DNA मराठी

Maharashtra Politics

Modi Government : महिला सक्षमीकरणासाठी मोदी सरकार सदैव कटीबद्ध

Modi Government:  पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली विविध योजनांची निर्मिती करून महिलांना प्रगतीपथावर आणण्याचे काम मोदी सरकारच्या काळात झाले आहे. यामुळे महिला सर्वच क्षेत्रात आपली छाप पाडत आहे. महिलांना सामाजिकदृष्ट्या समान हक्क मिळवून सामाजिक न्याय देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्याचे प्रतिपादन अहिल्यानगरचे विद्यमान खासदार आणि महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले आहे.  “मेरा बुथ सबसे मजबूत” कार्यक्रमाचेआयोजन बेलवंडी येथे करण्यात आले होते. यावेळी विक्रमसिंह पाचपुते, अण्णासाहेब शेलार व इतर प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आज भारत विकसनशील अर्थव्यवस्थेकडे चमकदार अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत आहे. देशाच्या या प्रगतीमागे महिलांचे मोठे योगदान आहे. एक काळ असा होता की महिलांसाठी घराबाहेर पडणेही फार कठीण होते. पण आता काळ बदलला आहे. महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात चुरशीची स्पर्धा करत आहेत. व्यवसाय, शिक्षण, मनोरंजनापासून ते आयटी आदी अनेक क्षेत्रात महिला प्रगती करत आहेत. महिलांना बळ देण्याचे सर्वाधिक  काम मोदी सरकारच्या काळात झाले असल्याचे खा. विखे पाटील म्हणाले.  मोफत शिलाई मशीन योजनेच्या माध्यामातून लाखो महिला स्वयंरोगारात आल्या, सुकन्या समृद्धी योजनेतून मुलींचे भविष्य सुरक्षित करण्याचे काम मोदी सरकारने केले.‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ योजनेमुळे महिला सक्षमीकरणाला चालना देण्यात आली.हिला शक्ती केंद्र योजना, पंतप्रधान उज्ज्वला योजना,लखपती दीदी योजना,प्रधानमंत्री मातृ वंदना योजना,जननी सुरक्षा योजना अशा विविध योजनांची प्रभावीपणे शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत अंमलबजावणी करण्यात आली. यामुळे मागील १० वर्षाच्या काळात मोदी सरकारने सर्वाधिक महिला विकासाच्या योजना राबवत देशातील महिलांना आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम केले. यामुळे यावेळी सुद्धा महिलांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंसती आहे. पुन्हा देशात मोदी सरकार येईल आणि आतापर्यंत ज्या पध्ततीने महिलांचा विकास झाला त्याहुन अधिक गतीने महिलांचा विकास होईल असा विश्वास खा. विखे यांनी बोलून दाखवला.   जिल्ह्यात महिलांच्या विकासासाठी विशेष प्रयत्न करणार, महिला बचत गटाच्या माध्यातून जिल्ह्यातील महिलांना स्वंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्याच बरोबर जिल्ह्यात महिलांसाठी विविध माध्यमातून रोजगार उभा करण्यावर भर दिला जाईल. त्याचबरोबर केंद्र आणि राज्य शासनाच्या महिलांसाठी असेलेल्या योजना प्रत्येक लाभार्थांपर्यंत पोहचविल्या जातील. असे खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले.

Modi Government : महिला सक्षमीकरणासाठी मोदी सरकार सदैव कटीबद्ध Read More »

Ahmednagar News: युवा उद्योजकाला 07 लाख रुपये खंडणी मागणाऱ्या दोन जणांविरोधात शेवगाव पोलिसात गुन्हा दाखल

