DNA मराठी

Maharashtra Politics

Ahmednagar

Ahmednagar News: मोठी बातमी, अहमदनगरच्या नामांतरासाठी रेल्‍वे मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल

Ahmednagar News: अहमदनगर जिल्ह्याचे नामांतरण करण्यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने ग्रीन सिग्नल दिला असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील दिली.  अहिल्‍यानगर हे नाव देण्‍यास विभागाची कोणतीही हरकत नसल्‍याचे पत्र दिल्‍याने जिल्‍ह्याच्‍या नामांतराचा मार्ग सुकर झाला असल्‍याचे महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी सांगितले.  जिल्‍ह्याला पुण्‍यश्‍लोक अहिल्‍यादेवींचे नाव देण्‍याची मागणी झाल्‍यानंतर राज्‍यातील महायुती सरकारने अहिल्‍यानगर असे नाव देण्‍याचा महत्‍वपूर्ण निर्णय घेतला. नामांतराच्‍या बाबतीतील सर्व प्रक्रीया ही केंद्र सरकारच्‍या अखत्‍यारीत पुर्ण होत असल्‍याने प्रत्‍येक विभागाची ना हरकत आवश्‍यक असते.  केंद्रीय रेल्‍वे मंत्रालयाने नामांतराच्‍या बाबतीत हरकत नसल्‍याचे पत्र जारी करुन, अहिल्‍यानगर नावास मान्‍यता दिली आहे. या नावाचे कोणतेही रेल्‍वेस्‍थानक देशात नसल्‍याचेही त्‍यांनी आपल्‍या पत्रात नमुद केल्‍याने जिल्‍ह्याला अहिल्‍यानगर नाव देण्‍यातील पहिला टप्‍पा पुर्ण होत असल्‍याचे मंत्री विखे पाटील म्‍हणाले.

Ahmednagar News: मोठी बातमी, अहमदनगरच्या नामांतरासाठी रेल्‍वे मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल Read More »

Accident

Haryana Jind Accident: भीषण अपघात, 7 भाविकांचा मृत्यू, 8 जण गंभीर जखमी

Haryana Jind Accident: हरियाणात एक भीषण अपघात घडला आहे. या अपघातात 7 भाविकांचा मृत्यू झाला असून 8 जण गंभीर जखमी झाले आहे. माहितीनुसार, सोमवार-मंगळवारच्या रात्री मोठी दुर्घटना घडली. हरियाणातील जिंद येथे हा अपघात झाल्याची माहिती आहे. जिंद येथे ट्रकने पुढे जात असलेल्या टाटा मॅजिकला धडक दिली. या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. 8 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हरियाणातील कुरुक्षेत्रातील मार्चखेडी गावातील लोक राजस्थानमधील गोगामेडी येथे जात होते. टाटा कारमध्ये एकूण 15 जण प्रवास करत होते. हे लोक सोमवारी संध्याकाळी घरून निघाले होते. यावेळी टाटा एस नरवाना येथील बिधराना गावाजवळून जात असताना हिस्सार-चंदीगड राष्ट्रीय महामार्गावरील बिधराना ते सिमला या गावादरम्यान लाकडाने भरलेल्या ट्रकने मागून धडक दिली. टक्कर झाल्यानंतर टाटा-एस खड्ड्यात उलटली आणि मध्यरात्री एकच गोंधळ उडाला. या वेळी महामार्गावरून जाणाऱ्या काही वाहनचालकांनी जखमींना मदत केली. त्यानंतर नरवाना पोलिसांनी घटनास्थळी 7 रुग्णवाहिका पाठवून त्यांना नरवाना येथील शासकीय रुग्णालयात नेले. येथे 7 जणांना मृत घोषित करण्यात आले. दरम्यान, गंभीर जखमींना अग्रोहा येथे रेफर करण्यात आले आहे.

