याचे समजले आणि विशेष म्हणजे हे मंत्री महोदय भाजपाचे नाहीत तर मित्रपक्षाचे आहेत असे देखील कळत आहे. मला मिळालेली माहिती खरी असेल तर मित्रपक्षाच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांसाठी निनावी पद्धतीने परस्पर एवढ्या कोट्यवधी रुपयांच्या जाहिराती का दिल्या? या जाहिरातीसाठीचे कोट्यवधी रुपये कुठून आले? हा मंत्री कोण? असे अनेक प्रश्न निर्माण होतात. जाहिराती देणारे समोर आले तर या प्रश्नांची उत्तरं नक्कीच मिळतील. असं रोहित पवार म्हणाले.

Rohit Pawar On Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नावाने जाहिरात देणारे मंत्री कोण? रोहित पवारांचा हल्लाबोल Read More »

Rohit Pawar: MIDC मध्ये दादांची दादागिरी का? रोहित पवारांचा हल्लाबोल

Rohit Pawar: पुणे एमआयडीसी मध्ये दादागिरी सुरू असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर आता कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. माध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले की पुण्यातून अनेक कंपन्या जात आहे. तळेगाव, चाकण या परिसरातील कंपन्या जात आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जर व्यासपीठावर दादागिरी असे म्हणत असतील तर तुम्ही काय करत आहात असा प्रश्न निर्माण होतो. पुण्यामध्ये एमआयडीसी मध्ये दादांची दादागिरी आहे का? दादाच्या पक्षाचे दादागिरी आहे की भाजपची दादागिरी आहे की एकनाथ शिंदे यांच्या नेत्यांची दादागिरी आहे हे एकदा स्पष्ट झालं पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला दादागिरी करता याची लवकरात लवकर नाव जाहीर करावी अशी मागणी रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना केली. तर महायुतीमध्ये सगळं ऑल इज वेल नसल्याने एकनाथ शिंदे दिल्लीवारी करत आहे असं देखील त्यांनी म्हटले आहे. एकनाथ शिंदे कुठेही गेले तर या तिन्ही महायुतीमध्ये सगळं ऑल इज वेल नाही असे दिसते. नेत्यांना चिडण्यापेक्षा महाराष्ट्रातील जनतेने यांचा त्रास होऊ लागलेला आहे. विकासाचा दर खुंटला आहे. देवेंद्र फडणीस यांना सगळं माहीत असताना सगळ्या कंपन्या गुजरातला जात असतील भूमिका कदाचित भाजपची असावी अशी टीका रोहित पवार यांनी केली. तर कृषिमंत्री नवीन काय म्हणाले तर वाकडी काम पण सरळ करावी लागतात, यांनी त्यांनी महाराष्ट्राचे तिजोरी वेडीवाकडी केली आहे, वाकड्यात काम करण्यासाठी कृषिमंत्री पद दिलं नाही. सरळ काम करणाऱ्यांच्या मी पाठीशी राहतो, वाकड काम जर तुमच्या हातून झालं तर महाराष्ट्र माफ करणार नाही आम्ही तुम्हाला माफ करणार नाही असेही रोहित पवार म्हणाले.

Rohit Pawar: MIDC मध्ये दादांची दादागिरी का? रोहित पवारांचा हल्लाबोल Read More »

ठाकरे बंधूंना शरद पवारांचा जाहीर पाठिंबा; 5 तारखेच्या मोर्चात सहभागी होणार

Sharad Pawar: मराठीच्या समर्थनार्थ पुकारलेल्या ५ जुलै रोजीच्या मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने पाठिंबा दर्शविला आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी एक पत्र ट्विट करत भूमिका स्पष्ट केली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील आपल्या पत्रात म्हटले आहेत की, महाराष्ट्राहिताचा प्रश्न उभा राहतो तेव्हा महाराष्ट्रासाठी आणि जेव्हा राष्ट्रहिताचा प्रश्न उभा राहतो तेव्हा राष्ट्रासाठी पक्षीय भेदाभेद बाजूला सारून उभं राहणं हेच ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ पक्षाचं स्पष्ट धोरण आहे असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र सरकारने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP 2020) याअंतर्गत त्रिभाषा सूत्राचं समीकरण पुढे करत इयत्ता पहिलीपासून शालेय अभ्यासक्रमात हिंदी भाषा बंधनकारक करण्याचे योजिले आहे. ह्याविरोधात महाराष्ट्रात मराठी भाषिकांमध्ये टोकाचं जनमत तयार होत आहे. अनेक विद्यार्थी, पालक, शिक्षणतज्ञ, भाषातज्ञ अशा सर्व मान्यवरांनी त्रिभाषा सूत्र इयत्ता पहिलीपासून राबविण्यास विविधं आक्षेप नोंदविले आहेत. पण कुणालाही न जुमानता राज्य सरकार ‘हिंदी सक्ती’साठी हट्ट धरून बसलं आहे असे ते म्हणाले. खरं तर, महाराष्ट्राच्या जनमानसाचा कानोसा घेतलात तर जाणवतं की, कुणाचाही विविधं भाषा शिकण्याला किंबहुना हिंदी भाषेलाही विरोध नाही, पण इयत्ता पहिलीपासूनच प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतून व्हावं असा आग्रह आहे, जो योग्य आहे. आणि, ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ पक्ष म्हणून आमचीही हीच भूमिका आहे असे स्पष्ट करताना त्यांनी शैक्षणिक धोरणाच्या त्रिभाषा सूत्राआडून मातृभाषेला डावलण्यासाठी प्रयत्न होत असतील तर मराठी माणूस एकदिलाने त्याचा विरोध करणार, ह्याची सत्ताधाऱ्यांनी नोंद घ्यावी असा इशाराही दिला. महाराष्ट्र सरकारच्या ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP 2020)’ अंतर्गत त्रिभाषा सूत्रान्वये केल्या जाणाऱ्या हिंदी सक्तीला विरोध करण्यासाठी येत्या शनिवारी, ५ जुलै २०२५ रोजी तमाम मराठीजनांकडून मुंबईत एक मोर्चा पुकारण्यात आला आहे. ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ पक्षाचा ह्या मोर्चाला संपूर्ण पाठिंबा आहे. महाराष्ट्राहिताचा प्रश्न उभा राहतो तेव्हा महाराष्ट्रासाठी आणि जेव्हा राष्ट्रहिताचा प्रश्न उभा राहतो तेव्हा राष्ट्रासाठी पक्षीय भेदाभेद बाजूला सारून उभं राहणं हेच ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ पक्षाचं स्पष्ट धोरण आहे. म्हणूनच, मी पक्षाच्या सर्व लोकप्रतिनिधींना, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवाहन करत आहे की, येत्या ५ जुलैच्या मोर्चात प्रचंड संख्येने आवर्जून सहभागी व्हा असे आवाहन त्यांनी केले आहे.