Ahmednagar News: शेवगाव तालुक्यातील रावतळे कुरूडगाव येथील युवा उद्योजक तथा शेअर मार्केट व्यावसायिक साईनाथ कल्याण कवडे यांना चाकूचा धाक दाखवून तू खूप ट्रेडिंग करून लोकांकडून पैसा गोळा केला आहे आम्हाला दर महिन्याला सात लाख रुपये हप्ता दे नाहीतर तुझा मर्डर करून तुला व तुझ्या कुटुंबाला संपवून टाकू आमच्या नादी लागू नको आम्ही फार मोठे गुन्हेगार आहोत.  तुझ्या विरोधात सर्व कार्यालयात अर्ज करून तुझी बदनामी करून तुला सळो की पळो करून सोडू असे म्हणत खंडणी मागणाऱ्या नेवासा तालुक्यातील महेश मच्छिंद्र जगताप (राहणार गेवराई, तालुका नेवासा) तसेच योगेश शिवाजी चावरे (राहणार नजीक चिंचोली, तालुका नेवासा) या दोन व्यक्ती विरोधात भारतीय दंड संहिता अंतर्गत कलम ३८७ नुसार शेवगाव पोलिसात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  युवा उद्योजक तथा शेअर मार्केट व्यावसायिक साईनाथ कल्याण कवडे यांनी शेवगाव पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मी शेअर मार्केट ट्रेडिंग व शेती हा व्यवसाय करीत असून दि. २९ फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी मी माझ्या नजीक बाभूळगाव शिवारातील पपईच्या बागेत काम करत असताना महेश मच्छिंद्र जगताप तसेच योगेश शिवाजी चावरे   हे दोघे माझ्याजवळ हातात चाकू घेऊन आले व मला चाकू दाखवून म्हणाले की तू खूप ट्रेडिंग करून लोकांकडून पैसा गोळा केला आहे तू खूप मोठा झाला आहे तू आम्हा दोघांना दर महिन्याला खंडणी स्वरूपात सात लाख रुपये हप्ता चालू कर तू जर आम्हाला हप्ता दिला नाही तर आम्ही तुला सळो की पळो करून सोडू व तुझ्या विरोधात सर्व कार्यालयात अर्ज करून तुझी बदनामी करून टाकू असे ते म्हटल्यावर मी त्यांना पैसे देण्यास नकार दिल्याने ते जाताना मला म्हणाले की आम्ही खूप मोठे गुन्हेगार आहोत आमच्या नादी लागू नको तुला केव्हाच संपवून टाकू असे म्हणून ते निघून गेले परंतु भीतीपोटी मी तक्रार दाखल केली नाही.  त्यानंतर वरील दोघांनी शेवगाव पोलीस स्टेशन तसेच अहमदनगर पोलीस अधीक्षक कार्यालय यांच्यासह इतर ११ कार्यालयात माझ्या विरोधात अर्ज दिले तसेच दिल्यानंतर नंतर त्यांनी मला वेळोवेळी फोनवर तसेच व्हाट्सअप कॉल वरती पैशाची मागणी केली तसेच पैशाची वेळेत पूर्तता न केल्यास तुला व तुझ्या फॅमिलीला संपवणार तसेच तुझ्या विरोधात आणखीन खोटे अर्ज करणार तसेच तू आमच्या विरोधात कोठेही कंप्लेंट कर आम्ही सर्व पोलीस मॅनेज केले आहेत असे धमकीचे मेसेज व्हाट्सअप वरती दिले.  तसेच पोलीस आमचे काहीच करू शकत नाही आमची एसपी ऑफिस पर्यंत सेटिंग आहे अशी देखील धमकी दिल्याने नेवासा तालुक्यातील दोन व्यक्ती विरोधात शेवगाव पोलिसात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच सदर गुन्ह्याचा पुढील तपास शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार करीत आहे.

Ahmednagar News: युवा उद्योजकाला 07 लाख रुपये खंडणी मागणाऱ्या दोन जणांविरोधात शेवगाव पोलिसात गुन्हा दाखल Read More »

Sujay Vikhe latest Speech : राजकारण करताना व्हिडीओ नव्हे,कर्तृत्व दाखवावे लागते-खा.विखे