Haryana Jind Accident: भीषण अपघात, 7 भाविकांचा मृत्यू, 8 जण गंभीर जखमी Read More »

Nitesh Rane

Nitesh Rane: नितेश राणेंवर पुन्हा गुन्हा दाखल, ‘त्या’ प्रकरणात अडचणीत होणार वाढ

Nitesh Rane :  गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त वक्तव्यकरून चर्चेत असणारे भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. अहमदनगर शहरात भाजप आमदार नितेश राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुस्लिम समाजाला जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी  नितेश राणे यांच्या विरोधात शहरातील तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  नितेश राणे यांच्या नेतृत्वात 1 सप्टेंबर रोजी शहरात महंत रामगिरी महाराज यांचे समर्थन करण्यासाठी रॅली काढून सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत बोलताना राणे यांनी आक्रमक भूमिका घेत रामगिरी महाराज यांच्या विरोधात जर कोणी चुकीचं बोललं तर त्यांना सोडणार नाही असं वक्तव्य केलं होतं. या प्रकरणात मुस्लिम बांधवांनी रविवारी रात्री पोलिसांना निवेदन देऊन नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानंतर तोफखाना पोलिसांनी नितेश राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.  काय म्हणाले होते नितेश राणे  रामगिरी महाराज काही चुकीचं बोलले नाही, त्यांच्या विरोधात कोणी बोलले तर मस्जिदमध्ये घुसून मारू, तुमची जीभ जाग्यावर ठेवणार नाही, आम्ही 90% आहोत तुम्ही दहा टक्के आत तुमची बांगलादेशासारखी अवस्था करू, तुम्ही जर जास्त वळवळ केली तर तेवढ्या संख्येने बाहेर पडून तुम्हाला किड्या मकोड्यासारखे तुम्ही मराल , आपण दोन किलोमीटर चालत आलो, तुम्ही बाजूला बघितलं का कसे हातभर फाटून आत बसले होते,  या वक्तव्यावर आक्षेप घेत त्यांच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  प्रकरण काय महंत रामगिरी महाराज यांनी गेल्या काही दिवसापूर्वी मुस्लिम समाजाचे पैगंबरबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर मुस्लिम समाजाच्या वतीने अहमदनगरमध्ये आंदोलन करण्यात आले होते, राज्यामध्ये ठिकठिकाणी रामगिरी महाराजांना विरोध आंदोलने झाले होती. तर 1 सप्टेंबर रोजी रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ हिंदू समाजाच्या वतीने आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला, शहर परिसरातून काढण्यात आलेल्या मोर्चा नंतर आमदार नितेश राणे यांनी मुस्लिम समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले व जीवे मारण्याची धमकी दिली असा आरोप मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आला असून संतप्त मुस्लिम समाजाच्या वतीने अप्पर पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. या निवेदनाप्रसंगी शहरातील मुस्लिम समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Nitesh Rane: नितेश राणेंवर पुन्हा गुन्हा दाखल, ‘त्या’ प्रकरणात अडचणीत होणार वाढ Read More »

Eknath Shinde

‘मी 100 वेळा माफी मागायला तयार…’, एकनाथ शिंदे

Eknath Shinde: छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने राज्य सरकारवर जोरदार टीका होताना दिसत आहे.  यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याबद्दल शंभर वेळा माफी मागू शकतो, असे म्हटले आहे. यात मागेपुढे पाहणार नाही. असेही शिंदे म्हणाले. शिंदे म्हणाले की, विरोधकांकडे राजकारण करण्यासाठी इतर मुद्दे आहेत, पण महाराष्ट्राचे थोर व्यक्तिमत्त्व शिवाजी महाराजांना त्यापासून दूर ठेवावे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात चार दिवसांपूर्वी पुतळा कोसळल्याने प्रकरण तापत आहे. राज्य सरकारने अपघाताचे कारण शोधण्यासाठी तांत्रिक समिती स्थापन केली, तर उपमुख्यमंत्री आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्यांनी या घटनेबद्दल संपूर्ण महाराष्ट्रात मूक निदर्शने केली. काय म्हणाले एकनाथ शिंदे? अशा स्थितीत आता शिंदे म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहेत. मी त्याच्या पायाला 100 वेळा हात लावून माफी मागायला तयार आहे. मी माफी मागण्यापासून मागे हटणार नाही. आमचे सरकार त्यांचे  आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करते. महाराजांचा 35 फूट उंचीचा पुतळा, राजकोट किल्ला संकुलात 26 ऑगस्ट रोजी कोसळला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचे अनावरण केल्यानंतर सुमारे नऊ महिन्यांनी, राज्यात राजकीय वादळ निर्माण झाले. भारतीय नौदलाचे विधान हा प्रकल्प भारतीय नौदलाद्वारे चालवला जात असल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे. शिवरायांचा पुतळा बसवण्याचा प्रकल्प राज्य सरकारच्या समन्वयाने साकारला आणि त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला, असे नौदलाने गुरुवारी सांगितले. एका निवेदनात, नौदलाने पुतळ्याची दुरुस्ती आणि जीर्णोद्धार शक्य तितक्या लवकर सर्व उपायांमध्ये मदत करण्यास वचनबद्ध असल्याचे म्हटले आहे.

