Sujay Vikhe News: अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील सूज्ञ असून, पाच वर्षात झालेली विकास काम जनतेच्या समोर आहे.त्यामुळे महायुतीलाच जनतेचे पाठबळ असल्याने पोपटपंची आणि भूलथापा देणाऱ्यांना थारा देणार नाही असा विश्वास खा.डॉ सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला.
तालुक्यातील काष्टी येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात खा.विखे पाटील बोलत होते.माजी मंत्री आ.बबनराव पाचपुते,विक्रमसिंह पाचपुते यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
आपल्या भाषणात खा.विखे म्हणाले की लोकसभा निवडणुक देशाचे भवितव्य ठरवणारी आहे.विकास कामांवर ही निवडणूक होत आहे.कोव्हीड कालावधी सोडला तर केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून विकास कामाचा निधी आणला.लोकासाठी असलेल्या प्रत्येक योजनेचा लाभ सामान्य माणसाला देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले.
या लोकसभा मतदारसंघाची परंपरा पाहीली तर काम करणार्या लोकांना साथ देण्याची मतदारसंघातील जनता सूज्ञ असल्याकडे लक्ष वेधून प्रामाणिक स्वाभिमानी नैतिकता असलेल्या उमेदवाराला मत टाकण्याची भूमिका आजपर्यत मतदारांनी बजावली.देशात पुन्हा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी जनतेचा निर्धार झाला आहे.त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराला मिळणारे प्रत्येक मत केंद्रात पुन्हा भाजपाची सता येण्यासाठी महत्वपूर्ण ठरणार असल्याचे विखे पाटील म्हणाले.
सध्या कुठल्याही कार्यक्रमात फक्त निवडणुकीची चर्चा सुरू असल्याने कार्यकर्त्यांनी नकारात्मक चर्चेपासून दूर राहावे. पाच वर्षात तालुक्यात झालेल्या विकास कामाची आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयांची माहीती जनतेला द्या असे आवाहन त्यांनी केले.