Sujay Vikhe latest Speech : राजकारण करायला कर्तृत्व दाखवावे  लागते,त्याग करावा लागतो.केवळ व्हिडीओ काढून जनता बरोबर येत नसल्याचा टोला महायुतीचे उमेदवार खा.डॉ सुजय विखे पाटील यांनी लगावला. तालुक्यातील गोठण येथे आयोजित केलेल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात खा डॉ सुजय विखे पाटील बोलत होते.आ.मोनिका राजळे यांची प्रमुख उपस्थिती होती. आपल्या भाषणात खा.विखे पाटील म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील दहा वर्षात केलेल्या कामाची चर्चा लोकांमध्ये जावून करा.कोण काय बोलतो कोणते व्हिडीओ टाकतो यावर राजकारण होत नाही.राजकारण करण्यासाठी कर्तृत्व लागते त्याग लागतो.इथे बसलेला प्रत्येक कार्यकर्ता संघर्ष करणारा आहे.तीस चाळीस वर्ष त्याग केला त्यामुळेच जिल्हयातील जनता वर्षानुर्षे साथ आणि पाठबळ देत असल्याचे विखे पाटील म्हणाले. राज्यात महायुतीचे सरकार दिड वर्षापुर्वी आले.शक्य तेवढा निधी उपलब्ध करून प्रत्येक गावात विकास काम कशी होतील असा प्रयत्न केला.हेच सरकार पाच वर्षासाठी आले असते तर अधिक निधीची उपलब्धता करता आली असती.पण सरकार का आले नाही हे आपण सर्वजण जाणता.आता महायुती आहे.तेवढ्याच गतीने निर्णय होत असून काम मार्गी लागत असल्याचे विखे यांनी सांगितले. लोकसभेची निवडणूक ही देशाचे भवितव्य घडविणारी आहे.देशाला प्रगती पथावर नेतानाच देश सुरक्षित कसा राहीला याचे धोरण ठरविणारी निवडणूक असल्याने निवडणुकीकडे तेव्ढ्याच गांभिर्याने पाहाण्याचे आवाहन करून राजकारण प्रेमाने कमावलेल्या लोकांना बरोबर घेवून करायचे असते.

Sujay Vikhe latest Speech : राजकारण करताना व्हिडीओ नव्हे,कर्तृत्व दाखवावे लागते-खा.विखे Read More »

Ahmednagar Lok Sabha Election: कोव्हीड संकटात खा.विखे यांनी  सामाजिक बांधिलकीने काम केले : डॉ मृत्युंजय गर्जे