‘मी 100 वेळा माफी मागायला तयार…’, एकनाथ शिंदे Read More »

Nitesh Rane

Ahmednagar News: नितेश राणेंच्या अडचणीत वाढ, अहमदनगर अखंड मराठा समाजाकडून पोलीस अधीक्षकांना निवेदन

Ahmednagar News: अहमदनगर शहरात 01 सप्टेंबर रोजी रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ भाजप आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वात रॅली आणि सभेचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र या सभेच्या माध्यमातून शहरातील सामाजिक सलोखा खराब होऊ नये यासाठी अहमदनगर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे अहमदनगर अखंड मराठा समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.  मालवण येथील राजकोट किल्ल्यांवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याविषयी घडलेल्या घटनेने शिवप्रेमी व अखंड मराठा समाजाच्या त्रीव भावन लक्षात घेवून या सभेच्या माध्यमातून सामाजिक सलोखा खराब होऊ नये याची खबरदारी घेण्यात आला अशी विनंती या निवेदनाद्वारे अहमदनगर अखंड मराठा समाजाकडून करण्यात आली.

Ahmednagar News: नितेश राणेंच्या अडचणीत वाढ, अहमदनगर अखंड मराठा समाजाकडून पोलीस अधीक्षकांना निवेदन Read More »

Screenshot 2024 08 28 12 35 38 32 439a3fec0400f8974d35eed09a31f914

Ahmednagar News: जिल्हा परिषदेवर धडकला पोषण आहार कर्मचाऱ्यांचा संघर्ष मोर्चा

Ahmednagar News: श्रमिक मजदूर संघ शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेच्या वतीने शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित समस्या सोडविण्याच्या मागणीसाठी जिल्हा परिषदेवर संघर्ष मोर्चा काढण्यात आला. पोषण आहार कर्मचाऱ्यांनी विविध प्रश्‍न व समस्या सोडविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारात जोरदार निदर्शने करून ठिय्या आंदोलन केले.  या मोर्चात जिल्ह्यातील पोषण आहार कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या आंदोलनात संस्थापक अध्यक्ष महेंद्र विधाते, राज्य उपाध्यक्ष कविता धिवारे, राज्य समन्वयक सविता विधाते, सुभाष सोनवणे, शितल दळवी, कावेरी साबळे, उत्तम गायकवाड, कैलास पवार, विद्या अभंग, मेजबीन सय्यद, अश्‍विनी दळवी, छाया भूमकर, बाबासाहेब गोर्डे आदींसह सर्व तालुकाध्यक्ष, पदाधिकारी व महिला कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.  मार्केटयार्ड चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन मोर्चाची सुरुवात करण्यात आली. जुने बस स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करुन मोर्चा जिल्हा परिषदेवर धडकला. पोषण आहार कर्मचाऱ्यांनी केलेल्या जोदरार घोषणाबाजी जिल्हा परिषदेचा संपूर्ण परिसर दणाणून निघाला.  जोपर्यंत विद्यार्थी आहे, तोपर्यंत शालेय पोषण आहार सुरु राहणार असल्याने सर्व कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे, शासकीय सेवेत सामावून घेत नाही तोपर्यंत किमान वेतन कायद्याप्रमाणे 15 हजार रुपये मानधन द्यावे, इतर केडर प्रमाणे शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना गणवेश मिळावा, गॅस सारख्या ज्वलनशील पदार्थ सोबत काम करायचे असल्याने दुर्दैवाने एखादी दुर्घटना घडल्यास त्या कुटुंबाला आर्थिक मदत म्हणून किमान कर्मचाऱ्यांचा 20 लाखाचा विमा उतरवावा, कर्मचाऱ्यांना औषधोपचारासाठी किमान 50 हजार रुपयाची मदत मिळावी, दरवर्षीच्या करार ऐवजी किमान तीन वर्षातून एकदा करार करावा, शालेय परिसर, वर्ग स्वच्छता, स्वच्छतागृह इत्यादींची साफसफाई करण्यासाठी संबंधित शालेय यंत्रणेकडून कर्मचाऱ्यांवर दबाव आनला जात असून, शासन निर्णयानुसार ही कामे करण्यास दबाव आणू नये, गरोदर महिला कर्मचारी यांना बालसंगोपणासाठी सहा महिन्याची पगारी रजा मिळावी, विनाकारण कुणाला कामावरून कमी न करता त्या कर्मचाऱ्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी द्यावी, प्रशिक्षण घेतलेल्या कर्मचाऱ्यांना नियुक्ती द्यावी, ज्याच्या नावावर करार त्यांचीच प्रत्यक्ष नेमणूक करावी, सेंट्रल किचन पद्धती तात्काळ बंद करून पूर्वीप्रमाणे जे कर्मचारी काम करत होते त्यांना तात्काळ कामावर घेण्याची मागणी आंदोलकांच्या वतीने करण्यात आली आहे.  या मागणीचे निवेदन जिल्हा शालेय पोषण आहारचे लेखा अधिकारी रुपेश भालेराव यांना देण्यात आले.

