DNA मराठी

Manoj Jarange Patil News

Manoj Jarange

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंवर उपचार सुरू, आज घेणार मोठा निर्णय?

Manoj Jarange Patil: मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी 25 जानेवारीपासून अंतरवाली सराटी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहे. जोपर्यंत सरकार मागण्या मान्य करणार नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही. अशा इशारा देखील त्यांनी दिला आहे. यातच आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. या अपडेटनुसार मनोज जरांगे पाटलांवर अखेर उपचार सुरु करण्यात आले आहेत जरांगे यांना सलाईन लावण्यात आलं आहे. काल रात्री भाजप आमदार सुरेश धस यांनी जरांगे यांची भेट घेऊन सलाईन लावा आणि उपचार घ्या अशी विनंती केली होती. उपचार घेतल्यास आपल्याला चर्चा करता येईल असं धस जरांगे यांना म्हणाले होते त्यांनतर आज जरांगे यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. उपस्थित मराठा आंदोलकांनी जरांगे यांना उपचार घेण्यास भाग पाडलंय त्यामुळे जरांगे यांच्यावर उपचार सुरू झाले आहेत. दरम्यान आज जरांगे काय भूमिका घेतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागून आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जरांगे पाटील यांनी सातव्यांदा उपोषणाला सुरुवात केली आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे तसेच सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी जरांगे पाटील यांनी 25 जानेवारीपासून उपोषणाला सुरुवात केली आहे.

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंवर उपचार सुरू, आज घेणार मोठा निर्णय? Read More »

IMG 20250126 WA0005

Manoj Jarange Patil :  आरक्षण द्या…,  अंतरवाली सराटीत जरांगे पाटलांसह गोरख दळवी यांचे उपोषण सुरू

Manoj Jarange Patil : मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा 25 जानेवारीपासून अंतरवाली सराटीत अमरण उपोषणाला बसले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी जरांगे पाटील सातव्यांदा उपोषणाला बसले आहे. तर यावेळी त्यांच्यासोबत नगर शहरातील सामाजिक कार्यकर्ते गोरख दळवी देखील उपोषणाला बसले आहे. गोरख दळवी यांनी नगर शहरात मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आतापर्यंत अनेकदा उपोषण केले आहे. तसेच अनेकदा नगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना देखील निवेदन दिले आहे. याच बरोबर गोरख दळवी यांनी मराठा आरक्षणासाठी नगर शहरासह जिल्ह्यात अनेक वेळा आंदोलन देखील केले आहे. तर आता मराठा समाजाला तात्काळ आरक्षण देण्यात यावे या मागणी करिता अंतरवाली सराटी येते मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आमरण उपोषण करत आहे. राज्यातील मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात यावे.आंदोलनाच्या वेळी दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावे तसेच सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी या मागणी करिता मनोज जरांगे पाटील यांनी 25 जानेवारीपासून अंतरवाली सराटी येथे  अमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.

Manoj Jarange Patil :  आरक्षण द्या…,  अंतरवाली सराटीत जरांगे पाटलांसह गोरख दळवी यांचे उपोषण सुरू Read More »

Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil : जरांगे पाटलांची मोठी घोषणा, सर्व उमेदवारांना अर्ज मागे घेण्याचे आदेश

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा करत विधानसभा निवडणुकीमध्ये आपले उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सर्व उमेदवारांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे आदेश देखील त्यांनी दिले आहे. काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील विधानसभा निवडणुकीत उमेदवार जाहीर करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती मात्र आज मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा करत विधानसभा निवडणुक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आज अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस आहे. यावेळी मनोज जरांगे पाटील म्हणाले की, फक्त मराठा समाजावर निवडून येणे शक्य नाही त्यामुळे रात्री 3 पर्यंत चर्चा करून निवडणुक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आता आमच्या विरोधकातील लोक पाडायचे असा निर्णय घेतला असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. तर दुसरीकडे महायुती आणि महाविकास आघाडीचे अनेक नेत्यांनी बंडखोरी केल्याने ते देखील अर्ज माघारी घेणार का? याकडे देखील सर्वांचे लक्ष लागून आहे.