Ahmednagar Lok Sabha Election:  कोव्हीड संकटात सर्व उपाय योजना आणि समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहाण्याची भूमिका डॉक्टर या नात्याने खा.सुजय विखे पाटील यांनी घेतली.कुठेही स्टंटबाजी न करता त्यांनी जपलेल्या  सामाजिक बांधिलकीला जनता भक्कमपणे साथ देईल असा विश्वास  डॉ मृत्युंजय गर्जे यांनी व्यक्त केला. खा डॉ सुजय विखे यांची उमेदवारी अहिल्यानगर जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असून मागील पाच वर्षात झालेल्या विकास कामामुळे भारतीय जनता पक्षाच्या वतीने त्यांना पुन्हा उमेदावारी देण्यात आल्याने या मतदार संघातील जनता खा.विखे यांना समर्थन देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नगर येथे पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील रुग्णालयात स्वतंत्र कोव्हीड सेंटर सुरू करून जिल्ह्यातील रुग्णांना उपचारांची सोय उपलब्ध करून दिली.रूग्णांना प्राणवायू उपलब्ध होत नव्हता आशा काळात स्वतंत्र असा आॅक्सिजन प्रकल्प सुरू केला.रेमडीसिव्हर इंजक्शनची उपलब्धता  प्रत्येक रुग्णाला करून दिली.यामध्ये त्यांच्यावर आरोप करून बदनाम करण्यचा प्रयत्न झाला.पण थोडेही विचलित न होता खा.डॉ विखे पाटील कोव्हीड योध्दा म्हणून काम करीत राहीले. कोव्हीड कालावधीत इतर सर्व रुग्णालय बंद असताना खा.डॉ विखे यांनी विखे पाटील रूग्णालयात सुमारे सातशेहून अधिक महीलांच्या प्रसूती मोफत करून देत सामाजिक सामाजिक बांधिलकी जोपासली. सिंधू अन्नछत्र मोफत किरणा किटचे गरजू व्यक्तिना वाटप केले. जिल्ह्यातील २७०शेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत.या कुटूबियांना दतक घेवून त्यांच्या परीवारात रोजगार आणि शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने या कुटूबियांची मोठी समस्या दूर करण्यात खा.विखे यांनी घेतलेली भूमिका सर्वाच्या दृष्टिने अभिमानास्पद राहील्याचे भाजपा पाथर्डी तालुकाध्यक्ष डॉ मृत्युंजय गर्जे  यांनी सांगितले कोव्हीड संकटात केंद्र सरकारने खासदारांना मिळणारा सर्व निधी कोव्हीड फंडासाठी वापरण्यात आला. परंतू निधी नाही म्हणून कोणतेही कारण न सांगता खा.विखे अविरतपणे कोव्हीड संकटात मतदार संघातील जनतेच्या पाठीशी कोव्हीड योध्दा म्हणून उभे राहीले हे महत्वपूर्ण आहे. कारण राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते.परंतू कोव्हीड संकटातील उपाय योजना होवू शकल्या नव्हत्या.पण खा.विखे यांनी उपलब्ध असलेल्या सुविधांचा उपयोग करून कोव्हीड संकटावर मात करण्यासाठी केलेले प्रयत्न लक्षवेधी होते.कुठेही प्रसिध्दीचा डामडौल आणि स्टंट बाजी न करता डॉक्टर या नात्याने त्यांनी बजावलेली भूमिकाच लोकांना भावली असल्याचे भाजपा पाथर्डी तालुकाध्यक्ष डॉ मृत्युंजय गर्जे  म्हणाले. विखे पाटील परीवाराच्या सामाजिक बांधिलकीची मोठी परंपरा असून तीन पिढ्यांचा वारसा खा.डॉ सुजय विखे पुढे घेवून जात आहेत.राजकारणाच्या पलीकडे जावून विखे पाटील परीवार कोणत्याही संकटात समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहाण्याची घेत असलेल्या  भूमिकेला जनता चांगले पाठबळ देईल असा विश्वास यांनी व्यक्त केला.

Ahmednagar Lok Sabha Election: कोव्हीड संकटात खा.विखे यांनी  सामाजिक बांधिलकीने काम केले : डॉ मृत्युंजय गर्जे Read More »

Sujay Vikhe News: सूज्ञ जनता विकास कामाला साथ देते, पोपटपंची करणाऱ्यांना नाही-खा.विखे

Sujay Vikhe News: अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील सूज्ञ असून, पाच वर्षात झालेली विकास काम जनतेच्या समोर आहे.त्यामुळे महायुतीलाच जनतेचे पाठबळ असल्याने पोपटपंची आणि भूलथापा देणाऱ्यांना थारा देणार नाही असा विश्वास खा.डॉ सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला. तालुक्यातील काष्टी येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात खा.विखे पाटील बोलत होते.माजी मंत्री आ.बबनराव पाचपुते,विक्रमसिंह पाचपुते यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. आपल्या भाषणात खा.विखे म्हणाले की लोकसभा निवडणुक देशाचे भवितव्य ठरवणारी आहे.विकास कामांवर ही निवडणूक होत आहे.कोव्हीड कालावधी सोडला तर केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून विकास कामाचा निधी आणला.लोकासाठी असलेल्या प्रत्येक योजनेचा लाभ सामान्य माणसाला देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. या लोकसभा मतदारसंघाची परंपरा पाहीली तर काम करणार्या लोकांना साथ देण्याची मतदारसंघातील जनता सूज्ञ असल्याकडे लक्ष वेधून प्रामाणिक स्वाभिमानी नैतिकता असलेल्या उमेदवाराला मत टाकण्याची भूमिका आजपर्यत मतदारांनी बजावली.देशात पुन्हा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी जनतेचा निर्धार झाला आहे.त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराला मिळणारे प्रत्येक मत केंद्रात पुन्हा भाजपाची सता येण्यासाठी महत्वपूर्ण ठरणार असल्याचे विखे पाटील म्हणाले. सध्या कुठल्याही कार्यक्रमात फक्त निवडणुकीची चर्चा सुरू असल्याने कार्यकर्त्यांनी नकारात्मक चर्चेपासून दूर राहावे. पाच वर्षात तालुक्यात झालेल्या विकास कामाची आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयांची माहीती जनतेला द्या असे आवाहन त्यांनी केले.

