Ahmednagar News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून राष्ट्रीय वयोश्री योजनेची प्रभावी अंमलबजावणी नगर जिल्ह्यात झाली. जिल्ह्यातील ४५ हजार जेष्ठ नागरीकांना या योजनेचा थेट लाभ खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे झाला.या सर्व जेष्ठ नागरीकांचे पाठबळ खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहील असा विश्वास भाजपाचे तालुका अध्यक्ष संदीप नागवडे यांनी व्यक्त केला.
लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे उमेदवार खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांना समाजातील सर्व घटकांचे मोठे पाठबळ मिळत असून, यामध्ये केंद्र सरकारने जेष्ठ नागरीकांसाठी सुरु केलेल्या राष्ट्रीय वयोश्री योजनेची जिल्हयात झालेली अंमलबजावणी ही महायुतीच्या दृष्टीने जमेची बाजु ठरणार आहे. समाजातील दुर्लक्षीत झालेला घटक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीत करुन, त्यांच्यासाठी आवश्यक असलेली साधन साहित्याची मोफत उपलब्धता करुन दिली.
लोकसभा मतदार संघामध्ये खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्याकरीता विशेष परिश्रम घेतले. प्रत्येक तालुक्यात शिबीरं आयोजित करुन लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली. यामध्ये नोंदणी झालेल्या पात्र लाभार्थ्यांना मोफत साहित्य मिळाल्याने जेष्ठ नागरीकांमध्ये समाधान आहे.
कोव्हीड संकटातही खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी केलेले कसम हे नागरीकांच्या डोळ्यासमोर आहे. डॉ.विखे पाटील रुग्णालयातून कोव्हीड सेंटर उभे करुन, त्यांनी उपचारांची सुविधा उपलब्ध करुन दिली. केंद्र सरकारच्या प्रत्येक योजनेची अंमलबजावणी सुरु आहे. यामध्ये मोफत धान्य योजने पासून ते आयुष्मान भारत योजनेचीही कार्यवाही मतदार संघात सर्वच स्तरावर सुरु असल्याने या योजनेचाही मोठा दिलासा नागरीकांना मिळाला असल्यांचे नागवडे म्हणाले.
यासर्व पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या सर्व योजनेचे लाभ सामान्य माणसापर्यंत पोहोचल्याने महायुतीला हे मोठे पाठबळ निश्चित मिळेल असा विश्वास संदीप नागवडे यांनी व्यक्त केला.