Manoj Jarange Patil : जरांगे पाटलांची मोठी घोषणा, सर्व उमेदवारांना अर्ज मागे घेण्याचे आदेश Read More »

Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil: 12 ऑगस्तला जरांगे पाटील अहमदनगर शहरात! ‘या’ मार्गाने निघणार शांतता रॅली

Manoj Jarange Patil: मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील 12 ऑगस्ट रोजी अहमदनगर शहरात दाखल होणार आहे.  अहमदनगर शहरात 12 ऑगस्ट रोजी जरांगे पाटील यांचे नेतृत्वाखाली मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.  यासाठी अखंड मराठा समाज अहमदनगर यांच्या वतीने साईमुरली लॉन येथे जिल्हास्तरीय बैठक आयोजन करण्यात आली होती.  सत्ताधारी आणि विरोधक गेंड्याच्या कातडीचे झाले आहे. त्यांना लोकांचे भावना समजत नाही. समाजाला हे वारंवार आश्वासन देत आहे मात्र ते पाडले जात नाही. ज्यामुळे पुन्हा एकदा जरांगे पाटील यांनी शांतता रॅलीचे आयोजन केले आहे.  या रॅलीला मराठवाड्यात मोठा समर्थन मिळाला आहे तर आता आपल्या भागात या रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. नगर शहरात होणाऱ्या या रॅलीत दहा लाख लोक येणार आहे. सध्या लोकांमध्ये सरकार आणि विरोधकांबद्दल मोठा रोष निर्माण झाला आहे. 12 तारखेला लोकं घराला कुलूप लावून रस्त्यावर उतरणार आहे. आचारसंहिता लागण्यापूर्वी आम्ही आरक्षण मिळवून राहणार. अशी प्रतिक्रिया डीएनए मराठीशी बोलताना गजेंद्र दांगट यांनी दिली. असा असणार रॅलीचा मार्ग  12 ऑगस्त रोजी मनोज जरांगे पाटील यांची रॅली दिल्लीगेट, कापड बाजारहून शिवाजी महाराजांच्या पुतळ्या जवळ संपणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.

Manoj Jarange Patil: 12 ऑगस्तला जरांगे पाटील अहमदनगर शहरात! ‘या’ मार्गाने निघणार शांतता रॅली Read More »

Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil : सरकारला 13 ऑगस्टपर्यंत वेळ, मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण अचानक स्थगित

Manoj Jarange Patil : मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील यांनी 20 जुलैपासून पाचव्यांदा उपोषणाची सुरुवात केली होती मात्र आता एक मोठी बातमी समोर आली आहे.  या बातमीनुसार मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा विचार करण्यासाठी राज्य सरकारला 13 ऑगस्टपर्यंतचा वेळ दिला आहे. याच बरोबर त्यांनी 20 जुलैपासून सुरू असणारा उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.  आज (24जुलै) माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, आता सलाईन लावून उपोषण करण्याला काहीही अर्थ नाही. मी येत्या 13 ऑगस्टपर्यंत सरकारला वेळ देतो, तो पर्यंत सरकारने आमच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात. असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

Manoj Jarange Patil : सरकारला 13 ऑगस्टपर्यंत वेळ, मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण अचानक स्थगित Read More »

Manoj Jarange

Manoj Jarange Patil: मराठा आरक्षण,इंटरनेट बंद! ‘या’ जिल्ह्यात संचारबंदी लागू

Manoj Jarange Patil :  मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या आक्रमक भूमिकेने राज्यभरात मराठा आंदोलकही आक्रमक होत आहेत. काही ठिकाणी एसटी बसेस जाळण्याच्या घटनाही समोर येत आहेत. मात्र, मनोज जरांगे यांनी मुंबईला जाण्याचा निर्णय पुढे ढकलला आहे. मनोज जरांगे बॅकफूटवर? मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी रविवारी भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. तसेच अपशब्द वापरले. यानंतर त्यांचे सहकारी मंचावर आले आणि त्यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण मनोज जरांगे काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. अंतरवली सराईत पत्रकारांशी बोलत असताना जरांगे अचानक आक्रमक झाले. जरांगे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. मुंबईतील फडणवीस यांच्या निवासस्थानी असलेल्या सागर बंगल्याला भेट देण्याचे त्यांनी ठरवले आणि लगेच निघाले.  नंतर रात्री जवळच्या भांबेरी गावात मुक्काम करून सकाळी पुन्हा मुंबईला जाण्याचा बेत होता, मात्र प्रशासनाने लादलेल्या विविध निर्बंधांमुळे मनोज जरांगे यांनी आपला निर्णय रद्द केला. ते पुन्हा अंतरवाली सराटीत परतले आहेत. त्यांनी मराठा आंदोलकांना शांतता राखण्याचे आवाहन केले असून त्यांना परत येण्याची विनंती केली आहे. अंबड तालुक्यात हिंसाचार जालना – घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी गावात सोमवारी सकाळी आंदोलकांनी एसटी बस पेटवून दिल्याचा आरोप आहे. बस अंबडहून रामसगावकडे जात होती. आज पहाटे साडेसहाच्या सुमारास तीर्थपुरी गावात अज्ञातांनी बस थांबवून तोडफोड केल्यानंतर ती पेटवून दिली. घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जालन्यात संचारबंदी लागू कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती लक्षात घेऊन जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, सरकारी कार्यालये, शाळा, राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक, दूध वितरण, प्रसारमाध्यमे आणि रुग्णालये यांना या आदेशातून सूट देण्यात आली आहे. एसटी बससेवा बंद मनोज जरांगे यांच्या हालचाली पाहता प्रशासन सतर्क झाले आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व आगारातील एसटी बसेसची वाहतूक तात्पुरती बंद करण्याचे आदेश पोलीस प्रशासनाने दिले आहेत. त्यामुळे राज्य परिवहन मंडळाच्या एसटी बसेसची वाहतूक ठप्प झाली आहे. इंटरनेट डाऊन मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कायदा आणि सुव्यवस्थेच्या समस्येमुळे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यातील इंटरनेट सेवा 10 तास बंद राहणार आहे. गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सैनिक यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे 10 फेब्रुवारीपासून अंतरवली सराटी येथे उपोषणाला बसले आहेत. मात्र, राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाला स्वतंत्र 10 टक्के आरक्षण देणारा अध्यादेश काढला.