Sujay Vikhe News: सूज्ञ जनता विकास कामाला साथ देते, पोपटपंची करणाऱ्यांना नाही-खा.विखे Read More »

Bhim Jayanti 2024 : डॉ. बाबासाहेबांनी दिलेल्या एका मताच्या अधिकारामुळे लोकशाही मजबूत आहे:  खा. डॉ. सुजय विखे पाटील

Bhim Jayanti 2024 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडर यांना या देशाला दिलेले संविधान ही देशासाठी मोठी देणगी आहे. त्याच बरोबर संविधाने दिलेला सर्वांना समान एक मताचा अधिकार यामुळे देशाची लोकशाही मजबूत आहे. तिला कधीच धोका निर्माण होऊ शकत नाही.  भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, एक विचारवंत आणि समाजाला दिशा देणारे एक व्यक्तिमत्त्व अशी ओळख असणाऱ्या बाबासाहेबांना माझे अभिवादन आहे. अशा शब्दात अहिल्यानगरचे विद्यमान खासदार आणि महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना दिली ते आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्य अहिल्यानगर जिल्ह्यात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कर्जत तालुक्यातील सिद्धार्थनगर डिकसळ, येथील एका कार्यक्रमात डॉ. सुजय विखे पाटील यांनी भेट देत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी डॉ. सुजय विखे यांच्यासह आमदार प्रा राम शिंदे तसेच विविध प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.  भारतीय संविधानाचे शिल्पकार असण्यासोबतच बाबासाहेब सामाजिक एकोपा निर्माण करणारे नेते होते. त्यांनी कायमच समाजातील शोषित आणि वंचित घटकांच्या चांगल्यासाठी जीवन समर्पिक केलं. तसेच असे कोणतेही क्षेत्र नाही ज्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान नाही. देशाच्या अर्थव्यवस्थेपासून ते शेतीपर्यंत. सर्वच क्षेत्रात आपल्याला बाबसाहेबांचे काम दिसून येईल. खऱ्या अर्थाने महामानव असलेले बाबासाहेब हे भारतात जन्माला आले हे भारताचे भाग्य आहे. अशा महामानवाला मी शतश: नमन करतो. असे डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले.  डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचार दौऱ्यावर विविध गावांना गाठीभेटी करत आहेत. विकास हेच माझे ध्येय असे सांगत, पंतप्रधान मोदींच्या काळात झालेल्या कामांची माहिती ते लोकांना देत आहेत. त्याच बरोबर आपण खासदार असताना केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यातून जिल्ह्यासाठी आणलेला निधी आणि त्यातून झालेली कामे यांची माहिती ते लोकांना देत आहेत. त्यांच्या प्रचारात विरोधकांवर कोणत्याही टीका टिप्पण्या नसल्याने त्यांना लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अहिल्यानगर परिसरात मोठ्या प्रमाणात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. ठिकठिकाणी मिरवणुका, प्रबोधनात्मक कार्यक्रमाला डॉ. सुजय विखे पाटील भेटी देत आहेत.

Bhim Jayanti 2024 : डॉ. बाबासाहेबांनी दिलेल्या एका मताच्या अधिकारामुळे लोकशाही मजबूत आहे:  खा. डॉ. सुजय विखे पाटील Read More »

Ahmednagar News: खा.डॉ विखे पाटील यांच्या प्रयत्नामुळे राष्ट्रीय वयोश्री योजनेचा जेष्ठांना लाभ- नागवडे

