DNA मराठी

Manikrao Kokate News

manikrao kokate

Manikrao Kokate : मोठी बातमी, माणिकराव कोकाटेंना उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा

Manikrao Kokate : राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माणिकराव कोकाटे यांना शासकीय कोट्यातील 10 टक्के सदनिका गैरव्यवहार प्रकरणी आज उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. उच्च न्यायालयाने या प्रकरणात माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर केली. मात्र या प्रकरणात उच्च न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यास नकार देत आमदारकीचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा असे आदेश दिले आहे. शासकीय कोट्यातील 10 टक्के सदनिका गैरव्यवहार प्रकरणी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने मोठा निर्णय माणिकराव कोकाटे यांची 2 वर्ष कारावासची शिक्षा कायम ठेवली होती. या प्रकरणात शिक्षा कायम असल्याने माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आला होता. अटक वॉरंट जारी झाल्यानंतर कोकाटे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. तर प्रकृती बिघडल्याने उपचारासाठी मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. या प्रकरणात माणिकराव कोकाटे यांना शिक्षा कायम ठेवण्याचे आदेश नाशिक जिल्हा न्यायालयाने दिल्यानंतर कोकाटे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.

Manikrao Kokate : मोठी बातमी, माणिकराव कोकाटेंना उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा Read More »

manikrao kokate

Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंना धक्का, दत्तात्रय भरणे राज्याचे नवे कृषिमंत्री

Manikrao Kokate: पावसाळी अधिवेशनात सभागृहात ऑनलाइन रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चर्चेत असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माणिकराव कोकाटे यांना मोठा धक्का बसला आहे. माणिकराव कोकाटे यांच्याकडे असणारा कृषी खाते काढून घेण्यात आले आहे. तर माणिकराव कोकाटे यांच्याकडे आता क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व औेकाफ हे खाते देण्यात आले. तर कृषी खाते दत्तात्रय भरणे यांना देण्यात आले आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कोकाटे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत होती मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात झालेल्या बैठकीनंतर कोकाटे यांचं खातं बदलण्यात आले आहे. 28 जुलैला मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी माणिकराव कोकाटे आणि अजित पवार यांच्यात अर्ध्या तासापेक्षा जास्त चर्चा झाली होती. या चर्चेत अजित पवार यांनी तुमच्यामुळे सरकारची बदनामी होत आहे. असं कोकाटेंना म्हटले होते तर भविष्यात असं होणार नसल्याची ग्वाही माणिकराव कोकाटे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिली होती.

Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंना धक्का, दत्तात्रय भरणे राज्याचे नवे कृषिमंत्री Read More »

manikrao kokate

Manikrao Kokate : हजारो विद्यार्थ्यांना दिलासा, कृषीपदवी अभ्यासक्रम प्रवेश अटीत शिथिलता