Manoj Jarange Patil: मराठा आरक्षण,इंटरनेट बंद! ‘या’ जिल्ह्यात संचारबंदी लागू Read More »

Manoj Jarange Patil Photo

Maratha Reservation : 14 फेब्रुवारीला महाराष्ट्र बंद आंदोलन! सकल मराठा समाजाची घोषणा

Maratha Reservation: गेल्या महिन्यात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याची घोषणा केली होती. मात्र या घोषणेची कायद्यात रूपांतर करावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सूरू केला आहे. या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाने 14 फेब्रुवारी 2024 रोजी महाराष्ट्र बंद आंदोलनाची घोषणा केली आहे.  यासाठी आज संघटनेकडून अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना निवेदन देण्यात आले आहे.   या निवेदनात म्हटले आहे की, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 10 फेब्रुवारी 2024 रोजी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे.  सर्व सामान्य मराठा समाज आज आरक्षणासाठी शांततेत मोर्चे काढून सरकारला आरक्षणाची मागणी करत आहे. सरकारला वेळ देऊन सुद्धा सरकार वेळ काढूपणा करत आहे. उ‌द्या जर जरांगे पाटील यांच्या जीवाचे काही बरे-वाईट झाले तर, महाराष्ट्रात उद्रेक होईल याची सरकारने गांभीर्याने दाखल घ्यावी. तरी जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठींबा म्हणून सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्र यांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र बंद आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. त्याचाच भाग म्हणून अहमदनगर शहरासह संपूर्ण जिल्हा बंद पुकारण्यात येत आहे.

Maratha Reservation : 14 फेब्रुवारीला महाराष्ट्र बंद आंदोलन! सकल मराठा समाजाची घोषणा Read More »

Maratha Reservation 1

Maratha Reservation: अहमदनगर जिल्ह्यातून मराठा आरक्षणासाठी मुंबईमध्ये दाखल होणार ‘इतक्या’ बसेस

Maratha Reservation: मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणी करिता आमरण उपोषणसाठी मनोज जरांगे पाटील मुंबईमध्ये येत्या काही दिवसात पायी दाखल होणार आहे. यासाठी पाटील यांनी 20 जानेवारी 2024 ला सकाळी 9 वाजता अंतरवाली सराटी येथून या वारीची सुरुवात केली आहे. तर अहमदनगर जिल्ह्यात 21 जानेवारी रोजी ही वारी दाखल झाली होती. अहमदनगर शहराच्या नजीक असणाऱ्या बारा बाभळी मदरसा परिसरात पाटील यांचा रात्री मुकाम झाला तर आता पाटील अहमदनगर शहरातून पुण्याकडे रवाना झाले आहे. तर दुसरीकडे अहमदनगर जिल्ह्यातून मनोज जरांगे पाटील यांच्या या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी 25 जानेवारी रोजी लाखोंच्या संख्येत नागरिक पनवेलसाठी रवाना होणार आहे. यासाठी आतापर्यंत जिल्ह्यातून 100 पेक्षा जास्त बसेस बूक झाले असल्याची माहिती संघटनेने दिली आहे. याच बरोबर येत्या काही दिवसात ही संख्या आणखी वाढणार असल्याची देखील महिती संघटनेने दिली.