Ahmednagar News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या संकल्‍पनेतून राष्‍ट्रीय वयोश्री योजनेची प्रभावी अंमलबजावणी नगर जिल्‍ह्यात झाली. जिल्‍ह्यातील ४५ हजार जेष्‍ठ नागरीकांना या योजनेचा थेट लाभ खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्‍या पाठपुराव्‍यामुळे झाला.या सर्व जेष्‍ठ  नागरीकांचे पाठबळ खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्‍या पाठीशी भक्‍कमपणे उभे राहील असा विश्‍वास भाजपाचे तालुका अध्‍यक्ष संदीप नागवडे  यांनी व्‍यक्‍त केला.   लोकसभा निवडणूकीच्‍या पार्श्‍वभूमीवर महायुतीचे उमेदवार खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांना समाजातील सर्व घटकांचे मोठे पाठबळ मिळत असून, यामध्‍ये केंद्र सरकारने जेष्‍ठ नागरीकांसाठी सुरु केलेल्‍या राष्‍ट्रीय वयोश्री योजनेची जिल्‍हयात झालेली अंमलबजावणी ही महायुतीच्‍या दृष्‍टीने जमेची बाजु ठरणार आहे. समाजातील दुर्लक्षीत झालेला घटक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीत करुन, त्‍यांच्‍यासाठी आवश्‍यक असलेली साधन साहित्‍याची मोफत उपलब्‍धता करुन दिली.   लोकसभा मतदार संघामध्‍ये खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्‍याकरीता विशेष परिश्रम घेतले. प्रत्‍येक तालुक्‍यात शिबीरं आयोजित करुन लाभार्थ्‍यांची नोंदणी  करण्‍यात आली. यामध्‍ये नोंदणी झालेल्‍या पात्र लाभार्थ्‍यांना मोफत साहित्‍य मिळाल्‍याने जेष्‍ठ नागरीकांमध्‍ये समाधान आहे. कोव्‍हीड संकटातही खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी केलेले कसम हे नागरीकांच्‍या डोळ्यासमोर आहे. डॉ.विखे पाटील रुग्‍णालयातून कोव्‍हीड सेंटर उभे करुन, त्‍यांनी उपचारांची सुविधा उपलब्‍ध करुन दिली.  केंद्र सरकारच्‍या प्रत्‍येक योजनेची अंमलबजावणी सुरु आहे. यामध्‍ये मोफत धान्‍य योजने पासून ते आयुष्‍मान भारत योजनेचीही कार्यवाही मतदार संघात सर्वच स्‍तरावर सुरु असल्‍याने या योजनेचाही मोठा दिलासा नागरीकांना मिळाला असल्यांचे नागवडे म्हणाले.  यासर्व पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्‍या  सर्व योजनेचे लाभ सामान्‍य माणसापर्यंत  पोहोचल्‍याने महायुतीला हे मोठे पाठबळ निश्चित मिळेल असा विश्‍वास संदीप नागवडे यांनी व्‍यक्‍त केला.

Ahmednagar News: खा.डॉ विखे पाटील यांच्या प्रयत्नामुळे राष्ट्रीय वयोश्री योजनेचा जेष्ठांना लाभ- नागवडे Read More »

Sharad Pawar : नगर जिल्‍ह्यासाठी एकही काम जेष्‍ठ नेते करु शकले नाही, विखेंकडून शरद पवारांना टोला

