DNA मराठी

Maharashtra Rain Update

oplus 16908288

Maharashtra Rain Alert: शेतकऱ्यांनो पिकांना सुरक्षित ठेवा; राज्यात 28 सप्टेंबरपर्यंत धो धो पाऊस

Maharashtra Rain Alert: 24 सप्टेंबरला बंगालच्या उपसागरावर एक कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे, आणि 28 तारखेपर्यंत तो राज्यात येण्याची शक्यता आहे. या कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांमध्ये 26 ते 28 सप्टेंबर दरम्यान आभाळी हवामान आणि पावसात वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात अली आहे. या आठवड्यात मान्सून परत सक्रिय होणार आहे. ज्यामुळे किमान 30 सप्टेंबरपर्यंत तरी राज्यातून मान्सून निरोप घेण्याची शक्यता नाही. सध्याच्या हवामानाच्या अंदाजानुसार 22 ते 25 सप्टेंबर दरम्यान राज्यातील विविध भागांमध्ये मेघ गर्जनेसह वादळी पाऊस अपेक्षित आहे, जो प्रामुख्याने दुपार नंतर पडेल. कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव 26 तारखेपासून जाणवण्याची शक्यता आहे. या दिवशी विदर्भ आणि मराठवाड्यातील पूर्व आणि दक्षिणेकडे असलेल्या भागांमध्ये दुपारनंतर पावसात वाढ होण्याची शक्यता आहे. 27 तारखेला विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये पावसात वाढ होऊ शकते, आणि यातील काही भागांमहे मुसळधार स्वरूपाचा पाऊस देखील पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. 28 तारखेला राज्यातील पश्चिम भागांमध्ये पावसाचा जोर कायम राहू शकतो. शेतकऱ्यांनी हवामानाच्या या अंदाजानुसार शेतीचे नियोजन करावे. काढणी केलेल्या पिकांना पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावे, असे आव्हान कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.

Maharashtra Rain Alert: शेतकऱ्यांनो पिकांना सुरक्षित ठेवा; राज्यात 28 सप्टेंबरपर्यंत धो धो पाऊस Read More »

Rain Alert Today : नागरिकांनो सावधान… 15 सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात यलो अलर्ट जारी, जाणून घ्या सर्वकाही

Rain Alert Today : भारतीय हवामान खात्याने १२ ते १५ सप्टेंबर २०२५ या कालावधीत जिल्ह्यात वीजांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस व तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा वाहण्याचा अंदाज वर्तविला आहे. जिल्ह्यासाठी “यलो अलर्ट” जारी करण्यात आला असून नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गिते यांनी केले आहे. पुणे, नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यांत मध्यम ते मुसळधार पाऊस झाल्यास भिमा, प्रवरा, गोदावरी, घोड, सीना तसेच मुळा धरणातून होणाऱ्या विसर्गामुळे नद्यांची पाणीपातळी वाढू शकते. मुळा नदीपात्रातील कोतूळ येथून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना पुढील दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे. मेघगर्जना, वीजा किंवा वादळी वाऱ्याच्या वेळी झाडाखाली किंवा त्याजवळ थांबू नये, सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. वादळादरम्यान विद्युत उपकरणे वापरू नयेत व वीजेच्या सुवाहक भागांपासून दूर राहावे. मोकळे मैदान, टॉवर, विद्युत खांब, धातूची कुंपणे, लटकणाऱ्या केबल्स यांपासून दूर राहावे. जाहिरात फलकांच्या आसपास थांबू नये. मोकळ्या जागी असल्यास गुडघ्यावर बसून डोके व कान झाकावे. धरण व नदी परिसरात पर्यटनासाठी जाऊ नये, पाण्यात उतरू नये व धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. नदी, ओढा, नाले काठावरील नागरिकांनी पाणीपातळी वाढल्यास त्वरित सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे, पाण्यावरून वाहणारे पूल ओलांडू नयेत. मोडकळीस आलेल्या इमारतींमध्ये थांबू नये. अतिवृष्टीमुळे भूस्खलनाची शक्यता असल्याने डोंगरपायथ्याशी राहणाऱ्यांनी वेळीच स्थलांतर करावे, घाटरस्त्याने प्रवास टाळावा. शेतीमाल व जनावरांचे संरक्षण करण्यासाठी योग्य नियोजन करावे. आपत्कालीन परिस्थितीत नजीकच्या पोलीस ठाणे किंवा तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा. जिल्हा नियंत्रण कक्ष – दूरध्वनी क्रमांक १०७७ (टोल फ्री), ०२४१-२३२३८४४, २३५६९४० उपलब्ध आहेत.