Ahmednagar News: जिल्हा परिषदेवर धडकला पोषण आहार कर्मचाऱ्यांचा संघर्ष मोर्चा Read More »

Nanded

Nanded News : विविध मागण्यांसाठी आदिवासी समाज बांधवांचा मोर्चा नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला

Nanded News : विविध मागण्यांसाठी आदिवासी समाज बांधवांचा मोर्चा नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. नांदेड शहरातील महात्मा फुले पुतळा पासून या मोर्चाला सुरुवात झाली. महात्मा फुले पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालया पर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. आदिवासी समाजातील नरहरी झिरवळ,किरण लमहाटे,डॉ राजेंद्र भारुड यांच्या प्रतिमेचे काही समाज कंटकांनी जागतिक आदिवासी दिनी  दहन केले,त्या समाज कंटकांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत,12 हजार 500 जागांवर भरती प्रक्रिया राबविण्यात यावी,पेसा अंतर्गत भरती प्रक्रिया तात्काळ घेण्यात यावी,यासह इतर मागण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला.या मोर्चात आदिवासी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.  शासनाने तात्काळ आमच्या मागण्याची दखल घेऊन मागण्या मान्य कराव्यात अन्यथा या मागण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आदिवासी समाज बांधव रस्त्यावर उतरले असा इशारा माजी आमदार संतोष टारफे यांनी दिलाय.

Nanded News : विविध मागण्यांसाठी आदिवासी समाज बांधवांचा मोर्चा नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला Read More »

Ahmednagar Accident News

Ahmednagar News: धक्कादायक, स्वस्तिक बस स्थानकात वृद्ध व्यक्ती बसच्या टायर खाली आल्याने गंभीर जखमी