Manikrao Kokate : कृषी विद्यापीठातील पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विशिष्ट गुणांची अट शिथिल करत खुल्या प्रवर्गासाठी ४५ टक्के आणि आरक्षित प्रवर्गासाठी ४० टक्के गुण आवश्यक असल्याचा बदल करण्यात आला आहे. कृषी पदवीच्या संधीपासून इच्छुक विद्यार्थी वंचित राहू नये, यासाठी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या बैठकीत हा धोरणात्मक निर्णय घेतल्याची माहिती कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली. कृषी विद्यापीठातील बी.एस्सी. (ऑनर्स) कृषी, उद्यानविद्या, बीएफएससी, वनशास्त्र, बी.टेक. कृषी अभियांत्रिकी, अत्रशास्त्र, जैवतंत्रज्ञान, कृषी व्यवसाय व्यवस्थापन व सामुदायिक विज्ञान अशा एकूण ९ पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आतापर्यंत खुल्या वर्गातील उमेदवारांसाठी इ.१२वी (विज्ञान) मध्ये ५०% गुणांची अट होती. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेची ११८वी बैठक नुकतीच पार पडली, याबैठकीत सदर अट शिथिल करत खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ४५% आणि आरक्षित प्रवर्गासाठी ४०% गुणांची अट लागू करण्यात आली आहे. तसेच प्रवेश अर्जासाठी अंतिम मुदत २७ जुलै २०२५ पर्यंत असून इच्छुक विद्यार्थ्यांनी https://cetcell.mahacet.org या संकेतस्थळावर प्रवेशासाठी अर्ज सादर करावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे. 12वीचे टक्के कृषीमुळे वाढणार केंद्रिय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इ.१२ वी (विज्ञान) अभ्यासक्रमात ‘कृषी (८०८)’ हा विषय शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना यापूर्वी पदवी प्रवेशात अधिभार मिळत नव्हता. आता महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या ११५ व्या बैठकीत झालेल्या ठरावानुसार या विषयाला १० गुण अधिभार देण्यास शासनाने मान्यता दिली आहे. यामुळे अशा विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठीच्या गुणवत्तेत वाढ होणार आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्रात आणण्यासाठी सकारात्मक पाऊल असून प्रवेशाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळणार असल्याचा आनंद आहे, असा विश्वास मंत्री कोकाटे यांनी यांनी व्यक्त केला.

Manikrao Kokate : हजारो विद्यार्थ्यांना दिलासा, कृषीपदवी अभ्यासक्रम प्रवेश अटीत शिथिलता Read More »

rohit pawar vs manikrao kokate

Rohit Pawar vs Manikrao Kokate आम्ही कोणालाही घाबरत नाही!” — रोहित पवारांचा थेट इशारा

काही दिवसांपूर्वी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यासह काही विरोधी नेत्यांविरोधात फौजदारी खटला दाखल करण्याचा इशारा दिला होता. अहिल्यानगर  – राज्याच्या राजकारणात सध्या गरम हवा निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आक्रमक आमदार रोहित पवार यांनी थेट राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्यावर घणाघात केला आहे. “आम्ही कोणालाही घाबरत नाही — ना ईडीला, ना पोलीस खटल्यांना आणि ना तुमच्यासारख्या मंत्र्यांना. जे काही करायचं असेल, ते करा. आम्ही ते सगळं सामोरे जाण्यास तयार आहोत,” अशा शब्दांत रोहित पवारांनी (Rohit Pawar) कोकाटेंना थेट इशारा दिला आहे.ही प्रतिक्रिया त्यांनी पुढारी या वृत्तवाहिनीशी बोलताना दिली. त्यांच्या या विधानामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून सत्ताधारी-विरोधकांमध्ये नव्या संघर्षाची चिन्हं स्पष्टपणे दिसू लागली आहेत. *घटनाक्रमाची पार्श्वभूमी*काही दिवसांपूर्वी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये रोहित पवार यांच्यासह काही विरोधी नेत्यांविरोधात फौजदारी खटला दाखल करण्याचा इशारा दिला होता. त्यांच्या म्हणण्यानुसार, काही नेत्यांनी राजकीय फायद्यासाठी त्यांच्यावर खोटे आरोप केले असून त्याविरोधात ते कायदेशीर कारवाई करणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर रोहित पवार (Rohit Pawar) यांनी आता थेट मैदानात उतरून कोकाटेंना चपराक दिली आहे. त्यांनी म्हटलं:“कोकाटे साहेब, तुम्ही शेवटचे चार महिने मंत्री आहात. या काळात काय पराक्रम केलात हे राज्यातील जनतेने पाहिलं आहे. तुम्ही किती वेळा वादात सापडलात, किती विचित्र स्टेटमेंट्स दिलीत, याची साक्ष सर्व महाराष्ट्राने घेतली आहे.” पवारांचा हल्लाबोल — मुख्य मुद्दे“आम्ही कोणालाही घाबरत नाही!”रोहित पवारांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, आम्ही ईडीच्या चौकशांना सामोरे गेलो आहोत, कधीही पळून गेलो नाही. त्यामुळं कोकाटे साहेब, तुमच्या धमक्यांना आम्ही घाबरणार नाही. “कृषिमंत्र्यांची कारकीर्दच वादग्रस्त!”गेल्या काही महिन्यांतील माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांचे वादग्रस्त व्हिडीओ, विधानं, वागत असलेली बेजबाबदार भूमिका यावर रोहित पवारांनी टीकास्त्र सोडलं. “सत्तेचा गैरवापर थांबवा!”त्यांनी आरोप केला की, सत्तेचा वापर करून विरोधकांना दबावाखाली आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र आमचं मनोबल कोणी खच्ची करू शकत नाही. आगामी राजकीय दिशा? या वादातून राज्यात नव्या संघर्षाची सुरुवात झाली आहे. दोघेही नेते आक्रमक असून, राजकीय वातावरण अधिकच तापण्याची शक्यता आहे. कोकाटे यांच्याकडून या टीकेला काय प्रत्युत्तर दिलं जाईल याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.सध्याच्या राजकारणात रोहित पवार (Rohit Pawar) हे विरोधकांतील महत्वाचे आणि आक्रमक नेतृत्व म्हणून समोर आले आहेत. त्यांचा हा थेट आणि सडेतोड इशारा — “जे करायचं असेल ते करा, आम्ही तयार आहोत!” — हा सत्ताधाऱ्यांसाठी एक मोठा साखरझोपेतील धक्का ठरू शकतो.