Rain Alert Today : नागरिकांनो सावधान… 15 सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात यलो अलर्ट जारी, जाणून घ्या सर्वकाही Read More »

नुकसानीचे पंचनामे तत्काळ करा; CM फडणविसांचे आदेश

Monsoon 2025 : राज्यातील अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत आढावा घेण्यात आला असून शेती आणि घरांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करावेत आणि नुकसान भरपाई देण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या सुरवातीलाच राज्यातील अतिवृष्टी, धरणातील पाणी साठी, पिक-परिस्थिती याबाबतचा आढावा घेण्यात आला. आपत्ती व्यवस्थापनाशी निगडीत विविध यंत्रणांच्या सज्जतेचा आढावा घेण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आपत्ती व्यवस्थापन मंत्री मंत्री गिरीष महाजन, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, क्रीडा व युवक कल्याण दत्तात्रय भरणे, रोजगार हमी मंत्री भरत गोगावले, मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री निलेश राणे उपस्थित होते. राज्य आपत्कालीन कार्यकेंद्रातून बचाव व मदत कार्यासाठी प्रभावी समन्वयन साधण्यात येत असल्याची माहिती मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी यांनी सादरीकरणाद्वारे दिली. ‘सचेत’ प्रणालीवरून 19 कोटी मोबाईल लघु संदेशाद्वरे पाऊस, वीज सतर्कतेचे संदेश देण्यात येत आहेत. त्यावरून 19 कोटी 22 लाख मोबाईल लघु संदेश पाठविण्यात आले. राज्य आपत्कालीन कार्यकेंद्राला अत्याधुनिक संवाद यंत्रणा व आपत्तींच्या माहितीचे विश्लेषण करणाऱ्या डीएसएस (Decision support system) ने सुसज्ज करण्यात आले आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या नागपूर येथे दोन आणि धुळे येथे दोन अशी चार पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत. नांदेड येथे तैनात करण्यात येणारी पथके ही धुळे येथून रवाना झाली आहेत. गडचिरोली येथे तैनात करण्यात येणारी पथके ही नागपूर येथून रवाना होत आहेत. यासह राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या तुकड्या सज्ज ठेवण्यात आल्याचे सेठी यांनी सांगितले. राज्यात वीज पडून, भिंत कोसळून, झाड पडून, पाण्यात बुडून आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण जखमी झाले आहेत. या मृतांच्या नातेवाईकांना आवश्यक ती मदत व नियमानुसार आर्थिक मदत तत्काळ पोहचविण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर यांनी उजनी धरणाच्या जलाशयातील जलसाठा अकरा टीएमसीने वाढल्याची माहिती दिली. पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे यांनी गेल्या चार दिवसांत झालेल्या पावसामुळे राज्यात टँकरच्या संख्येत काही अंशी घट झाली आहे, तथापि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत अजूनही टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत असल्याची माहिती दिली.

नुकसानीचे पंचनामे तत्काळ करा; CM फडणविसांचे आदेश Read More »

Weather Update: राज्यात हवामान पुन्हा खराब, थंडीही वाढली! पुढील 24 तासात ‘या’ भागात मुसळधार पाऊस

Weather Update : पुन्हा एकदा राज्यात थंडीमध्ये वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामानात बदल झाल्याने काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे तर काही भागात थंडीमध्ये वाढ पाहायला मिळत आहे.   विदर्भ आणि मराठवाड्याला पुन्हा एकदा अवकाळी पावसाने झोडपले आहे. विशेषत: विदर्भात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची पिके उद्ध्वस्त झाली आहेत. काही दिवसांपासून तापमानात वाढ झाल्यानंतर आज मुंबई, पुण्यासह राज्यभरात थंडी वाढली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने सोमवारपर्यंत विदर्भ आणि मराठवाड्यातील विविध भागात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे.  IMD ने आज विदर्भातील बहुतांश भागांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. या काळात परिसरात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह गारपीट व पाऊस पडण्याची शक्यता आहे.  हवामान खात्याच्या अंदाजानुसार विदर्भात 51 ते 75 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचा अधिक परिणाम पूर्व विदर्भावर होण्याची शक्यता आहे. तर विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह गारपीट झाल्याचे वृत्त आहे. यावेळी ढगांचा गडगडाटही ऐकू आला. नागपूर जिल्ह्याच्या पूर्व भागापासून चंद्रपूर आणि वर्धापर्यंत रात्रीच्या वेळी जोरदार गडगडाट झाला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विदर्भातील नागपूर, यवतमाळ, वर्धा आणि अमरावतीमध्ये गारपिटीसह पावसामुळे कापसासह अनेक पिकांचे नुकसान झाले आहे. वर्धा जिल्ह्यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे कापूस, गहू, हरभरा, कबुतराची पिके नष्ट झाली आहेत. महसूल अधिकारी लवकरच पिकांच्या नुकसानीचा आढावा घेतील.

Weather Update: राज्यात हवामान पुन्हा खराब, थंडीही वाढली! पुढील 24 तासात ‘या’ भागात मुसळधार पाऊस Read More »