Ahmednagar News:  अहमदनगर शहरातील गजबजलेल्या स्वस्तिक बस स्थानकात एक वृद्ध व्यक्ती बसच्या टायर खाली आल्याने गंभीर जखमी झाला आहे. बस चालकाच्या चुकीमुळे हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शी प्रवाशांनी सांगितले. वृद्ध व्यक्ती बसटायर खाली आल्याने अक्षरशः त्याचा पाय पूर्ण पणे टायर खाली आल्याने रिकामी झाला असून  व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे.  अंकुश आबा शिंदे ही व्यक्ती गंभीर झाल्यानंतर तेथील उपस्थित प्रवाशांनी तात्काळ त्या व्यक्तीला बसच्या बाजूला करून बस स्थानकात आणले त्यानंतर बराच वेळ एसटीच्या कर्मचाऱ्यांनी त्याच्या अंगावरती चादर देखील टाकली नव्हती किंवा रुग्णवाहिकेला देखील फोन केला नव्हता.  प्रत्यक्षदर्शी पाहणाऱ्या प्रवाशांनी सांगितलं की पूर्णपणे बस चालकाची चुकी असून बस चालकाने कोणताही मागचा पुढचा विचार न करता त्या व्यक्तीच्या अंगावर ती गाडी घातली. त्यामुळे प्रवाशांनी रोष व्यक्त केला असून ड्रायव्हर वरती कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी प्रवाशांची मागणी आहे.  एसटी बस चालकाला कोणी अरेरावी किंवा धक्काबुक्की केली तर प्रशासन किंवा एसटी कर्मचारी हे आंदोलन करतात परंतु आज एका एसटी चालकाच्या चुकीमुळे एका प्रवाशाला गंभीर इजा झाली आहे याकडे प्रशासन कधी लक्ष देणार असं देखील यावेळी प्रत्यक्ष दर्शनी सांगितलं. सदर बस ही शिर्डी ते रोहा अशी अहमदनगर मार्गे जात होती बस चालक आशिक मुबारक शेख याच्यावरती गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी प्रत्यक्षदर्शींची आहे. गाडी क्रमांक mh14kq3970 हिरकणी गाडी होती. अर्ध्या तासाच्या प्रतीक्षेनंतर त्या नागरिकाला रुग्णवाहिकेतून एका खाजगी रुग्णालयात दाखल केले असून पोलीस प्रशासन पुढील कारवाई करत आहे.

Ahmednagar News: धक्कादायक, स्वस्तिक बस स्थानकात वृद्ध व्यक्ती बसच्या टायर खाली आल्याने गंभीर जखमी Read More »

Ravindra Jadeja

Ravindra Jadeja : रवींद्र जडेजा इतिहास रचण्यापासून अवघ्या 6 विकेट्स दूर, महान खेळाडूंच्या क्लबमध्ये करणार प्रवेश

Ravindra Jadeja : भारतीय संघासाठी रवींद्र जडेजा हा केवळ गोलंदाज नाही तर प्रत्येक विभागात एक संपूर्ण पॅकेज आहे. क्षेत्ररक्षण असो, गोलंदाजी असो की फलंदाजी, प्रत्येक क्षेत्रात त्याची पकड मजबूत आहे. त्याच्या फिरकी बॉल्समध्ये इतकी विविधता आहे की, कोणत्या प्रकारचा चेंडू येत आहे हे फलंदाजांना समजत नाही.  जडेजाची आणखी एक खासियत म्हणजे त्याचे क्षेत्ररक्षण. तो एक हुशार क्षेत्ररक्षक आहे आणि त्याने आपल्या क्षेत्ररक्षणादरम्यान अचूक लक्ष्ये मारून अनेक वेळा सामन्यांचा रंग बदलला आहे. जडेजाने केवळ गोलंदाजीतच नव्हे तर फलंदाजीतही अनेक संस्मरणीय खेळी खेळल्या आहेत. खालच्या क्रमाने येत त्याने अनेक वेळा अत्यंत कठीण परिस्थितीतही संघाला विजय मिळवून दिला आहे. 300 विकेट्सचे महत्त्व कसोटी क्रिकेटमध्ये 300 बळींचा टप्पा ओलांडणे ही एक मोठी उपलब्धी आहे आणि कोणत्याही गोलंदाजाचे स्वप्न पूर्ण होते. यावरून गोलंदाज किती अनुभवी आहे आणि त्याच्याकडे किती क्षमता आहे हे लक्षात येते. हा आकडा जडेजासाठी आणखी खास आहे कारण तो अष्टपैलू खेळाडू आहे. अष्टपैलू खेळाडूसाठी इतक्या विकेट घेणे सोपे नाही. जडेजाने 300 विकेट्स पूर्ण केल्याने भारतीय फिरकी आक्रमणाचे भवितव्यही उज्ज्वल दिसत आहे. जडेजासोबतच रविचंद्रन अश्विनही भारतीय संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. या दोन गोलंदाजांच्या जोडीने भारतीय संघाला मोठ्या सामन्यांमध्ये अनेक मोठे विजय मिळवून दिले आहेत. रवींद्र जडेजा अजूनही त्याच्या कारकिर्दीच्या शिखरावर असून आगामी काळात तो आणखी अनेक विक्रम मोडू शकतो. जडेजाचे आता 400 बळींचा टप्पा ओलांडण्याचे लक्ष्य असेल.