Sharad Pawar: दहा वर्षे मुख्‍यमंत्री आणि पंधरा वर्षे केंद्रात मंत्री असतानाही नगर जिल्‍ह्यासाठी एकही काम जेष्‍ठ नेते करु शकले नाही आता त्‍यांनी दिलेला उमेदवार तरी आता काय करणार असा सवाल महायुतीचे उमेदवार खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी उपस्थित केला. माझ्याकडे सांगण्‍यासाठी विकास कामे आहेत, समोर मात्र फक्‍त दहशत असल्‍याचा टोला त्‍यांनी लगावला.  पारनेर येथे भारतीय जनता पक्षाच्‍या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बुथ प्रमुखांच्‍या संवाद कार्यक्रमात खा.डॉ.विखे पाटील बोलत होते. याप्रसंगी जेष्‍ठ कार्यकर्ते खिलारी गुरुजी, भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्‍य विश्‍वनात कोरडे, काशिनाथ दाते, तालुका अध्‍यक्ष राहुल शिंदे उपसस्थित होते. आपल्‍या भाषणात मंत्री विखे पाटील म्‍हणाले की, देशात पुन्‍हा  भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांचे सरकार सत्‍तेवर येणार आहे. परंतू ज्‍यांनी फक्‍त राज्‍यात दहा उमेदवार उभे केले आहेत असे जेष्‍ठ नेते मोठमोठे स्‍वप्‍न पाहात आहेत. असा टोला लगावून ज्‍यांच्‍या मतदार संघातील साठ टक्‍के निधी परत गेला अशा खासदारांना संसदरत्‍न  पुरस्‍कार मिळतो हे आश्‍यर्चकारक असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.    या तालुक्‍यातील दहशत आता जनताच संपवेल असा विश्‍वास व्‍यक्‍त करुन, माझ्याकडे सांगण्‍यासाठी फक्‍त विकासकामे आहेत, इतरांसारखी गुंडगीरी आणि दहशत नाही, मागील पाच वर्षात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी  यांनी सुरु केलेल्‍या प्रत्‍येक योजनेचा लाभ मी सामान्‍य माणसांपर्यंत पोहोचविण्‍याचा प्रयत्‍न केला आहे. त्‍यांचे आशिर्वाद माझ्या पाठीशी खंबीरपणे आहेत. कोणी कितीही धमक्‍या दिल्‍या तरी, आपण त्‍याला घाबरत नाही. या तालुक्‍यातील जनताच या धमक्‍यांना आता उत्‍तर देईल असा इशाराही त्‍यांनी दिला.  ही निवडणूक फक्‍त विकासाच्‍या मुद्याची आहे. परंतू केवळ विरोधासाठी काहीजन एकत्रित आले आहेत, ज्‍यांचे नेतृत्‍व घेवून समोरचे उमेदवार उभे आहेत त्‍यांनी जिल्‍ह्यासाठी काय केले हा प्रश्‍न  उपस्थित करुन, अनेक वर्षे राज्‍यात मुख्‍यमंत्री आणि केंद्रात मंत्रीपद भोगणा-यांनी जिल्‍ह्याच्‍या विकासासाठी कोणतेही योगदान दिलेले नाही. संरक्षण मंत्री असतानाही के.के रेंजचा प्रश्‍न सोडविला नाही. जिल्‍ह्यातील माजी महसूल मंत्री यांनीही के.के. रेंजच्‍या जमीनींबाबत ठाम भुमिका घेतली नाही. मात्र राधाकृष्‍ण विखे पाटील महसूल मंत्री झाल्‍यानंतर के.के. रेंजला जमीन देणार नाही असे ठामपणे लिहून दिले. त्‍यामुळेच शेतक-यांच्‍या जमीनींना संरक्षण मिळू शकले याकडेही त्‍यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.

Sharad Pawar : नगर जिल्‍ह्यासाठी एकही काम जेष्‍ठ नेते करु शकले नाही, विखेंकडून शरद पवारांना टोला Read More »

Lok Sabha Election: सामान्‍य माणसाचे पाठबळ मोदीजींच्‍या पाठीशीच – खा.डॉ.सुजय विखे पाटील