Maratha Reservation: अहमदनगर जिल्ह्यातून मराठा आरक्षणासाठी मुंबईमध्ये दाखल होणार ‘इतक्या’ बसेस Read More »

Manoj Jarange Patil Photo

Maratha Reservation: मराठ्यांना न्याय मिळेल? मनोज जरांगे पाटील तयार! असं आहे संपूर्ण वेळापत्रक

Maratha Reservation: मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी उद्यापासून मराठा समाजाला आरक्षण मिळून देण्यासाठी लढणारे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील मुंबईकडे रवाना होणार आहे.  मनोज जरांगे पाटील यांनी यापूर्वी 23 डिसेंबर 2023 रोजी सरकारने मराठ्यांना 20 जानेवारीपर्यंत कुणबी आरक्षण दिले नाहीतर मुंबईत उपोषण करणार असल्याची घोषणा केली होती.  मात्र अद्याप मराठा समाजाला आरक्षण मिळाला नसल्याने पाटील उद्यापासून उपोषणासाठी मुंबईकडे रवाना होणार आहे. काही दिवसापूर्वी सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकामध्ये आरक्षणाबाबत काहीच तोडगा निघाला नसल्याने पाटील यांनी चर्चा नाही तर कृती करा अशी घोषणा केली होती. चला मग या लेखात जाणुन घ्या मनोज जरांगे पाटील यांचे मुंबई दौऱ्याचे वेळापत्रक कसं असणार आहे.  संपूर्ण वेळापत्रक मुंबई दौऱ्यासाठी 20 जानेवारी रोजी अंतरवाली सराटीतून सकाळी नऊ वाजता पायी यात्रेला सुरुवात होणार आहे.  दुपारचे जेवण कोळगाव (ता. गवराई) येथे होईल तर मातोरी (ता. शिरूर) येथे रात्रीचा मुक्काम व जेवण असेल. (बीड जिल्हा) 21 जानेवारी मातोरीतून सकाळी 8 वाजता पुढील प्रवासाला सुरूवात होईल.   तनपुरवाई (ता. पाथर्डी) येथे दुपारचे जेवण तसेच बाराबाभळी-कारंजी बाट (ता, नगर) येथे रात्रीचा मुक्काम व जेवण असेल. 22 जानेवारी बाराबाभळीतून सकाळी 8 वाजता पुढील प्रवासाला सुरूवात होईल.    दुपारी जेवण येथे सुपा (ता. पारनेरे) व रांजणगाव (ता. शिरूर) येथे मुक्काम व रात्रीचे जेवण होईल. (जिल्हा पुणे) 23 जानेवारी रांजणगावातून सकाळी 8 वाजता पुढील प्रवासाला सुरूवात होईल.    दुपारचे जेवण कोरेगाव भिमा येथे व चंदनगर खराडी बायपास येथे मुक्काम व रात्रीचे जेवण होईल. (जिल्हा पुणे) 24 जानेवारी चंदननगर, खराडी बायपास येथून सकाळी 8 वाजता पुढील प्रवासाला सुरूवात होईल.  तसेच तळेगाव दाभाडे येथे दुपारी जेवण व लोणावळ्यात मुक्काम होईल. (पुणे जिल्हा) 25 जानेवारी  लोणावळ्याहून सकाळी 8 वाजता पुढील प्रवासाला सुरूवात होईल. त्यानंतर पनवेल (ता.नवी मुंबई) येथे दुपारी जेवण व वाशी येथे मुक्काम आणि रात्रीचे जेवण होईल. (ठाणे – नवी मुंबई)  26 जानेवारी वाशीतून सकाळी 8 वाजता नाष्टा करून पुढच्या प्रवासाला निघणार असून त्यानंतर थेट आझाद मैदान मुंबई येथे आमरण उपोषणाला बसणार आहेत. यानुसार सगळीकडे मराठा बांधवांच्या वतीने तयारी सुरू आहे.

Maratha Reservation: मराठ्यांना न्याय मिळेल? मनोज जरांगे पाटील तयार! असं आहे संपूर्ण वेळापत्रक Read More »

Maratha Reservation 1

Maratha Reservation: मनोज जरांगेंच्या आंदोलनाची सरकारला धास्ती? सरकारकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू

Maratha Reservation : आरक्षणासाठी आता मराठा समाजाकडून आंदोलन आणखी तीव्र होताना दिसत आहे. 20 जानेवारीपासून मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील मुंबईपर्यंत पायीवारी करुन अमरण उपोषण करणार आहे.  पाटील यांच्यासोबत या वारीमध्ये वीस ते पंचवीस लाख लोकांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे. यामुळे सरकार जरांगेंची समजूत काढण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू केल्याची माहिती मिळत आहे.   समोर आलेल्या माहितीनुसार मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लक्ष ठेवून आहे. यामुळे येत्या काही दिवसात राज्य सरकार मराठा आरक्षणावर वेळी तोडगा काढणार असल्याची माहिती समोर आली आहे. ज्यामुळे पाटील यांना मुंबईत येण्याची वेळ येणार नाही. सरकारचे शिष्टमंडळ पुन्हा जरांगेंच्या भेटीला सरकारचे शिष्टमंडळ पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला आज गेले आहे. मिळालेल्या माहितीनुसार या शिष्टमंडळामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे ओएसडी मनोज चिवटे आणि बच्चू कडू यांचा समावेश आहे.

Maratha Reservation: मनोज जरांगेंच्या आंदोलनाची सरकारला धास्ती? सरकारकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू Read More »