ठाकरे बंधूंना शरद पवारांचा जाहीर पाठिंबा; 5 तारखेच्या मोर्चात सहभागी होणार Read More »

Sunil Tingre : पॉर्श प्रकरणात अडकलेल्या सुनील टिंगरेंना मोठा धक्क, रेखा टिंगरे यांची भाजपला सोडचिठ्ठी

Sunil Tingre : विधानसभा निवडणुकीच्या काळात पॉर्श प्रकरणात अडकलेल्या आमदार सुनील टिंगरे यांना मोठा धक्का बसला आहे. आज वडगाव शेरीतील भाजपच्या माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (शरद पवार गट) प्रवेश केला आहे. माहितीनुसार, माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोदी बागेत शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बापूसाहेब पठारे हे देखील यावेळी उपस्थित होते. या प्रवेशाने आमदार सुनील टिंगरे यांना मोठा धक्का बसला असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होत आहे. आधीच अडचणीत सापडलेले आमदार सुनील टिंगरे या प्रवेशानंतर आणखी बॅकफूटवर आले आहे. राज्यात यावेळी हा विकास आघाडी आणि महायुती मध्ये काही मुख्य लढत होत आहे. विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार असून 23 नोव्हेंबर रोजी मत मोजणी होणार आहे.

Sunil Tingre : पॉर्श प्रकरणात अडकलेल्या सुनील टिंगरेंना मोठा धक्क, रेखा टिंगरे यांची भाजपला सोडचिठ्ठी Read More »

Rohit Pawar : रोहित पवारांकडून उमेदवारी अर्ज दाखल, राम शिंदेंशी बिग फाईट

Rohit Pawar : 2019 प्रमाणे 2024 लाही राज्यामध्ये कर्जत-जामखेड हा मतदार संघ लक्षवेधी राहणार आहे. या मतदारसंघातून भाजपाकडून माजी मंत्री आमदार राम शिंदे यांच्या विरोधात महाविकास आघाडी कडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे रोहित पवार हे उमेदवार पुन्हा एकदा आमने सामने असल्याने ही लढत मोठी रंगतदार आणि त्याचबरोबर आरोप प्रत्यारोपाने गाजणार असून राज्यात लक्षवेधी ठरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदर रोहित पवार यांनी सहकुटुंब येत आपला उमेदवारी अर्ज कर्जत येथे दाखल केला. अर्ज दाखल केल्यानंतर कर्जत शहरातून एक भव्य अशी रॅली काढण्यात आली होती. या रॅलीमध्ये कर्जत आणि जामखेड तालुक्यातील हजारो लोकांचा सहभाग दिसून आला. रॅली नंतर एका मोठ्या सभेचा आयोजनही करण्यात आलेलं होते. यावेळी माध्यमांशी बोलताना रोहित पवार यांनी मी 2019 प्रमाणे आताही एका बलाढ्य पक्षा विरुद्ध लढत असलो तरी विजय पुन्हा माझाच होईल असा विश्वास व्यक्त केला. ही निवडणूक जिंकण्यासाठीच असून पुढील पाच वर्षासाठी कोणती विकास कामे करायचे याचे प्लॅनिंग मी केलेले आहे. राम शिंदे यांच्यावर टीका करताना पवार यांनी, त्यांना विकासाबद्दल काहीही कळत नसल्याचा टोला लगावला. त्यांनी विकास कामे केले किंवा मी केली यासाठी त्यांनी समोरासमोर येऊन कोणी किती विकास कामे केली हे सांगावे असे खुले आव्हान रोहित पवार यांनी राम शिंदे यांना दिले आहे. महाविकास आघाडी या निवडणुकीत 170 ते 180 जागांवर निवडून येईल असा दावा यावेळी रोहित पवार यांनी केला. विरोधकांनी जाणीवपूर्वक मतं खाण्यासाठी सुपारीबाज उमेदवार उभे केले आहेत, मात्र जनतेला विकासा कोण करेल याची माहिती असल्याने महाविकास आघाडी सोबत राज्यातील जनता राहील असा विश्वासही रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

Rohit Pawar : रोहित पवारांकडून उमेदवारी अर्ज दाखल, राम शिंदेंशी बिग फाईट Read More »