Rohit Pawar vs Manikrao Kokate आम्ही कोणालाही घाबरत नाही!” — रोहित पवारांचा थेट इशारा Read More »

manikrao kokate

पिक विम्याची 379 कोटी भरपाई मिळणार: कृषीमंत्री माणिकराव कोकटेंची घोषणा

Manikrao Kokate : सर्व समावेशक पीक विमा योजनेंतर्गत पीक नुकसान भरपाईची प्रलंबित 379 कोटी रक्कम विमा कंपनी मार्फत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच जमा होईल आणि माझा बळीराजा सुखावेल, असा विश्वास राज्याचे कृषी मंत्री अँड. माणिकराव कोकाटे (Agriculture Minister Manikrao Kokate) यांनी व्यक्त केला. यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून खरीप हंगाम 2024च्या विमा हप्त्यासाठी तब्बल 1028.97 कोटी रुपयांची मंजूरी मिळाल्याचे त्यांनी सांगितले. खरीप हंगाम 2024 साठी आतापर्यंत 3907.43 कोटीची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली असून यासाठीचे 3561.08 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले होते. मात्र नुकसान भरपाई पोटी 346.36 कोटी प्रलंबित होते. कृषी मंत्री कोकाटे यांच्या सदर बाब निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तातडीने याबाबत प्रशासकीय पातळीवर आढावा घेत याचा सदर प्रस्ताव वित्त विभागाकडे अंतिम मंजूरीसाठी पाठविला होता. या प्रस्तवास वित्त विभागाकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर राज्य शासनाने राज्य विमा हप्त्याचे 1028.97 कोटी रुपये मंजूर केले. त्यामुळे केंद्र सरकारच्या पिक विमा पोर्टलद्वारे सदर कार्यवाही पूर्ण होईल. कृषी (Agriculture Minister) मंत्र्यांच्या सजगतेमुळे आता पीक कापणी प्रयोग आधारित नुकसान भरपाई व काढणी पश्चात नुकसान भरपाईचे प्रलंबित 379 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा कंपनी मार्फत जमा होतील. याबाबत शेताकऱ्यांना काही अडचणी आल्यास आपल्या विभागाशी थेट संपर्क करण्याचे आवाहन कृषी मंत्री कोकाटे यांनी केले आहे.

पिक विम्याची 379 कोटी भरपाई मिळणार: कृषीमंत्री माणिकराव कोकटेंची घोषणा Read More »