Lok Sabha Election:  राज्‍यात महायुतीचे ४५ हुन अधिक जागांवर मोठ्या मताधिक्‍याने विजयी होणार आहेत. मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीत अद्यापही जागा वाटपावरुन वाद सुरू आहेत. विकासाच्‍या मुद्यावर तिस-यांदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्‍यासाठी सामान्‍य माणूस महायुतीच्‍या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार राहील असा विश्‍वास खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केला. तालुक्‍यातील माळी बाभूळगाव येथील “मेरा बुथ सबसे मजबूत” या कार्यक्रमात खा.विखे पाटील बोलत होते.  अहिल्यानगर मधील लोकसभेच्या प्रचाराला आता रंग चढत चालला आहे. “मेरा बुथ सबसे मजबूत” कार्यक्रमाच्या माध्‍यमातून त्‍यांनी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते   आणि बुथ प्रमुखांशी त्‍यांनी संवाद साथला. याप्रसंगी आ.मोनीकाताई राजळे यांच्‍यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. डॉ.सुजय विखे पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, राज्यात केवळ महायुतीच्याच उमेदवाराला लोकांची पसंती मिळणार असून राज्यात ४५ हुन अधिक जागेवर मोठ्या मताधिक्याने कार्यक्रत्यांच्या जोरावर आपले उमेदवार निवडून येणार आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रुपाने देशाला पुन्हा एकदा सक्षम आणि कतृत्‍ववान पंतप्रधान मिळणार आहे. त्यात महाराष्ट्राचा मोठा वाटा असणार असा विश्वास डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला.  डॉ.सुजय विखे म्हणाले महाविकास आघाडीच्‍या नेत्‍यांकडे विकासाचे कोणतेही धोरण नाही, देशाचा पंतप्रधान कोण? यांचा चेहरा नाही. आणि त्यांच्यातील वादच हे त्यांच्या नष्ट होण्याचे कारण असणार आहे. त्याच प्रमाणे येत्या ४ जूनला राज्यातील महाविकास आघाडी आणि देशातील इंडी आघाडीचा जनता दारुण पराभव करेल.  कार्यकर्त्यांनी विरोधकांचा विचार न करता केवळ देशाचे पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या विकास कामांची माहिती घरोघरी पोहचविण्याचे आवाहन त्‍यांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांना केले.

Lok Sabha Election: सामान्‍य माणसाचे पाठबळ मोदीजींच्‍या पाठीशीच – खा.डॉ.सुजय विखे पाटील Read More »

Maharashtra News: ईदगाह मैदानावर पॅलेसस्टाईनचा झेंडा फडकवण्याची घटना गंभीर, खरे सुत्रधार शोधा

Maharashtra News : रमजान ईद सणाच्या पार्श्वभूमीवर नगर शहरात ईदगाह मैदानावर पॅलेसस्टाईनचा झेंडा फडविण्यात आल्याची घटना अतिशय गंभीर असून, या प्रकाराची सखोल चौकशी करुन, घटनेमागील खरे सुत्रधार पोलिसांनी शोधून काढण्याची आवश्यकता असल्याचे महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.    मंत्री ‍विखे पाटील  यांनी या घटनेचा तिव्र शब्दात निषेध करुन राज्यात व जिल्हयात रमजान ईदचा सण उत्साहात साजरा होत असताना काही अपप्रवृत्तीनी गालबोट लावण्याच्या हेतूने प्रार्थनेच्या दरम्यान पॅलेस्टाईनचा झेंडा फडविला. ही अतिशय गंभीर बाब आहे. या बाबत पोलिसांनी तातडीने दखल घेवून गुन्हा दाखल केला असला तरी, या घटनेमागील खरे सुत्राधार शोधून काढणे अतिशय गरजेचे असल्याचे पालकमंत्री म्हणाले.   या गंभीर घटनेच्या तपासात कोणताही हलगर्जीपणा न करता पोलीस प्रशासनाने झेंडा फडकवीणारे आणि त्यांना पाठबळ देणारे सुत्रधार कोण आहेत याची कसून चौकशी करावी. कारण अशी देशद्रोही वृत्ती कार्यरत असेल तर, प्रशासनाने ती मुळापासून उखडून टाकण्याची गरज आहे. अशा देशद्रोही वृत्तीला कोणीही आश्रय देण्याची चुक करु नये असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले आहे.  दुर्दैवाने काही राजकीय पक्ष आपल्या जाहिरनाम्यातच फुटरतावादी वृत्तीला प्रोत्साहन देत आहे. पण अशा घडणा-या घटनांमधून आत्मरिक्षण करण्याची आवश्यकता असल्याचे मत ना.विखे पाटील यांनी शेवटी व्यक्‍त केले.

Maharashtra News: ईदगाह मैदानावर पॅलेसस्टाईनचा झेंडा फडकवण्याची घटना गंभीर, खरे सुत्रधार शोधा Read More »