DNA मराठी

Nanded news

hemant patil

Hemant Patil on Ashok Chavan : भाजप सेनेची युती तुटण्यास अशोक चव्हाण कारणीभूत; हेमंत पाटलांचा गंभीर आरोप

Hemant Patil on Ashok Chavan : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आता जोरदार प्रचाराला सुरुवात झाली आहे. महायुतीमधील अनेक पक्ष या निवडणुकीत स्वयंबळावर निवडणूक लढवत आहे. तर दुसरीकडे नांदेड जिल्ह्यातील स्थानिक निवडणुकीत युती तुटल्याने शिवसेनेचे नेते हेमंत पाटील यांनी थेट अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा साधला आहे. मी म्हणेल तसेच जिल्ह्याने चालावे, या भूमिकेमुळेच चव्हाण यांनी युती तोडली, असा आरोप पाटील यांनी केला. शिवसेनेच्या आमदारांनी 60-20 टक्के जागा वाटपाचा प्रस्ताव घेऊन शिवसेनेचे जिल्ह्यातील तीनही आमदार यांनी दोन वेळा चव्हाण यांची भेट घेतली, पण त्यांनी जागा देण्यास नकार दिला. पैशाच्या जोरावर कार्यकर्ते आणि पक्ष संपवण्याचा प्रयोग नांदेडमध्ये अनेक वर्षांपासून सुरू असल्याचा गंभीर आरोपही हेमंत पाटील यांनी केला आहे. मोठ्या निवडणुकांसाठी युती करायची आणि कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत युती तोडायची, ही पद्धत चुकीची असल्याचे मत त्यांनी मांडले. तर दुसरीकडे राज्यात नगरपरिषद आणि नगरपंचायतसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान आणि 3 डिसेंबर रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे देखील सर्वांचे लक्ष लागून आहे.

Hemant Patil on Ashok Chavan : भाजप सेनेची युती तुटण्यास अशोक चव्हाण कारणीभूत; हेमंत पाटलांचा गंभीर आरोप Read More »

Nanded News : विविध मागण्यांसाठी आदिवासी समाज बांधवांचा मोर्चा नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला

Nanded News : विविध मागण्यांसाठी आदिवासी समाज बांधवांचा मोर्चा नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. नांदेड शहरातील महात्मा फुले पुतळा पासून या मोर्चाला सुरुवात झाली. महात्मा फुले पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालया पर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. आदिवासी समाजातील नरहरी झिरवळ,किरण लमहाटे,डॉ राजेंद्र भारुड यांच्या प्रतिमेचे काही समाज कंटकांनी जागतिक आदिवासी दिनी  दहन केले,त्या समाज कंटकांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत,12 हजार 500 जागांवर भरती प्रक्रिया राबविण्यात यावी,पेसा अंतर्गत भरती प्रक्रिया तात्काळ घेण्यात यावी,यासह इतर मागण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला.या मोर्चात आदिवासी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.  शासनाने तात्काळ आमच्या मागण्याची दखल घेऊन मागण्या मान्य कराव्यात अन्यथा या मागण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आदिवासी समाज बांधव रस्त्यावर उतरले असा इशारा माजी आमदार संतोष टारफे यांनी दिलाय.

Nanded News : विविध मागण्यांसाठी आदिवासी समाज बांधवांचा मोर्चा नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला Read More »

Nanded News : गुरुद्वारा दमदमा साहिबच्या ऐतिहासिक तलावाला प्रदूषण व अतिक्रमणाचा विळखा

Nanded News : गुरुद्वारा दमदमा साहिब वसमतनगर येथील ऐतिहासिक तलाव परिसरामध्ये अतिक्रमण वाढले असून त्यांच्याकडून ड्रेनेजचे पाणी तलावामध्ये सोडल्याने घाणीचे साम्राज्य वाढले असून संसर्गजन्य आजारांचा धोका वाढल्याने त्याचा बंदोबस्त करून कारवाई करावी अशी मागणी हजुरी पाठी संघटनेने हिंगोली जिल्हाधिकारी जितेंद्र पापीलवार यांना केली आहे.   नांदेड येथील सचखंड गुरुद्वारा बोर्ड प्राधिकरणाच्या अधिपत्याखाली चालणारा हिंगोली जिल्ह्यातील वसमतनगर येथील गुरुद्वारा दमदमा साहिब येथील तलावाशेजारी मागील दहा ते बारा वर्षांपासून अतिक्रमण वाढले आहे.  अतिक्रमणधारकांनाकडून तलावामध्ये ड्रेनेजचे घाण पाणी सोडले जात असल्याने संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण झाला आहे. दमदमा साहिब गुरुद्वाराच्या दर्शनासाठी जगभरातून भाविक मोठ्या श्रद्धेने येत असतात. प्रदूषित तलावाच्या पाण्यामुळे भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे.         ऐतिहासिक तलावातील दुर्गंधी व घाणीमुळे आजारांचा धोका निर्माण झाल्याने या परिसरातील अवैधरित्या करण्यात आलेले अतिक्रमण हटवून तलावाला प्रदूषित करणाऱ्यांवर कारवाई करून तलावाची पावित्र्य कायम ठेवावे अशी मागणी हजूरी पाठी संघटनेचे अध्यक्ष दलजीतसिंघ बिशनसिंघ हजूरीपाठी, परदीपसिंघ जितसिंघ रागी, जगदीपसिंघ नंबरदार, महेंद्रसिंघ पैदल, हुकुमसिघ काराबिन यांनी हिंगोली जिल्हाधिकारी, वसमत उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी , सचखंड गुरद्वारा बोर्ड अधिक्षकांसह नांदेड जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे.

Nanded News : गुरुद्वारा दमदमा साहिबच्या ऐतिहासिक तलावाला प्रदूषण व अतिक्रमणाचा विळखा Read More »