Ravindra Jadeja : रवींद्र जडेजा इतिहास रचण्यापासून अवघ्या 6 विकेट्स दूर, महान खेळाडूंच्या क्लबमध्ये करणार प्रवेश Read More »

Rain

IMD Alert: पुणेसह ‘या’ भागात अतिवृष्टीचा इशारा, जाणून घ्या ताजे अपडेट

IMD Alert : देशातील अनेक भागात सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.   जम्मू-काश्मीरमध्ये ढगफुटीमुळे श्रीनगर-लेह राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आले आहे. केरळच्या वायनाड आणि हिमाचल प्रदेशात गेल्या आठवड्यात झालेल्या भूस्खलनात मृतांची संख्या अनुक्रमे 221 आणि 13 वर पोहोचली आहे.  उत्तराखंडमधील केदारनाथ यात्रेच्या पायी मार्गावर अडकलेल्या यात्रेकरूंसह 370 हून अधिक लोकांची सुखरूप सुटका करण्यात आली. जम्मू आणि काश्मीरमध्ये काही इमारतींचे नुकसान झाले आहे, तर गंदरबल जिल्ह्यात ढगफुटीमुळे आलेल्या पूरस्थितीमुळे श्रीनगर-लेह राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला आहे. महामार्ग बंद झाल्यामुळे काश्मीर खोऱ्याचा लडाखशी संपर्क तुटला आहे. पूर्व, उत्तर-पूर्व, उत्तर भागात पावसाचा इशारा भारतीय हवामान खात्याने सोमवारी देशाच्या पूर्व, उत्तर-पूर्व आणि उत्तर भागात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. बिहार, झारखंड आणि उत्तर प्रदेशमध्ये काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालच्या उप-हिमालयीन जिल्ह्यांमध्ये 8 ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. 6 आणि 7 ऑगस्ट रोजी दक्षिण बंगालमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. पूर्व, उत्तर-पूर्व, उत्तर भागात पावसाचा इशारा भारतीय हवामान खात्याने सोमवारी देशाच्या पूर्व, उत्तर-पूर्व आणि उत्तर भागात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. बिहार, झारखंड आणि उत्तर प्रदेशमध्ये काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालच्या उप-हिमालयीन जिल्ह्यांमध्ये 8 ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. 6 आणि 7 ऑगस्ट रोजी दक्षिण बंगालमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग, कालिम्पॉन्ग, जलपाईगुडी, अलीपुरद्वार आणि कूचबिहारमध्ये 8 ऑगस्टपर्यंत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडू शकतो. हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, 6 आणि 7 ऑगस्ट रोजी दक्षिण बंगालमधील पूर्व आणि पश्चिम वर्धमान, बीरभूम, बांकुरा, पुरुलिया आणि मुर्शिदाबाद जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार किंवा हलका पाऊस पडू शकतो. झारखंडमध्ये मुसळधार पावसामुळे राज्यातील काही नद्यांना पूर आला आहे. शेजारील राज्य पश्चिम बंगालमध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये बहुतांश ठिकाणी पाऊस झाला. उत्तराखंडमधील क्षतिग्रस्त केदारनाथ यात्रा मार्गावर अडकलेल्या यात्रेकरूंना वाचवण्याचे बचावकार्य रविवारी सलग चौथ्या दिवशीही सुरू राहिले. केदारनाथ बचाव मोहिमेच्या चौथ्या दिवशी 10,374 लोकांची सुखरूप सुटका करण्यात आली. पुण्यातील पाणी तुंबलेल्या निवासी भागात लष्कर तैनात  खडकवासला धरणातून मुसळधार पाऊस आणि पाणी सोडल्यानंतर शहरातील पाणी तुंबलेल्या निवासी भागात लष्कराचे जवान तैनात करण्यात आले आहेत. पुणे जिल्ह्यातील घाट परिसरात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस झाला.

IMD Alert: पुणेसह ‘या’ भागात अतिवृष्टीचा इशारा, जाणून घ्या ताजे अपडेट Read More »